ADVERTISEMENT
home / बिग बॉस
शेवटचा सीझन गेला रडवून

बेला चाओ… म्हणत रडवून गेला ‘Money Heist’ चा शेवटचा सीझन

 काही सीरिज संपाव्या अशा कधीच वाटत नाही. अशीच सगळ्यांना आवडलेली सीरिज म्हणजे ‘Money Heist’ अगदी दोनच दिवसांपूर्वी ही रिलीज सगळ्या जगभरात रिलीज झाली आणि अगदी तासाभरात सगळ्यांनी याचे पाच एपिसोड पाहिले. पण आता हा सीझन संपल्यामुळे अनेकांचे मन हळहळले आहे. खूप जणांना आता पुढे काय? असे विचारावेसे वाटणार नाही. कारण या सीरिजचा शेवट झाला आहे.  रॉयल मिंटची सगळ्याच मोठी सोन्याची चोरी यशस्वी झाली की नाही याची उत्कंठा शिगेला पोहोचली असताना आता याचा शेवट उघडकीस आल्यामुळे अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी मिश्र भावना उमटत आहेत. कारण अजूनही ही सीरिज यावे असे अनेकांना वाटत आहे. काय झाला या चोरीचा अंत घेऊया जाणून

अशी झाली चोरी आणि मिळाले यश

रॉयल मिंटमधील सोनं चोरण्यासाठी गेलेले सगळे आत अडकले होते. तेथून बाहेर पडण्यासाठी सुरु असलेली धडपड सगळ्यांनी पाहिली होती. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्कंठा शीगेला पोहोचली होती. कर्नल तमायोने खेळ करुन रॉयल मिंटमधील सगळे बॉम्ब डिफ्युज केले आणि हल्ला करण्यासाठी सज्ज झाले होते. याची जाणीव प्रोफेसरला होऊ शकली नाही. कारण एलिसियाने हुशारीने प्रोफेसरला शोधून काढले होते. त्यामुळे बऱ्याच गोष्टी या हातातून निसटत चाललेल्या होत्या. सीरिजमध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे आता सोनं गेलं आणि सगळे पकडले गेले अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सीझनच्या शेवटच्या काही भागात हातातून निसटलेले सोनं आणि त्याला मिळवण्याची धडपड दिसून आली. इतकंच नाही तर सोन्याची चोरी करुनही त्यातून सन्मानाने बाहेर पडलेले चोर दिसून आले. एक वेळ तर अशी परिस्थिती निर्माण झाली की, असं वाटलं बस्सं सगळं संपलं आता. सगळे इथेच मरणार! पण जिथे प्रोफेसर तिथे असं अजिबात होत नाही. त्यामुळे शेवट हा थोडा समाधान देणारा आणि काहीसा रडवणारा असाच होता. 

उर्फी जावेदच्या फॅशनचा नेटकऱ्यांना येऊ लागलाय वीट

खऱ्या खुऱ्या प्रोफेसरने दिली ही माहिती

नुकताच या सीझनचा ग्रँड प्रिमिअर पार पडला. यावेळी या सीरिजमधील अनेक कलाकारांसोबत मुलाखती झाल्या. या खेळातला मास्टर माईंड प्रोफेसर म्हणजे सरगियो अर्थात अभिनेता अल्वारो मार्ते याने एका मुलाखती दरम्यान सीरिज संपण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. एखादी चोरी किंवा तोच तोचपणा झाला की, लोकांनाही कंटाळा येतो. त्यामुळे योग्य वेळी काही गोष्टी संपणे हे खूप गरजेचे असते. सीरिजच्या लोकांनी हा निर्णय योग्य वेळी घेतला असल्याचे त्याने सांगितले. इतकेच नाही. तर त्याने तमाम जनतेचे आभार मानत प्रेम दिल्याचे देखील सांगितले. 

ADVERTISEMENT

चोरांना आली किंमत

चोरांबद्दल आपल्या मनात कायम द्वेष असतो. पण या चोरांना पाहिल्यानंतर त्यांच्या प्रेमात पडावेसे वाटणार नाही असे मुळीच होणार नाही. हे चोर कोणत्याही सामान्य नागरिकाला लुटणारे नव्हते. तर देशालाच लुटत होते. देशातील सगळ्यात महागडी संपत्ती म्हणजेच सोनं लुटणे किंवा पैसा छापून घेणे या गोष्टी त्यांनी केल्या. पहिल्या चोरीमध्ये इच्छित पैसे छापून होईपर्यंत त्यांनी हार मानली नाही. त्यावेळी बर्लिनचा जीव गेला. तर त्यानंतर मॉस्को, नायरोबी, टोकियो असे काही आवडीचे कलाकार एकामागोमाग गेले. त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल खूप प्रेम वाटत राहिले. चोरांना इतके प्रेम मिळेल हे त्यांनी देखील कधी विचारात आणले नव्हते. 

आता ही सीरिज संपली तरी देखील प्रोफेसर आणि त्याची ही सगळी टीम त्याच्या फॅन्सच्या डोक्यातून काही केल्या जाणार नाही हे नक्की

Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात होणार पुन्हा राडा

06 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT