गरोदर राहिल्याचं कळताच प्रत्येक महिलेला आनंद होतोच पण त्यासोबतच तिच्या जबाबदारीतही वाढ होत असते. एकदा गरोदर झालं की, गर्भारपणाच्या प्रत्येक टप्प्यात काळजी घ्यावी लागते. त्यामुळे एकीकडे गरोदर राहिल्याचा आनंद तर दुसरीकडे गर्भ राहावा किंवा गर्भपात टाळण्यासाठीही स्त्रीला काळजी घ्यावी लागते. खासकरून प्रेग्नंसीचे सुरूवातीचे तीन महिने हे महत्त्वपूर्ण असतात. मुख्यतः त्यांच्यासाठी ज्या महिला पहिल्यांदा आई होणार आहेत. गर्भावस्थेच्या पहिल्या तीन महिन्यांना पहिली तिमाही असं म्हटलं जातं. ज्यामध्ये 14 आठवड्यांचा काळ असतो. जेव्हा बाळ होण्याची प्रक्रिया सुरू होते. डॉक्टरांनुसार या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महिलांनी गर्भ राहण्यासाठी स्वतःची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. या काळात घेतलेली योग्य काळजी प्रसूतीदरम्यान कामी येते. ज्यामुळे प्रसव झाल्यानंतर तब्येत पूर्वपदावर येण्यास जास्त वेळ लागत नाही. POPxoMarathi च्या या लेखात आम्ही तुम्हाला गर्भ कसा राहावा म्हणजेच गर्भपात टाळण्यासाठीच्या काही टिप्स सांगणार आहोत.
Shutterstock
प्रत्येक महिलेच्या गर्भारपणात काही ना काही समस्या उद्भवतात. पण कधी कधी त्या गंभीर असल्यास गर्भ राहत नाही म्हणजेच गर्भपात होण्याची शक्यता असते. जाणून घेऊया यामागील मुख्य कारण –
Canva
गर्भपाताचं साधारणतः दिसणारं लक्षण म्हणजे पोटात गोळा येणं आणि योनीतून रक्तस्त्राव होणं. जर गर्भावस्थेदरम्यान खालील लक्षणं दिसली तर डॉक्टरांना लगेच संपर्क करा.
गर्भारपणाच्या सुरूवातीच्या तीन महिन्यांमध्ये गर्भवती महिलेला जास्त काळजी घेण्याची गरज असते. कारण याच काळात गर्भपात होण्याची शक्यता जास्त असते. पण घाबरू नका या पहिल्या तिमाहीत गर्भ राहावा म्हणून स्वतःची देखभाल कशी करावी यासाठीच्या टिप्स आम्ही देत आहोत.
जर तुमच्या प्रेग्नंसीची टेस्ट पॉजिटिव्ह आली असेल तर सर्वात आधी डॉक्टरकडे जा. डॉक्टर तुम्हाला काही औषधं देतील ती व्यवस्थित घ्या आणि ज्या टेस्ट्स सांगतील त्याही लगेच करून घ्या.
प्रेग्नंसीबाबत पहिले तीन महिने गुप्तता पाळण्याचा सल्ला प्रत्येक घरात हमखास दिला जातो. हे थोडं विचित्र वाटू शकतं. पण असं मानलं जातं की, पहिले तीन महिने हे गर्भवती महिलेसाठी खूपच नाजूक असतात. त्यामुळे अशा गोड बातमीमुळे काही नकारात्मक उर्जा तिच्यापर्यंत पोचू नये. यासाठी ही काळजी घेतली जाते. फक्त घरातल्या आणि जवळच्या नातेवाईकांना याबाबत सांगा आणि तीन महिन्यांनंतर सर्वांना ही गोड बातमी द्या.
Shutterstock
गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यांपासूनच फॉलिक एसिड सप्लीमेंट घ्यायला सुरूवात करा. फॉलिक एसिड एक आवश्यक पोषक तत्त्वं आहे जे तुमच्या बाळाला मेंदूच्या आणि पाठीच्या कणासंदर्भातल्या कोणत्याही समस्येपासून वाचवते. गर्भवती महिलेला दररोज 400 मायक्रोग्राम फॉलिक एसिड घ्यायला हवं. यासोबतच प्रत्येक दिवशी 10 ग्रॅम व्हिटॅमीन डी युक्त सप्लीमेंट घेण्याची गरज असते. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पहिल्या तिमाहीत मल्टीव्हिटॅमीन्सही घेऊ शकता.
गर्भावस्थेदरम्यान कोणतंही औषधं घेण्याआधी ते नीट तपासून मगच घ्या. तपासल्याशिवाय कोणतंही औषधं घेणं तुमच्या बाळासाठी नुकसानदायक ठरू शकतं. त्यापेक्षा कोणतंही औषध घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
जर तुम्हाला निरोगी गर्भावस्था हवी असल्यास सर्वात आधी धूम्रपान किंवा मद्यपानाची सवय किंवा व्यसन सोडवा. अशा सवयी तुम्हाला गर्भपात आणि वेळेआधी प्रसूतीसारख्या संकटात टाकू शकतात. कारण या दोन्हीचा थेट प्रभाव नवजात शिशूवर पडत असतो.
गर्भधारणा झाल्यावर तुम्ही कॅफीनचं सेवन कमी केलं पाहिजे. दिवसभरात 200 मिग्रा कॅफीन म्हणजे एक कप कॉफीच तुम्ही घेऊ शकता. जर गर्भावस्थेदरम्यान तुम्ही दिवसभरात या प्रमाणापेक्षा जास्त कॉफी प्यायल्यास गर्भपाताचा धोका वाढू शकतो.
पहिल्या तीन महिन्यात बरेचदा गर्भवती महिला आजारी पडण्याची शक्यता असते. या काळात मळमळणं, चक्कर येणं, उलटीसारखं वाटणं या समस्या उद्भवतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर सर्वात आधी बिस्कित किंवा दुसरं कोणतंही स्नॅक्स खा. या समस्या 16 ते 20 व्या आठवड्यात कमी होतात. जर कमी न झाल्यास हा हायपरमेसिस ग्रॅविडरेमसारख्या मॉर्निंग सिकनेसचा संकेत असू शकतो. त्यामुळे लगेच डॉक्टरांना
गर्भावस्थेतील थोडाही निष्काळजीपण तुमच्या आणि बाळाच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या काळात ट्रॅव्हलिंग करणं टाळा. प्रयत्न करा की, गर्दी, प्रदूषण आणि रेडिएशनच्या जागी जाऊ नका. खड्डे आणि खाचखळगे असलेले रस्ते टाळा.
Shutterstock
पहिल्या तीन महिन्यात होणाऱ्या उलट्या, मळमळणं किंवा चक्कर येणं या समस्या टाळण्यासाठी लिंबू पाणी किंवा आल्याचा चहा प्या. दिवसभरात चार ते पाच वेळा पातळ पदार्थ जसं ताक, लिंबू पाणी किंवा नारळाचं पाणी प्या. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.
संपूर्ण गर्भावस्थेदरम्यान आराम करणं हे आवश्यक आहे. पण मुख्यतः पहिल्या तीन महिन्यात जास्त थकवा जाणवतो. कारण तुमच्या शरीरात वेगाने हार्मोन्सचे थर वाढत असतात. हेही यामागील कारण असू शकतं. जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा चांगली झोप घ्या आणि रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. गर्भारपणादरम्यान मोबाईल विसरा आणि इतर कामांबाबतही विचार करू नका. या काळात एका कुशीवर झोपणं चांगलं असंत. यामुळे स्टीलबर्थचा धोका कमी होऊन नॉर्मल डेलीव्हरी होईल.
प्रेग्नंसीदरम्यान घराची साफसफाई करताना वापरण्यात येणारी रसायन किंवा स्वच्छता उत्पादन वापरताना काळजी घ्या. हातात ग्लोव्हज घाला आणि या उत्पादनांच्या थेट संपर्कात येणं टाळा. खासकरून ज्यावर वॉर्निंग लेबल लागलं असेल. साफसफाई करताना खिडक्या नेहमी उघड्या ठेवा. तसंच एअरोसोल उत्पादनांचा वापरही टाळा.
गर्भारपण ही तुम्हाला कपड्यांच्या खरेदीची सुवर्णसंधी देतं. गर्भवती होण्याच्या तीन महिन्यातच तुमच्या स्तनांचा आकार वाढू लागतो. अशावेळी सर्वात आधी तुम्हाला गरज असते ती ब्रा बदलण्याची. त्यामुळे तातडीने आधी मॅटर्निटी ब्रा ची खरेदी करा.
गर्भारपणात अनेकदा तुम्हाला थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे जर तुम्हाला मूड असेल तर तुम्ही नवऱ्यासोबत संभोग करू शकता. पण लक्षात घ्या प्रत्येक ट्राईमेस्टरमध्ये सेक्सची पोजिशन बदलते. त्यामुळे त्याबाबतची माहिती नक्की घ्या.
गर्भावस्थेचे महिने जसजसे पुढे जातात तसे तुमचं वजन वाढू लागतं त्यामुळे तुम्हाला डोकेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मसाज करून घेणं हा यावर चांगला पर्याय ठरू शकतो. 10-15 मिनिटांचा मसाजही तुमचा पूर्ण तणाव दूर करून रिलॅक्स वाटू लागतं.
निरोगी तब्येत आणि आरामदायक प्रसूतीसाठी गर्भावस्थेच्या प्रत्येक टप्प्यात पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे. त्यामुळे गर्भवती महिलेने तिच्या आहारात फॉलिक एसिड, आर्यन, कॅल्शियम आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
गर्भावस्थेच्या सुरूवातीपासून तुम्ही व्यायाम केल्यास याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. रोज व्यायाम केल्याने तुमचं वजन कंट्रोलमध्ये राहील आणि शेवटच्या महिन्यांपर्यंत तुम्ही फिट राहाल. गर्भपणादरम्यान पेल्विक फ्लोर व्यायाम करणंही बेस्ट असतं.
Shutterstock
गर्भावस्थेच्या पहिल्या टप्प्यात हिमोग्लोबिन, युरीन, एचआयव्ही आणि ब्लडशुगर टेस्ट करण्यास सांगितलं जातं. या टेस्ट दर तीन महिन्याने करून घ्याव्या लागतात. प्रेग्नंसीच्या सुरूवातीच्या काळात हायपोथायरॉइड आणि थॅलसीमियाची चाचणी नक्की करून घ्यावी. जर तुमच्यांपैकी कोणाला थॅलेसीमिया असले तर मुलालाही 25 टक्के तो होण्याची भीती असते. बाळाची वाढ कशी होत आहे, हे पाहण्यासाठी डॉक्टर तीन वेळा अल्ट्रासाऊंड करून घेतात. बाळाच्या हृदयाचे ठोको, बाळाचा विकास आणि बाळाच्या गर्भातील स्थिती यानुसार डिलेव्हरी प्लॅन केली जाते.
गर्भ राहावा म्हणजेच गर्भपाताबाबत अनेकींच्या मनात शंका असतील त्यातील काहीचं खालील प्रश्न आणि उत्तरांनी नक्कीच निरसन होईल.
1. साधारण कोणत्या महिन्यात गर्भपात होण्याची भीती असते?
बऱ्याच केसेसमध्ये 12 व्या आठवड्याआधी गर्भपात झाल्याचं दिसून आलं आहे. गर्भपाताच्या लक्षणांमध्ये ब्लीडींग, स्पॉटींग, ओटीपोटात वेदना आणि क्रँप्स येणे यांचा समावेश आहे.
2. बेडरेस्ट घेतल्यास गर्भपात टाळता येतो का?
अजूनतरी याबाबत स्पष्ट पुरावा नसला तरी बरेचदा क्रिटीकल केसेसमध्ये महिलांना व्हजायनल ब्लीडींग आणि दगदग टाळण्यासाठी गर्भारपणाच्या पहिल्या काही आठवड्यात बेडरेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे गर्भपात टळेलच याबाबत कोणताही शाश्वती नाही.
3. तणावामुळेही गर्भपात होतो का?
आपल्या आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारचा तणाव हा चांगला नसतोच. पण तणावामुळे गर्भपात होतोच असं नाही. 10 ते 20 टक्के गरोदरपण ही गर्भपातात रूपांतरित होतात. बरेचदा गर्भ न राहण्यामागे क्रोमोजोमल अबनॉर्मलिटीज असतात. ज्या गर्भाच्या वाढीत अडथळा निर्माण करतात.
4. कोणत्या आठवड्यात गर्भपात होण्याची जास्त भीती असते?
0 ते 6 आठवडा या सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये गर्भ न राहण्याची शक्यता जास्त असते. एखाद्या महिलेला प्रेग्नंसीबाबत न कळताच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात तिचा गर्भपात होऊ शकतो. 6 ते 12 आठवडा, 13 ते 20 आठवडा, 12 व्या आठवड्यांपर्यंत गर्भपाताचा धोका हा 5 टक्क्याने कमी होतो.
हेही वाचा –
जाणून घ्या का महत्त्वाचे असतात गर्भसंस्कार
प्रेग्नंट महिलांसाठी खास गिफ्ट आयडियाज
जर तुम्हाला ही लक्षणं जाणवत असतील तर तुम्ही प्रेग्नंट असू शकता
आई व्हायचंय…तर गर्भावस्थेबद्दल सर्व गोष्टी घ्या जाणून