ADVERTISEMENT
home / मनोरंजन
सिनियर सिटीझन’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार मोहन जोशी

सिनियर सिटीझन’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार मोहन जोशी

पाठमोरी उभी असलेली सिनियर सिटिझन व्यक्ती आणि समोर दिसणारे तरूण असा हा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला होता. सिनियर सिटीझन आणि तरूण यांना एकत्र आणणारं काय रंजक कथानक या चित्रपटात असेल याचं कुतुहल निर्माण झालं आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे, अमृता पवार, स्नेहा चव्हाण, श्रुती बोराडीया,किरण तांबे, अमोल जाधव, गौरीश शिपूरकर, हर्षल पवार आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका असून यातील मुख्य भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता ही भूमिका कोण साकारणार हे स्पष्ट झालं आहे. आकर्षक फर्स्ट लुकमुळे लक्ष वेधून घेतलेल्या सिनियर सिटीझन या अजय फणसेकर दिग्दर्शित चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. 

‘बनवाबनवी’ चित्रपटातील या अभिनेत्याचा मुलगाही दिसतो त्याच्यासारखाच

मोहन जोशी दिसत आहेत दमदार लुकमध्ये

मोहन जोशी हे एक उत्कृष्ट अभिनेता असून त्यांचे अनेक चाहते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बर नट म्हणून नेहमीच त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता या नव्या मराठी चित्रपटामध्ये मोहन जोशी एका दमदार लुकमध्ये दिसत आहेत. चित्रपटाची कथा काय हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आता चित्रपटाची उत्सुकता नक्कीच वाढणार हे निश्चित. अजय फणसेकर यांनी आतापर्यंत केलेल्या दिग्दर्शनाची नेहमीच चर्चा होत आली आहे. त्यामुळे आता नावाप्रमाणे या चित्रपटात सिनियर सिटीझन्सची व्यथा मांडली जाणार की सिनियर सिटीझन्स कसं आपलं आयुष्य वेगळ्या तऱ्हेने जगतात हे दाखवलं जाणार याची चर्चा सध्या रंगली आहे. मात्र या चित्रपटाची नक्की काय कथा असेल ही अजूनही सांगण्यात आलेलं नाही. सध्या अनेक गोष्टी सिनियर सिटीझन्सच्या बाबतील महत्त्वाच्या असतात आणि त्यावर चर्चा होते.  पण नेमकी पावलं उचलली जात नाहीत. त्यामुळे या चित्रपटाचा नेमका विषय काय असेल यासंदर्भात सध्या सगळ्यांचीच उत्सुकता वाढली आहे. 

ADVERTISEMENT

गिन्नी शर्माच्या बेबी शॉवरचे फोटो व्हायरल, सेलिब्रिटींनी लावली हजेरी

ॐ क्रिएशन्सच्या माधुरी नागानंद, विजयकुमार नारंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. राजू सावला  क्रिएटिव्ह प्रोड्यूसर, प्रमोद मोहिते कार्यकारी निर्माते, बी. लक्ष्मण यांनी छायांकन आणि राकेश कुडाळकर यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. तर अभिजित नार्वेकर यांनी संगीत आणि नृत्य दिग्दर्शक म्हणून अमित बाईंगने काम पाहिले आहे.

 

मोहन जोशींची वेगळी भूमिका

मोहन जोशी गेले कित्येक वर्ष या इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, नाटक, मालिका यातून काम केलं आहे. पण प्रत्येकवेळी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मोहन जोशी नेहमीच वेगळ्या भूमिका साकारत असतात. त्यामुळे ‘सिनियर सिटीझन’ या चित्रपटातही त्यांची भूमिका नक्कीच आगळीवेगळी असेल असं सांगण्यात येत आहे. याशिवाय या चित्रपटामध्ये सुयोग गोऱ्हेदेखील आहे. सुयोग गोऱ्हेचे सध्या बरेच मराठी चित्रपट आल्यामुळे त्यालादेखील मराठी चित्रपटसृष्टीत ओळखलं जात आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झालेला ‘गर्लफ्रेंड’ मधील नच्याचा मित्र म्हणून सुयोग सगळ्यांच्याच लक्षात राहिला आहे. त्याशिवाय सुयोगचीही नक्कीच या चित्रपटातदेखील वेगळी भूमिका असेल असा अंदाज चाहते बांधत आहेत. नक्की हा चित्रपट काय घेऊन येणार आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 

ADVERTISEMENT

Bigg Boss 13: फॅक्टरी टास्कनंतर होणार फिनालेमध्ये डायरेक्ट एंट्री

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.

मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

16 Oct 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT