काही जण ही फारच कंटाळवाणी किंवा बोअर असतात. त्यांना तुम्ही कितीही टोमणे मारले तरी त्यांचे कंटाळवाणे वागणे ते सोडत नाही. हा त्या व्यक्तीचा नाही तर त्यांच्या राशीचा दोष असतो. तुमच्याही आजुबाजूला अशी काही कंटाळवाणी लोकं आहेत का? कदाचित त्यांची रासही त्यांच्या या स्वभावासाठी कारणीभूत असू शकते. 12 राशींपैकी 6 राशी अशा आहेत ज्या तुलनेनं कंटाळवाण्या आहेत.
जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना येतो पटकन राग
कुंभ
पाण्याचा घडा हे कुंभ राशीचे राशी चिन्ह. कुंभ राशीच्या व्यक्तींना कोणत्याही गोष्टीचा लगेच कंटाळा येतो. त्यांना त्यांच्याच कोषात राहायला आवडते. त्यामुळे ही व्यक्ती इतरांना नेहमीच कंटाळवाणी वाटते. तुम्ही आतापर्यंत कोणत्याही अशा कुंभ राशीच्या व्यक्तीला भेटला आहात जी तुम्हाला फार उत्साही आहे. नाही ना? या व्यक्ती कधीच काही वेगळं करायला पाहत नाही. ते फार उत्साह कोणत्याही नव्या गोष्टीत अजिबात दाखवत नाही.
*उदा. पाणी जसे थंड असते अगदी तशाच या व्यक्ती असतात.समजा त्यांच्याकडे त्यांचा फोन आणि त्यात चांगले गाणे असेल तर ते गाणे ऐकत एका कोपऱ्यात बसतील. मग ते कोणाशीही बोलणार नाही.
तूळ
तूळ या राशीचे राशीचिन्ह तराजू आहे. त्यामुळे या राशी सगळ्याच गोष्टी तोलत बसतात. त्यांना त्यांच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी बॅलन्स करायच्या असतात. त्यामुळे ही लोकं अनेकदा सगळ्या गोष्टी बॅलन्स करताना ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींना वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्तींसोबत राहणाऱ्यांना या व्यक्तींच्या कंटाळवाण्या वागण्याचा कंटाळा येतो.
*उदा. तुम्ही या व्यक्तीला कोणतेही काम द्या ते अगदी नेटाने पूर्ण करतील.पण जर तुम्ही या व्यक्तींना एखादी पार्टी, गिफ्ट किंवा एखादे सरप्राईज प्लॅन करायला सांगा. त्यांना ते जमत नाही. त्यापेक्षा त्यांना समोरच्या व्यक्तीला विचारुनच द्यायला आवडते. त्यांच्या याच स्वभावामुळे अनेकांना ते बोअर वाटतात.
चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर कुणाल खेमू करतोय वेबसिरीजमध्ये काम
मीन
मीन राशींच्या व्यक्तींचे राशी चिन्ह आहे मासा. मासा चंचल असला तरी तो तसा शांत असतो. या लोकांना कधीच कोणत्या गोष्टीत रस नसतो. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात हे नकाराने करतात. ही रास रडकी असते असे म्हणायला हवे. कारण त्यांच्या या स्वभावामुळेच लोकांना ही रास खूप कंटाळवाणी वाटते.
*उदा. मीन राशीच्या व्यक्तींन काहीतरी नवे काहीतरी वेगळे करायला सांगा त्या पहिल्यांदा असा काही चेहरा करतील की तुम्हाला कळून चुकेल की, या कंटाळवाण्या आहेत.
मेष
मेष राशीचे राशीचिन्ह आहे मेंढा. मेंढा हा जितका रागीट आहे असे म्हटले जाते. तितक्याच या राशीच्या व्यक्ती बोअर असतात असे म्हटले जाते. या राशीच्या व्यक्तींना एखादी गोष्ट करायला सांगितली आणि जर ती त्यांच्या आवडीची नसेल तर त्या व्यक्ती अजिबात ती गोष्ट करायला जात नाही. जो पर्यंत ती गोष्ट त्यांना करायची नसते. तो पर्यंत ते करणार नाही.
*उदा. तुम्ही त्यांना काही खासगी कारणासाठी फोन करायला सांगितला. त्यांना ते महत्त्वाचे वाटले नाही तर ती व्यक्ती तुम्हाला फोन करणार याची अपेक्षाच तुम्ही ठेवू नका. किंवा तुम्ही एखादा बाहेर जायचा प्लॅन केला तर ही व्यक्ती त्या ठिकाणी येईलच असे नाही.
म्हणून एकता कपूर करत नाही मुलाचे फोटो शेअर
वृश्चिक
वृश्चिक राशीचे राशीचिन्ह विंचू आहे. या राशीच्या व्यक्ती जितक्या परफेक्ट असतात. तितक्या त्या बोअर असतात असे म्हटले जाते. या राशीच्या व्यक्तींच्या वेळा या ठरलेल्या असतात. त्यांना ठराविक वेळीच काही गोष्टी करायला आवडतात. त्यामुळे अनेकदा या लोकांमुळे तुमचे प्लॅन रद्द होऊ शकता. त्यामुळेची ही व्यक्ती कंटाळवाणी वाटू शकते.
*उदा. तुम्ही 4 वाजता बाहेर शॉपिंगला जाण्याचा एखादा प्लॅन करता.जर तुम्हाला उशीर झाला तर या व्यक्ती कधीकधी प्लॅन रद्द करतात. ज्यावेळी तुम्हाला काही बाहेरचे खायची इच्छा असते नेमकं त्याच दिवशी त्यांना घरचे खायची इच्छा होते.
वृषभ
वृषभ राशीचे राशी चिन्ह आहे बैल. या राशीच्या व्यक्तीला फार काही करायला आवडत नसते. म्हणूच या व्यक्ती फारच बोअर वाटतात. त्या विशेष असे काहीच करत नाही. त्यामुळेच या व्यक्तींबाबत लोकांना फार काही लक्षात राहत नाही.
*उदा. वृषभ राशीच्या व्यक्तींना एखादा सल्ला अजिबात विचारु नका. कारण त्यांना स्वत:च असं काही मत नसते. त्यामुळे तुम्हाला या व्यक्तींकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही.
बघा तुमच्या ओळखीचेही आहे का असे कंटाळवाणे.. मग त्यांची ही रास ही असणार असण्याची शक्यता आहे.