ADVERTISEMENT
home / आरोग्य
Monsoon Eye Care Tips in Marathi

पावसाळ्यात डोळ्यांची निगा राखण्यासाठी फॉलो करा तज्ञ्जांचा सल्ला 

पावसाळा म्हणजे आनंद, मजामस्ती आणि पावसाळी पिकनिक असा अनेकांचा समज असतो. पावसाळ्यात आल्हाददायक वातावरण असल्यामुळे अनेकांना पावसाळा खूप आवडतो. मात्र या काळात जर आरोग्याची नीट काळजी घेतली नाही तर अनेक आजारपणे डोकं वर काढतात. कारण पावसाळ्यातील ओलावा, चिखल आणि आर्द्रतेमुळे जीवजंतू या काळात सहज पोसले जातात. म्हणूनच पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांची साथ पसरते. पावसाळ्यात डोळ्यांचे आजारही मोठ्या प्रमाणावर पसरतात. यासाठीच जाणून घ्या डोळ्यांचे आजार व उपचार जाणून घ्या (Eye Problems In Marathi), डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी उपाय (How To Improve Eyesight In Marathi), डोळ्यांचे दुखणे कमी करण्यासाठी सोपे डोळे दुखणे घरगुती उपाय (Home Remedies For Eye Pain) तसंच पावसाळ्यात डोळ्यांची निगा राखण्यासाठी मुंबईतील डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या सल्लागार आणि नेत्रविकार तज्ञ्ज डॉ. स्नेहा मधुर कंकरिया यांनी तुमच्यासाठी खास सल्ला दिलेला आहे. यासाठीच पावसाळ्यात डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत तज्ञ्जांनी दिलेल्या या टिप्स शेअर करत आहोत.

पावसाळ्यात डोळ्यांची निगा राखण्यासाठी तज्ञ्जांचा खास सल्ला

पावसाळ्यात डोळ्यांचे आजार पसरू नयेत यासाठी तुम्ही डोळ्यांची अशी काळजी घेऊ शकता. यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या डोळ्यांचे आरोग्य नक्कीच जपले जाईल.

स्वच्छता राखा

स्वच्छता राखणे पावसाळ्यात अतिशय अत्यंत महत्त्वाचे आहे यासाठी तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू इतरांसोबत शेअर करू नका. डोळ्यांना स्पर्श करू नका अथवा चोळू नका, कारण तुमच्या हातावर हजारो जीवाणू असतात, जे हाताच्या माध्यमातून तुमच्या डोळ्याला संसर्ग करू शकतात.

पाणी साचलेल्या जागा टाळा

पावसाळ्यात शक्य असल्यास पाणी साचलेल्या ठिकाणी जाणे टाळा. वाहत्या पाण्याजवळ फिरण्यास अथवा पिकनिकला जाण्यास काहीच हरकत नाही. मात्र रस्ते अथवा खड्यांजवळील साचलेल्या पाण्याजवळ जाऊ नये, कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी मोठ्या प्रमाणावर असू शकते. ज्याचा स्पर्श तुमच्या शरीराला झाल्यास डोळ्यांसोबतच इतर त्वचेचे विकारही होण्याचा धोका असतो.

ADVERTISEMENT

कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना

पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यायला हवी. शक्य असल्यास या काळात कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरणे टाळावे. कारण त्यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. अशा वेळी पावसाळ्यापुरता चष्मा वापरण्यास काहीच हरकत नाही. जर कॉन्टॅक्ट लेन्स वापरायचे असतील तर ते हाताळताना नेहमी हात धुवावेत. कॉन्टॅक्ट लेन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशनच्या मुदतसमाप्तीच्या तारखेवर लक्ष ठेवावे.

डोळ्यांना संसर्ग झाल्यास…

कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे), रांजणवाडी, कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे डोळ्यांचे संसर्गजन्य आजार आहेत. जर तुमचे डोळे लाल झाले, चिकट द्रव बाहेर येथ असेल, डोळ्यातून पाणी येत असेल, वेदना होत असतील, दृष्टी धुसर झाली असेल तर तातडीने नेत्रविकारतज्ज्ञांचा सल्ला घ्या. ओव्हर द काउंटर औषधे डॉक्टरांचा सल्ला न घेता मुळीच घेऊ नका.

डोळ्यांची नियमित काळजी घेण्यासाठी टिप्स

डोळ्यांची नियमित काळजी घेण्यासाठी तुम्ही काही गोष्टी काळजीपूर्वक कराव्या. जसं की तुमच्या डोळ्यावर पाण्याचे हबके मारणे टाळावे, कारण त्यात डोळे चुरचुरवणारे घटक असू शकतात. डोळ्यांचा संसर्ग झाल्यास हात पुसायचे टॉवेल वा नॅपकीन शेअर करू नयेत. डोळ्याला संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करू नये कारण त्यामुळे दुसऱ्या डोळ्याला आणि दुसऱ्या व्यक्तींनाही संसर्ग होऊ शकतो.पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी सकस आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक असू शकतात. डोळ्यांचाअ मेकप टाळावा कारण पावसाळ्यात संसर्गांसाठी तो उत्प्रेरक ठरू शकतो.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
04 Jul 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT