ADVERTISEMENT
home / मनोरंजन
ravrambha monalisa bagal

‘रावरंभा’ या ऐतिहासिक सिनेमात दिसणार अभिनेत्री मोनालिसा बागल

तमाम महाराष्ट्रातील जनतेच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील पवित्र, पांडवकालीन जागृत देवस्थान… भोर तालुक्यातील,आणि पुणे जिल्ह्यात असलेले, आपल्या साताऱ्यातील वाईपासून जवळच किल्ले रायरेश्वराचे स्थान. याच किल्ले रायरेश्वरावर शंभू महादेवाच्या साक्षीने, बाल शिवाजींनी आपल्या १२ सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ २६ एप्रिल १६४५ रोजी घेतली होती. तर हे सर्व सांगण्याचे उद्दिष्ट म्हणजे यावरच आगामी मराठी सिनेमा “रावरंभा” याची कथा आहे. आपल्या ऐतिहासिक शाहूनगरीतील पहिल्या ऐतिहासिक सिनेमाचे चित्रिकरण लवकरच सुरू होत आहे. 

अधिक वाचा – महाएपिसोडनंतर प्रेक्षकांचा संताप, येऊ कशी तशी मी नांदायला बंद करण्याची मागणी

पहिल्यांदाच ऐतिहासिक चित्रपटात काम करणार मोनालिसा

या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले तेव्हापासून या सिनेमाविषयी अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. आता या सिनेमाची उत्सुकता आणखी वाढणार कारण यातील एका प्रमुख कलाकाराची ओळख प्रेक्षकांसोबत होणार आहे. तर प्रेक्षकांसाठी सरप्राइज म्हणजे या सिनेमात अभिनेत्री मोनालिसा बागल प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. मोनालिसाला नेहमीच आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिले आहे. मात्र तिला कधीही कोणत्याही ऐतिहासिक भूमिकेत पाहिलेले नाही. त्यामुळे मोनालिसाची या चित्रपटामध्ये नक्की कोणती ऐतिहासिक भूमिका असणार आणि तिचा या भूमिकेचा लुक कसा असेल याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना वाटू लागली आहे. मोनालिसाचा चेहरा हा अत्यंत अवखळ आणि तितकाच शांत असा आहे. त्यामुळे नक्की कोणत्या भूमिकेत तिचा हा चेहरा परफेक्ट फिट बसेल याचाही आता अंदाज बांधला जात आहे. तसंच या चित्रपटाची नक्की कथा काय आहे आणि आता कोणत्या वेगळ्या बाजाचा ऐतिहासिक चित्रपट पाहायला मिळणार याचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आपल्याकडे नेहमीच शिवराय आणि इतिहासकालीन चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो. पण त्याची कथा आणि कलाकारांची निवडदेखील त्यामध्ये महत्त्वाची असते. त्यामुळे मोनालिसासह आता या चित्रपटात अजून कोणत्या कलाकारांची फौज आहे हे पाहणं अधिक औत्सुक्याचे ठरणार आहे. 

अधिक वाचा – अफगाणी क्रिकेटपटूशी अर्शी खान करणार होती लग्न, पण…

ADVERTISEMENT

पूजन सोहळा झाला

नुकतंच या बहुचर्चित, महत्त्वाकांक्षी सिनेमाचा स्क्रिप्ट पूजन सोहळा नुकताच पार पडला आहे. या प्रसंगी प्रताप दादा गंगावणे, अनुप जगदाळे,अभिनेत्री मोनालिसा बागल, ‘थोर इतिहासकार भोर’चे दत्ताजी जगदाळे, उद्योजक मंगेश दादा जाधव, अभिनेत्री अश्विनी बागल , ‘धर्मवीर युवा मंच’चे अध्यक्ष प्रशांत नलावडे, निर्माते शशिकांत शिला भाऊसाहेब पवार यांच्यासह संपूर्ण टीम उपस्थित होती. चित्रपटात नामवंत कलाकार असून इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत. लवकरच या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे पटकथा संवाद लेखन प्रताप दादा गंगावणे यांचे असून  अनुप जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत. सातारा शहरातील आणि भारतातील प्रसिद्ध टॉप गियर ट्रान्समिशन प्रा. ली. चे संचालकशशिकांत शिला भाऊसाहेब पवार हे ,शशिकांत पवार प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्था द्वारे या क्षेत्रात पदार्पण करत आहेत. तर पहिलाच चित्रपट ऐतिहासिक करत असल्यामुळे आता या चित्रपटाची नेमकी कथा आणि संवाद आणि इतर सगळ्या गोष्टी कशा जुळून येणार याकडेही प्रेक्षक आणि चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. 

अधिक वाचा – अभिनेता शाहीर शेखच्या पत्नीचे झाले बेबीशॉवर, सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT