सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ या कथेवरून तयार करण्यात आलेली वेबसिरीज समांतर सर्वांनाच भावली. पहिल्या सिरीजमध्ये प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात सर्वच कलाकार आणि दिग्दर्शक यशस्वी झाले होते. तर याचा पुढचा सीझन कधी येणार याची प्रतीक्षा सर्वांनाच होती. आता अखेर ही प्रतीक्षा संपली असून ‘समांतर’ च्या पुढच्या सीझनचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून अगदी कमी वेळात या टीझरला तुफान प्रतिसाद मिळाला आहे. स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाने सजलेली ही वेबसिरीज म्हणजे प्रेक्षकांसाठी अभिनयाची पर्वणीच आहे. आता पुढे नक्की काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. पुस्तक वाचलेले असले तरीही या सिरीजमधून ती उत्सुकता ताणून धरण्यात सर्वच यशस्वी झाले आहेत.
खतरों के खिलाडी’च्या स्पर्धकाला झाला कोरोना, चित्रीकरण थांबले
सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार महाजन पुन्हा आमनेसामने
समांतरच्या पहिल्या सिरीजमध्ये कुमार महाजनची व्यक्तिरेखा साकारणारा स्वप्नील जोशी सुदर्शन चक्रपाणी अर्थात नितीश भारद्वाजपर्यंत येऊन पोहचलेला सर्वांनीच पाहिला आहे. पण आता या दोघांचे समांतर आयुष्य नक्की कोणते वळण घेणार आणि पुन्हा आमनेसामने येऊन सुदर्शन चक्रपाणीचे समांतर आयुष्य कुमार महाजनच्या आयुष्यात काय वादळ आणणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक अत्यंत आतुर आहेत. चक्रपाणीचा भूतकाळ हाच कुमारचा भविष्यकाळ असणार आहे आणि त्याबाबत सर्व माहिती सुदर्शनने डायरीमध्ये लिहून या सर्व डायरी कुमारला दिल्या आहेत. मात्र रोज एकच पान वाचत केवळ दुसरा दिवसच जाणून घ्यायचा अशी अटही सुदर्शनने कुमारला घातली आहे. त्यामुळे आता त्याच्या भविष्यात नक्की काय वाढून ठेवलं आहे ही उत्कंठा नक्कीच प्रेक्षकांना लागून राहिली आहे आणि तीच उत्कंठा वाढवणारा हा दुसऱ्या सीझनचा ट्रेलर आहे असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. स्वप्नील जोशी पहिल्यांदाच अशा भूमिकेत दिसत असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा अभिनय सर्वांनीच केला आहे. बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकदा नितीश भारद्वाज यांना त्यांच्या चाहत्यांनी एका वेगळ्या भूमिकेत पाहिले आहे. मनोरंजक वळणावर आलेली ही कथा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नक्कीच या वेबसिरीजला तुफान प्रतिसाद मिळेल अशी सर्वांना आशा आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या घरात येणार नवा भाडोत्री, भाडं ऐकून बसेल धक्का
दुसऱ्या सीझनच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांसवर
समांतर 2 ची टीझर प्रदर्शित झाला असून 21 जून रोजी याचा ट्रेलर प्रदर्शित होईल. त्यामुळे आता यामध्ये नक्की काय काय दाखवण्यात येणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. या वेबसिरीजच्या पहिल्या भागाचे दिग्दर्शन हे सतीश राजवाडेने केले होते. तर आता दुसऱ्या सीझनच्या दिग्दर्शनाची धुरा समीर विद्वांसने सांभाळली आहे. दोन्ही अप्रतिम दिग्दर्शक असून दुसऱ्या सीझनमध्येही तितकेच उत्कंठावर्धक कथानक असेल अशी आशा प्रेक्षकांना आणि चाहत्यांना आहे. स्वप्नील जोशी आणि नितीश भारद्वाज यांच्या अभिनयाची जुगलबंदी तर तेजस्विनी पंडितचा तितकाच भारदस्त अभिनय हेदेखील या सिरीजचे वैशिष्ट्य आहे. केवळ दोन व्यक्तींच्या आयुष्याभोवती फिरणारे हे कथानक अत्यंत वेगळे असून प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. त्यामुळेच याच्या दुसऱ्या सीझनची आतुरतेने प्रेक्षक वाट पाहत आहेत. सोशल मीडियावर या वेबसिरीजच्या टीझरने एकाच दिवसात धुमाकूळ घातला आहे.
तापसीच्या मते या तीन अभिनेत्री आहेत बॉलीवूडच्या खऱ्या स्टार्स
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक