ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
sunlight benefits

सकाळच्या सूर्याच्या किरणांचे त्वचेसाठी काय आहेत फायदे

सकाळी लवकर उठण्याचे फायदे केवळ आरोग्यासाठीच होत नाहीत तर त्वचेसाठीही सकाळी लवकर उठण्याचा फायदा होतो. प्रत्येक घरामध्ये आई सहसा लवकर उठण्यासाठी मागे लागलेली असते. सकाळच्या सूर्याच्या किरणांमध्ये विटामिन डी असते जे तुमच्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्वचेला फायदे नक्की काय होतात हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. सकाळची सूर्याची किरणे ही आपल्या त्वचेसाठी खूपच चांगली असतात. सकाळचे ऊन हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये किमान अर्धा तास बसल्यामुळे शरीरातील हाडे अधिक मजबूत होतात. तसंच शरीरातील रोगप्रतिकारकक्षमता अधिक वाढते आणि त्याशिवाय पांढऱ्या पेशीही वाढतात. आजाराशी लढण्यास अधिक मदत मिळते. त्वचेचे विकार बरे करण्याचे अनेक गुणधर्म सकाळच्या सूर्याच्या किरणांमध्ये अर्थात कोवळ्या उन्हात असतात. त्यामुळेच अगदी नवजात बाळालाही जन्मानंतर रोज कोवळ्या उन्हात किमान 10-15 मिनिट्स ठेवले जाते. मोठ्या माणसांसाठीदेखील सकाळची सूर्याची किरणे ही अधिक महत्त्वाची असतात आणि त्यामुळे शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. हेच फायदे आपण या लेखातून जाणून घेऊया. 

चमकदार त्वचा 

प्रदूषण आणि थकवा यामुळे त्वचा अधिक निस्तेज आणि निर्जिव दिसते. सकाळच्या उन्हात अर्थात सूर्याच्या किरणांमुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे त्वचेवरील तेजस्वीपणा अधिक वाढतो. सकाळी लवकर उठण्यामुळे आणि चालण्यामुळे त्वचेवरील पोर्स खुले होतात आणि त्यामुळे त्वचा अधिक चमकदार होते आणि त्वचेला अधिक उजाळा मिळतो. 

हार्मोनल अ‍ॅक्ने 

प्रत्येक 10 मधील किमान 4 महिला या हार्मोनल अ‍ॅक्नेच्या समस्येमुळे त्रस्त आहे. सकाळी लवकर उठून हार्मोनल अ‍ॅक्नेची समस्या तुम्ही घालवू शकता. सकाळी लवकर उठण्याने आणि रात्री लवकर झोपण्याने तुमची लाईफस्टाईल नीट होते, जेव्हा तुमची लाईफस्टाईल ठीक होते तेव्हा तुमची ही समस्या लवकर नीट होते. सकाळच्या सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेला व्हिटामिन डी मिळते आणि त्यामुळे त्वचेवरील अ‍ॅक्ने जाण्यास मदत होते. 

एक्झिमा नीट करते सूर्याचे पहिले किरण

एक्झिमा ही एक स्वरूपाची त्वचेची समस्या आहे. ही त्वचेची समस्या सूर्याच्या पहिल्या किरणांमुळे तुम्हाला नक्कीच नीट करता येतो. सूर्याचे अल्ट्रा व्हायलट किरण शरीरातील एक्झिमा नीट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. एक्झिमा ठीक करण्यासाठी सकाळच्या उन्हामध्ये तुम्ही किमान अर्धा तास तरी तुम्ही बसायला हवे. सकाळी 5 वाजता उठून तुम्ही जेव्हा चालायला जाता तेव्हा तुम्हाला याचा फायदा मिळतो. कारण सकाळची पहिली किरणे तुमच्या त्वचेसाठी लाभदायक ठरतात. 

ADVERTISEMENT

ताजी त्वचा 

सूर्याची पहिली किरणे ही आरोग्यासह तुमच्या त्वचेसाठीही महत्त्वाची असतात. सकाळच्या उन्हामुळे रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे ऑक्सिजनही वाढतात. यामुळे तुमची त्वचा ताजी आणि चमकदार दिसते. सकाळी लवकर उठल्यामुळे कोलेजनचे प्रमाण वाढते आणि त्वचा अधिक चमकते आणि त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसते. निस्तेज दिसत नाही. प्रदूषण आणि इतर गोष्टींमुळे त्वचेला नेहमी हानी पोहचत असते. त्यामुळे त्वचा ताजी ठेवण्यासाठी अनेक उत्पादनांचा वापर चेहऱ्यावर करण्यात येतो. त्वचा अधिक तरूण दिसावी यासाठी वेगवेगळी उत्पादने वापरण्यात येतात. मात्र त्यापेक्षा तुम्ही रोज कोवळ्या उन्हात सकाळी मॉर्निंग वॉक केले तर तुमच्या त्वचेसाठी याचा फायदा मिळतो. सकाळी लवकर उठून चालण्याचेदेखील हे फायदे आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

01 Dec 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT