ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
शाहिद कपूर मीराला पाठवतो ‘हे’ मेसेज, मीरा कपूरने शेअर केला स्क्रीनशॉट

शाहिद कपूर मीराला पाठवतो ‘हे’ मेसेज, मीरा कपूरने शेअर केला स्क्रीनशॉट

शाहिदची पत्नी मीरा बॉलीवूड सेलिब्रेटी नसली तरी तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. त्यामुळे एखाद्या सेलिब्रेटीप्रमाणे तिला सोशल मीडियावर फॉलो केलं जातं. शाहिद आणि मीरा या सेलिब्रेटी कपलबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. शिवाय सोशल मीडियावर शाहिदपेक्षा मीराच जास्त अॅक्टिव्ह असल्यामुळे मीराकडूनच अनेक अपडेट चाहत्यांना मिळत असतात. मीरा बऱ्याचदा स्क्रिन केअर, हेअर केअर, प्रेगनन्सी, पोस्ट प्रेगनन्सी, बाळाचे संगोपन याबाबत टिप्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र आता तिने चक्क तिच्या पतीसोबत म्हणजेट शाहिदसोबत झालेलं एक चॅटच चाहत्यांसोबत शेअर केलं आहे.

काय आहे हा मेसेज

शाहिदने नेहमीप्रमाणे एक मेसेज मीराला पाठवला. मात्र मीराने तो चक्क त्यांच्या चाहत्यांसोबतच शेअर केला. हा मेसेज रोमॅंटिक मेसेज नसून एका स्क्रिन केअर प्रॉडक्टबद्दल आहे. मीरा इन्स्टावर स्क्रिन केअर प्रॉडक्ट नेहमीच शेअर करत असते. मीरा सोशल मीडियावर ब्युटी इन्फ्लुन्सर आहे. त्यामुळे शाहिदने मीरासोबत पर्सनल चॅटवर एक रील शेअर करत तिला विचारलं की शोध हे प्रॉडक्ट नेमकं कोणतं आहे ? यावर मीराने ते चॅट स्क्रिन शॉटसह तिच्या इन्सा  स्टोरीत शेअर केलं आणि त्याला कंमेट दिली, ” बघा स्क्रिन केअर बाबत माझ्यापेक्षा जास्त कोण उत्सुक आहे” यासोबत तिने या पोस्टसोबत #realinfluence असा हॅशटॅग दिला आहे.

माझी तुझी रेशीमगाठ’ची पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांवर चांगली पकड

मीरा आणि शाहिदची जोडी

मीरा राजपूत आणि शाहिद कपूर हे बॉलीवूडचे एक सेलिब्रेटी कपल आहे. वास्तविक शाहिद कपूर आणि करिना कपूर एकमेकांच्या  प्रेमात आखंड बुडाले होते. मात्र अचानक त्यांचे ब्रेकअप झाले आणि शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलं. मीरा आणि शाहिद 2015 साली विवाहबंधनात अडकले होते. करिनासोबत ब्रेकअप झाल्यावर मीराने शाहिदला त्यातून बाहेर काढलं. मीरासोबत शाहिदने अरेंज मॅरेज केलं असलं तरी तो दोघं एकमेकांसाठीच जन्माला आले असावेत असं त्यांच्याकडे बघून वाटत राहतं. ही रब ने बना दी जोडी अशीच कायम सुखी राहू दे अशी चाहत्यांची इच्छा  आहे. शाहिद आणि मीरा गोंडस मीशा आणि जैनचे आईवडीलदेखील आहेत. सुखी कुटुंबात रमलेली मीरा आणि बॉलीवूडचा कबिर सिंह शाहिद बऱ्यादचा मोठ्या मोठ्या ब्रॅंडचं प्रमोशन करताना दिसतात. शिवाय मीरा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असल्यामुळे तिच्या ब्युटी टिप्सही नेहमी व्हायरल होताना दिसतात. मीराच्या ब्युटी टिप्समागचं सिक्रेट मात्र आता या स्क्रिन शॉटमुळे उघड झालं आहे. त्यामुळे स्क्रिन केअर प्रॉडक्टचा वापर घरात मीरा नाही तर शाहिदच करत असतो हे एव्हाना चाहत्यांंना नक्कीच समजलं असेल. 

ADVERTISEMENT

तारा सुतारियाने का नाकारली कार्तिक आर्यनसोबत ‘फ्रेडी’मधली भूमिका

Bigg Boss OTT: मराठमोळ्या राकेशच्या प्रेमात पडली का शमिता शेट्टी

30 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT