ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
shabaash mithu

सुप्रसिद्ध महिला क्रिकेटर मिताली राज वरील बायोपिक या दिवशी होणार प्रदर्शित

भारताची सर्वोत्कृष्ट महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मितालीने निवृत्तीची घोषणा केल्यापासून प्रत्येकजण तिच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आतुर होत आहे. आता तिच्याबाबतीत जाणून घेणे अधिक सोपे होणार आहे. मिताली राजचे आयुष्य आणि तिचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटर होण्याचा प्रवास आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे. मिताली राजवरील बायोपिक ‘शाबाश मिथू’’ येत्या जुलै महिन्यात रिलीज होणार आहे. तापसी पन्नू स्टारर ‘शाबाश मिथू’ या चित्रपटात भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या कारकिर्दीविषयी सांगितले जाणार आहे. सर्वोत्कृष्ट भारतीय क्रिकेटर्सपैकी एक असलेल्या मिताली राजची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तब्बल 23 वर्षांची आहे, तिने सलग सात वेळा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 50 धावा करण्याचा विक्रम केला आहे. यासोबतच मिताली राजने 4 वर्ल्ड कपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले आहे.

तापसी पन्नूने जाहीर केली तारीख 

चित्रपटाच्या रिलीजची तारीख जाहीर करताना, अभिनेत्री तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, “काहीतरी करण्याचे स्वप्न असलेल्या मुलीपेक्षा कोणीही अधिक शक्तिशाली असू शकत नाही. आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी तिच्याकडे योजना आहे.” एका मुलीची कथा जिने या “जंटलमन्स गेम” मध्ये प्रवेश केला आणि बॅट उचलून तिच्या स्वप्नाचा पाठलाग केला. शाबास मिथू: द अनहर्ड स्टोरी ऑफ वुमन इन ब्लू 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये येणार आहे.” 

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भूमिका साकारण्यासाठी तापसीने विशेष क्रिकेट प्रशिक्षण घेतले आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तापसीने चाहत्यांची उत्सुकता वाढवण्यासाठी अनेक फोटोही शेअर केले आहेत. लंडन, ब्रिटनमधील लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर शूट करण्यासाठी तापसी खूप उत्साहित होती आणि तिथल्या शूटचे फोटोही शेअर केले. सृजित मुखर्जी दिग्दर्शित आणि प्रिया एवेन लिखित शाबाश मिथू 15 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.मार्च महिन्याच्या सुरुवातीला ‘शाबाश मिथू’ ‘च्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केला होता. 1 मिनिटांच्या या  टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नूला प्रेक्षकांच्या गर्जना ऐकून स्टेडियममध्ये प्रवेश करताना दाखवण्यात आले आहे.

मिताली राजने स्वीकारली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती 

भारतीय क्रिकेटची सर्वोत्तम महिला फलंदाज मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 39 वर्षीय मितालीने ट्विटरवर याची घोषणा केली आणि लिहिले, “माझ्या करिअरला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. कारण सध्या संघ अतिशय प्रतिभावान युवा खेळाडूंच्या हातात आहे आणि भारतीय क्रिकेटचे भविष्य उज्ज्वल आहे.” मिताली राज ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूंपैकी एक आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे.

ADVERTISEMENT

मिताली राजने निवृत्ती जाहीर केल्यापासून तिच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने मितालीचे आभार मानले आहेत.मितालीच्या पोस्टवर टिप्पणी करताना, तापसी पन्नूने लिहिले की, “धन्यवाद हा एकमेव शब्द आम्ही म्हणू शकतो. क्रिकेटप्रेमींचे महिला क्रिकेटकडे लक्ष वेधून घेतल्याबद्दल धन्यवाद.”  एवढेच नाही तर तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर मितालीसाठी एक लांब आणि भावनिक संदेश पोस्ट केला आणि लिहिले की, “भारतीय क्रिकेट संघासाठी एकदिवसीय सामन्याचे नेतृत्व करणारी सर्वात तरुण महिला क्रिकेटर.चार विश्वचषक स्पर्धेत संघाचे नेतृत्व करणारी आणि दोनदा अंतिम फेरी गाठणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू! कसोटी सामन्यात 200 धावा करणारी सर्वात तरुण क्रिकेटपटू!पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू! एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग सातवेळा अर्धशतक करणारी एकमेव भारतीय क्रिकेटपटू!” 

मितालीचा हा बायोपिक बघण्यासाठी चाहते आतुर आहेत आणि लवकरच त्यांना हा चित्रपट प्रत्यक्ष बघायला मिळेल. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

08 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT