ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
mix veg bhaji recipe

घरात उरलेल्या भाज्यांपासून बनवा मिक्स व्हेज भाजी, अशी करा स्वादिष्ट

आजकालच्या धावपळीच्या काळात ऑफिस आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळणं म्हणजे अक्षरशः तारेवरची कसरत असते. ज्या महिला ऑफिसला जातात त्यांना स्वयंपाकासाठी खास शेड्यूल बनवावं लागतं. दररोज काय स्वयंपाक करायचा, कोणती भाजी बनवायची याचं ठराविक वेळपत्रक ठरवावं लागतं. बाजारातून कोणत्या भाज्या कधी आणायच्या यासाठी पण खास वेळ ठरवावा लागतो. आजकाल ऑनलाईन पद्धतीने सर्व गोष्टी ऑर्डर करता येतात. पण बाजारात जाऊन खास आवडीच्या आणि हिरव्यागार भाज्या खरेदी करण्याची मजा निराळीच असते. कितीही प्लॅनिंग केलं तरी पण कधी कधी असं होतं की फ्रीजमध्ये सर्व भाज्या वापरून झाल्यावर त्यातील थोड्या थोड्या भाज्या उरतात. आता या भाज्यांचे नेमकं काय करावं हा प्रश्न नेहमीच गृहिणींसमोर असतो. तुम्ही या सर्व भाज्या वापरून कटलेट, पॅटिस, पुलाव अथवा एखादी साईड डिश नक्कीच बनवू शकता. मात्र जर त्यासाठी तुमच्याजवळ वेळ नसेल तर आज बनवा चटकदार मिक्स व्हेज भाजी आणि त्यासाठी फॉलो करा ही चमचमीत रेसिपी… यासोबतच वाचा तोंडली भाजी रेसिपी, स्वादिष्ट आणि रूचकर (Tondli Chi Bhaji)

मिक्स व्हेज भाजीची रेसिपी

आता अर्थात या रेसिपीसाठी कोणतंही ठराविक साहित्य आणि कृती नक्कीच सांगता येणार नाही. कारण तुमच्याकडे कोणत्या भाज्या उरल्या आहेत आणि त्याचा वापर मिक्स व्हेज भाजी करण्यासाठी कसा करायचा हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण अंदाजाने आम्ही तुम्हाला काही साहित्य आणि कृती यासाठी देत आहोत. यामध्ये तुम्ही तुमच्या घरातील भाज्यांनुसार बदल करू शकता.

साहित्य

  • तुमच्या घरी असलेले टॉमेटो, गाजर, मटार, वांगी, मशरूम, ब्रोकोली, सिमला मिरची, फरसबी, बटाटा, फ्लॉवर अशा भाज्या सर्व धुवून बारीक चिरून घ्या. साधारणपणे सर्व भाज्या चिरून त्या दोन वाटीभर होतील असा अंदाज घ्या.
  • चवीपुरतं मीठ
  • एक चिरलेला कांदा
  • एक चमचा लाल तिखट
  • चिमुटभर हळद
  • एक चमचा आलं लसणाची पेस्ट
  • तेजपत्ता
  • अर्धा चमचा जिरे पावडर
  • एक चमचा गरम मसाला
  • अर्धा चमचा धणे पावडर
  • चिरलेली कोथिंबीर 
  • सजावटीसाठी फ्रेश क्रीम
  • अर्धी वाटी काजूची पेस्ट
  • तेल

शेपूची भाजी खाण्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकीत | Shepuchi Bhaji Benefits In Marathi

कृती

सर्व भाज्या अर्धवट शिजवून घ्या. एका कढईत तेल गरम करा आणि त्यात कांदा आणि आलंलसणाची पेस्ट परतून घ्या. चिरलेला टोमॅटो आणि काजूची पेस्ट टाकून चांगलं परतून घ्या. तेजपत्ता आणि सर्व मसाले टाका आणि पुन्हा परतून घ्या. मसाले तेलापासून वेगळे दिसू लागले की शिजलेल्या भाज्या टाका आणि वाफेवर शिजू द्या. सर्व भाज्या चांगल्या शिजल्या की मीठ टाका. वरून कोथिंबीर, फ्रेश क्रीम टाकून सजवा. अशी बनवा चमचमीत घेवड्याची भाजी रेसिपी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)

ADVERTISEMENT

आम्ही शेअर केलेली ही चटकदार रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कंमेटमध्ये जरूर कळवा.

21 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT