ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अलिबागकरांवरुन विधान करणे आदित्यला पडले महाग, मनसेने दिला इशारा

अलिबागकरांवरुन विधान करणे आदित्यला पडले महाग, मनसेने दिला इशारा

काहीही झाले की, अलिबागवरुन टोमणा देऊन लोकं अलिबागंची माणसं ही किती मूर्ख आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात. असाच काहीसा टोला हा आदित्य नारायण याने एका शो दरम्यान दिला आणि त्यामुळे मनसेचा संताप झाला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आदित्य नारायणला सज्जड दम भरला आहे. आदित्य नारायण गेल्या काही काळापासून नाहक वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे. आता पुन्हा एकदा त्याने वाद ओढावून घेतला आहे. अलिबागकरांवरुन असे विधान करणे त्याला चांगलेच महाग पडले असून त्याला मनसेकडून माफी मागण्यासही सांगण्यात आले आहे. जाणून घेऊया आदित्यने नेमकं केलं तरी काय

मेकर्सना टॅलेंटपेक्षा गरिबीचे प्रदर्शन दाखवायला आवडते, गायक अभिजीत सावंतचा खुलासा

इंडियन आयडॉल 12 वादातित

गेल्या काही दिवसांपासून इंडियन आयडॉल हा रिअॅलिटी शो वादातित राहिला आहे. किशोर कुमार एपिसोडनंतर या सीझनला जणू ग्रहणच लागले आहेत. काही स्पर्धकांना बाहेर काढण्याचीही मागणी केली जात आहे. असे असताना एक व्हिडिओ सोनी टीव्हीने पोस्ट केला ज्यामध्ये आदित्य नारायण म्हणजेच या शोचा अँकर हा एका स्पर्धकाला अलिबागवरुन टोला लगावला. ही क्लीप सगळीकडे व्हायरल झाल्यानंतर अमेय खोपकर यांनी एक व्हिडिओ करुन आदित्यला  तुझ्या कानाखाली आवाज काढीन असा दमच दिला आहे. जो तो उठतो तो मराठीच्या मुद्द्यावर काहीही बरळतो. असे म्हणत त्यांनी आदित्यची कानउघडणी केली आहे. शिवाय इतर हिंदी भाषिक मालिकांंनाही अशी चूक करु नका अशाच इशारा दिला आहे. 

अलिबागचा इतिहास माहीत नाही

हे जे कोणी अलिबागबद्दल बोलतात त्यांना कदाचित अलिबागचा इतिहास माहीत नाही. अलिबागचा आधी अभ्यास करुन या. अलिबागची संस्कृती यांना माहीत नाही,असे सांगत अमेय खोपकर पुढे म्हणाले की, एकदा का अलिबागकरांचे डोके फिरले की, तर हा शो चालू देणार नाही. इतकंच नाही तर हिंदीतील कोणतेही शो चालू देणार नाही. अलिबागकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाही, याचा निषेध आहे. शिवाय निर्मात्यांनी अलिबागकरांची माफी मागावी असे देखील म्हटले आहे. त्यानंतर काहीच तासांमध्ये आदित्यच्या माफीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. जो अमेय खोपकर यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर पोस्ट केला आहे.

ADVERTISEMENT

भाभीजी घर पे है’ मालिका सोडली की नाही यावर नेहा पेंडसेची प्रतिक्रिया

आदित्य नारायणच्या तक्रारी

आदित्य नारायणबद्दल बोलताना अमेय खोपकर  म्हणाले की, आदित्यचा उद्धटपणा वाढत चालला आहे. त्याच्या अनेक तक्रारी या आधीही समोर आलेल्या आहेत. पण आता अलिबागचा अपमान हा सहन केला जाणार नाही. त्यामुळे आदित्यने या गोष्टीचा विचार करणेही गरजेचे आहे. आदित्य नारायण हा  ज्येष्ठ गायक उदीत नारायण यांचा मुलगा आहे. त्याने अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. पण अनेकवेळा तो असा उद्धटपणा करताना दिसला आहे. ज्याचा परिणाम नक्कीच त्याच्या या कामांवर होणार आहे.इंडियन आयडॉलचा हा सीझन काहीही कारण नसताना चांगलाच गाजत आहे.  किशोर कुमार शो नंतर तर या शोची काहीही कारण नसताना चर्चा होत आहे. 

अभिजीत सावंतने दिली प्रतिक्रिया

काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉलचा विजेता अभिजीत सावंत याने देखील या रिअॅलिटी शो संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. त्याने हिंदी रिअॅलिटी शो या टॅलेंटपेक्षा गरिबीला अधिक महत्व देतात असा खुलासा केला होता. 

आता आदित्य नेमकी कशी माफी मागणार आणि मनसेची पुढील वाटचाल कारय असणार हे तर पुढच्या काही एपिसोडमध्ये नक्कीच कळेल.

ADVERTISEMENT

 

या कारणामुळे अमिषा पटेल इंडस्ट्रीमधून झाली बाहेर
 

24 May 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT