नाताळ म्हणजे आनंद आणि उत्साहाचा सण… लहान मुलांसाठी हा सण खास असल्याने अनेकांच्या घरी ख्रिसमस पार्टीचा बेत आखला जातो. ख्रिसमसच्या शुभेच्छा एकमेंकाना दिल्या जातात. ख्रिसमस जवळ आल्याने अनेकांच्या घरी पार्टीला सुरूवात झाली आहे. सेलिब्रेटीजच्या घरी देखील ख्रिसमसचे वातावरण पाहायला मिळत आहे. ख्रिसमस सणात महत्त्वाचे असते घर सजवणे… या सजावटीसाठी खास ख्रिसमस ट्रीवर रोशनाई केली जाते. अनेक सजावटीच्या वस्तू आणि गिफ्टने ख्रिसमस ट्री सजवला जातो. अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत त्यांच्या मुलांसाठी खास ख्रिसमस पार्टी आयोजित करतात. मात्र यंदाच्या पार्टीत मीराचा चांगलाच हिरमोड झाला.
अखेर अफवांना पूर्णविराम, सुश्मिता आणि रोहमनचं ब्रेकअप
मीरा राजपूत का झाली नाराज
शाहिद आणि मीराने यावर्षीदेखील ख्रिसमस पार्टीची जोरदार तयारी केली होती. पार्टीसाठी छान ख्रिसमस ट्री सजवला होता. मुलांच्या सोबत दंगामस्ती करत त्यांनी पार्टीचा आनंद लुटला. मीराने मुलांसाठी खास ख्रिसमस कुकीज बनवल्या होत्या. चॉकलेट, पिझ्झा आणि मुलांच्या आवडीच्या सर्व गोष्टी तिने पार्टीसाठी तयार केल्या. पण या पार्टीत असं काही घडलं की मीरा राजपूत खूप निराश झाली.मीराने इन्साग्राम वर पार्टीचे फोटो शेअर केले होते. शिवाय तिने एक पोस्टदेखील शेअर केली ज्यात तिने लिहीलं होतं की, “होय… आम्ही आमचा ख्रिसमस ट्री गमावला आहे. मागच्या चार वर्षांपासून आम्ही त्याच सहा फूट लांब, गर्द हिरव्या रंगाच्या ख्रिसमस ट्रीला सजवत होतो. दर वर्षी या ख्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी आम्ही निरनिराळं सजावटीचं सामान विकत घ्यायचो. दर वर्षी ख्रिसमस ट्री आमच्या ख्रिसमस लेबल असलेल्या बॉक्समधून बाहेर काढला जायचा आणि पुन्हा 26 डिसेंबरला तो बॉक्समध्ये ठेवला जायचा. मी यावर्षीदेखील माझ्या मुलांसाठी ख्रिसमस पार्टी आयोजित केली आहे. तिथेच मला हा ट्री या वर्षीदेखील सजवायचा होता. त्यासाठी आम्ही तो ख्रिसमस बॉक्स संपूर्ण घरात शोधला पण तो आम्हाला मिळू शकला नाही. मला फक्त सजावटीचा डब्बा मिळाला… उफ्फ, अगदी शेवटच्या मिनीटांमध्ये खरेदी केलेला हा दुसरा ख्रिसमस ट्री आहे. मला हा विशेष आवडला नाही. मात्र माझ्या मुलांनी तो सजवण्याचा छान आनंद लुटला आहे. माझ्या मुलांनी ख्रिसमस ट्री सजवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले ज्यात मी त्यांना रोकटोक केली नाही”
रणवीर-शाहिदनंतर आता कार्तिक झाला क्रिकेटर
ख्रिसमसच्या शुभेच्छा
मीराचा चार वर्ष जुना मोठा ख्रिसमस ट्री हरवल्यामुळे तिचा यंदाचा नाताळ काहिसा नाराज मूडमध्ये गेला. मात्र तिच्या मुलांनी नाताळचा मस्त आनंद लुटला आणि छान पार्टी देखील केली. मीराने चाहत्यांना नाताळच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. तिने शेअर केलं आहे की, ” मला अपेक्षा आहे माझं जुनं ख्रिसमस ट्री मला नक्कीच कुठेतरी सापडेल. मी माझे शेजारी आणि माझ्या आईकडे याची विचारपूस केली आहे. कदाचित कोणीतरी कुठेतरी तो ठेवला असेल. माझे वडील आम्हाला नेहमी ब्लॅक होलबाबत लॉजिक सांगतात. ज्यामध्ये वस्तू अचानक गायब होतात आणि पुन्हा मिळत नाहीत. कदाचित माझ्याबाबत असंच झालं असेल. पण तुम्हाला सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा आणि हॅपी वेकेशन.