नातीगोती

मदर्स डे कोट्स मराठीतून (Mothers Day Quotes In Marathi)

Dipali NaphadeDipali Naphade  |  May 3, 2021
Mothers Day Quotes In Marathi

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ हे आपण नेहमीच म्हणतो. खरं आहे, आई आजूबाजूला नसेल तर काहीच सुचत नाही. बाहेरून घरात आल्यानंतर सर्वात पहिली हाक मारली जाते ती आईला. सर्वात पहिले नजर शोधू लागते ती घरात आईला. बाकी कोणी घरात आहे की नाही हे सर्वात पहिले डोक्यात येतच नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरी आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. अशाच आईसाठी या मदर्स डे (Mothers Day) ला तुम्ही हटके शुभेच्छा द्या. आईसाठी शुभेच्छा (mothers day wishes in marathi) देताना, आईला मेसेज पाठवताना (mothers day msg in marathi) मदर्स डे कोट्स (mothers day quotes in marathi) खास तुमच्यासाठी आम्ही मराठीतून आणले आहेत. यावर्षी मदर्स डे साठी खास स्टेटसही (mothers day status in marathi) तुम्ही आपल्या आईसाठी ठेऊ शकता. आईबद्दल तुमचे काय विचार आहेत (mothers day thoughts in marathi) हेदेखील आपल्या आईला तुम्ही या मदर्स डे ला नक्की सांगा. 

आईसाठी खास मराठीतून मदर्स डे कोट्स (Mothers Day Quotes In Marathi)

Mothers Day Quotes in Marathi

Mothers Day Quotes in Marathi

या मदर्स डे च्या निमित्ताने काही खास मदर्स डे कोट्स तुम्ही तुमच्या आईसाठी नक्कीच लिहू शकता. आईसाठी प्रेम व्यक्त करणं बऱ्याचदा जमत नाही. म्हणूनच आजचा हा खास दिवस आहे. तुम्हीही तुमच्या आईसाठी प्रेम व्यक्त करा. आई तुला बऱ्याचदा थँक्स म्हणायचंही राहून जातं कारण आम्ही तुला खूपच गृहीत धरतो. मग आजचाच तो दिवस आहे जेव्हा तुम्ही तुमच्या आईसाठी या कोट्सद्वारे प्रेम व्यक्त करू शकता. 

1. आई ही एकच अशी व्यक्ती आहे 
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे 
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!
मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे….आई कायम हसत राहा
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

3. ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

4. तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी 
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

5. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर 
मातृदिनाच्या शुभेच्छा आई!

6. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

7. आयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

8. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते 
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …Happy Mothers Day

9. हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मला तूच हवीस….हॅप्पी मदर्स डे आई!!!

10. विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतशः प्रणाम आई…Happy Mothers Day

11. आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका 

12. जगात असे एकच न्यायालय आहे, 
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
मातृदिनाच्या शुभेच्छा!

13. व्यापता न येणारं अस्तित्व 
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …Happy Mothers Day

14. मरणयातना सहन करूनही
आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई…Happy Mothers Day

15. कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई…Happy Mothers Day

16. आई असते तुमची पहिली मैत्रीण, तुमची घनिष्ठ मैत्रीण आणि कायमची एकमेव मैत्रीण

17. जेव्हा तुम्ही तुमच्या आईकडे पाहता… तेव्हा जगातील सगळ्या शुद्ध गोष्टीकडे तुम्ही पाहता-  चार्ली बेनेटो

18. आईपण हे एखाद्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकते- ऑलिव्हर होम्स

19. फक्त आईच भविष्याचा विचार करु शकते कारण ती एका नव्या जीवनाला आयुष्यात आणत असते- मॅक्झिम ग्रोस्की

20. जे तुम्ही बोलू शकत नाही, ते न बोलता समजून घेते आई- ज्युईश प्रोवर्ब

21. प्रेमामुळे आपण जन्मलो, हे प्रेम म्हणजे ‘आई’- रुमी

22. आईची मिठी ही इतर कशापेक्षाही अधिक आरामदायी असते- प्रिन्सेस डाएना

23. आई ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्या ह्रदयात सगळ्यात आधी जाऊन बसते-  अॅमी टॅन 

24. आईचे प्रेम हे कोणत्याही नव्या फुललेल्या फुलांपेक्षाही अधिक सुगंधित असते-  देवाशिष मृधा

25. दिवस सुरु होतो तुझे गोड तोंड पाहून- जॉर्ज इलिएट

वडिलांसाठी मराठीतून कोट्स

मदर्स डे स्टेटस मराठीतून (Mothers Day Status In Marathi)

Mothers Day Status in Marathi

Mothers Day Status In Marathi

हल्ली कोणताही दिवस आला की, व्हॉट्स अॅपवर स्टेटस ठेवणंही तितकंच महत्वाचं ठरतं, नाही का? तुमच्या आईसाठी या मदर्स डे ला तुम्हाला जर अप्रतिम स्टेटस ठेवायचा असेल तर काही खास स्टेटस तुमच्यासाठी. मदर्स डे साठी काही खास एसएमएसही (Mothers Day msg in Marathi) (Mothers day sms in Marathi) आपण बनवतो. आईसाठी खास कविताही असतात.

1. आईची ही वेडी माया
लावी वेड जीवा 
जन्मोजन्मी तुझाच मी व्हावा 
माझ्या आयुष्यभराचा हाच खरा ठेवा 
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

2. देवाकडे एकच मागणे, भरपूर आयुष्य लाभो तिला
माझ्या प्रत्येक जन्मी, तिचाच गर्भ दे मजला….Happy Mothers Day

3. सोबत असेपर्यंत समोर दिसते,
नंतर मात्र कायम आपल्या आत असते…आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!

4. कुठेही गेले काहीही केले 
तरी माझा एकमेव आधार…आई 

5. ज्या माऊलीने दिला मला जन्म
जिने गायली अंगाई
आज मातृदिनाच्या दिवशी 
नमन करतो तुजला आई…Happy Mothers Day

6. तू आहेस म्हणून मी आहे
तुझ्याशिवाय माझे अस्तित्व बेकार आहे 
गृहीत तुला धरलं तरी माफ करतेस मला 
आहेसच तू मूर्तीमंत देवता…Happy Mothers Day

7. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस 
आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी 
आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…Happy Mothers Day

8. ज्याला आई असते तोच खरा भाग्यवान – मातृदिनाच्या शुभेच्छा!

9. एकमेव स्त्री जी माझा चेहरा बघायच्या आधीपासून माझ्यावर प्रेम करते 
आई तू आहेस म्हणूनच मी आत्मविश्वासाने जगू शकते – Happy Mothers Day

10. आई तुझ्याशी आहे असे अतूट नाते 
तू हसल्यावर मीदेखील हसते 
तुला उदास पाहिल्यावर
मन माझे रुसते
नेहमी राहा आनंदी, तुझ्यासाठी जिंकेन जग मी – Happy Mothers Day

11. नमस्कार न करताही आशिर्वाद देणारी जगातील एकमेव व्यक्ती – ती म्हणजे आई 

12. हीच इच्छा माझी की, कितीही वेळा होईल जन्म माझा
तूच हवीस कारण तू आहेस माझा जन्मोजन्मीचा ठेवा 

13. एकमेव कर्ज प्रत्येक माणसावर आयुष्यभर असतं
कारण ते कधीच फेडता येत नाही आणि ते म्हणजे आईचं प्रेम…
मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

14. ती असताना कधीच आयुष्यात उदासीनता येत नाही
कारण जगात कोणीही सोबत दिली नाही 
तरी ती मात्र खंबीरपणे सोबत असते…आई तुला माझे शतशः प्रणाम 

15. आई मी जन्मभर तुझा ऋणी आहे…Happy Mothers Day

मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Mothers Day Wishes In Marathi)

Mothers Day Wishes In Marathi

Mothers Day Wishes In Marathi

आईला या मदर्स डे च्या दिवशी न विसरता तुम्ही शुभेच्छा द्या. वर्षभर नक्कीच आपण आईला बरेचदा गृहीत धरतो. आपलं प्रेम आपण आईकडे व्यक्त करत नाही. पण असं करू नका. आईबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही तिला बोलून दाखवलंत तर तिला सर्वात जास्त आनंद मिळतो. त्यामुळे आईला मदर्स डे निमित्त द्या शुभेच्छा 

1. ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आई म्हणूनच मी आहे
ती आहे म्हणूनच ही सुंदर नाती आहेत
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

2. फुलात जाई, प्रार्थनेत साई
पण जगात सगळ्यात भारी आपली आई…Happy womens day

3. आई म्हणजे स्वर्ग
आई म्हणजे सर्व काही…
कितीही जन्म घेतले तरी
तुझे ऋण फेडू शकणार नाही – Happy Mothers Day

4. हजार जन्म घेतले तरी 
एका जन्माचेही ऋण फिटणार नाही 
आई लाख चुका होतील माझ्याकडून
पण तुझं समजावणं कधीच मिटणार नाही – Happy Mothers Day

5. दोन शब्दात सारं आकाश सामावून घेई 
मिठीत तिने घेता लहान वाटे भुई – आई तुला हॅप्पी मदर्स डे 

6. दुःखाचा डोंगर असो की सुखाची बरसात 
आठवते ती एकच व्यक्ती कायम जिचा हवा सहवास…अशीच ती आपली आई – Happy Mothers Day

7. जगी माऊलीसारखे कोण आहे 
तिचे जन्मजन्मांतरीचे ऋण आहे
असे हे ऋण ज्याचे व्याज नाही 
या ऋणाविना जीवनास साज नाही 

8. माझा विचार करणे जी कधीच सोडत नाही 
कितीही कामात असली तरीही मला फोन करायचे विसरत नाही
कितीही चिडलो तिच्यावर तरी ती माझ्यावर चिडत नाही
म्हणून तर आई मला तुला सोडून कुठेच जावेसे वाटत नाही – Happy Mothers Day

9. उन्हामधली सावली तू
पावसातली छत्री तू 
हिवाळ्यातली शाल तू 
माझ्यासाठी आहेस सर्वकाही तूच – आई Happy Mothers Day

10. माझ्या आयुष्याच्या अंधारात
ती मेणबत्तीसारखी वितळत राहिली – Happy Mothers Day

आईसाठी मदर्स डे मेसेज मराठीतून (Mother’s Day MSG In Marathi)

Mothers Day MSG In Marathi

Mothers Day MSG In Marathi

आईसाठी अजून काय काय करता येईल असा विचार करत असाल तर तिच्यासाठी या मदर्स डे ला काही खास मेसेज लिहा आणि तिला सरप्राईज द्या. असेच काही खास मेसेज आईसाठी 

1. तू माझी जिवलग मैत्रीण आहेस आहे.
मला हे आयुष्य दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
आणि तुला मदर्स डे च्या हार्दिक शुभेच्छा!

2. हंबरूनी वासराला जेव्हा चाटते गाय 
तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसते माझी माय – Happy Mothers Day

3. माझ्या हृदयात एकाच व्यक्तीला अढळ स्थान आहे
आणि ती म्हणजे तू आहेस आई – Happy Mothers Day

4. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला.
आई मी भाग्यवान आहे की,
मी तुझ्या पोटी जन्म घेतला – Happy Mothers Day

5. पूर्वजन्माची पुण्याई असावी जो जन्म तुझ्या पोटी घेतला
जग पाहिलं नव्हतं तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला
– आई मातृदिनाच्या शुभेच्छा!

6. मी कधी बोलत नाही किंवा कधी सांगत नाही.
पण आई तू या जगातील सर्वोत्तम आई आहेस 

7. सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तर तू आहेसच.
पण तू माझी आहेस याचा मला अभिमान आहे – Happy Mothers Day

8. माझ्यासाठी जिच्या मनात आणि ओठावर फक्त आशिर्वाद येतात…ती आहे माझी आई – Happy Mothers Day

9. आज मी जे काही आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या संस्कारांमुळेच. आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

10. जगात अशी कोणती गोष्ट आहे जी मिळत नाही
बाकी सर्व मिळू शकतं पण आई कधीच मागून मिळत नाही – Happy Mothers Day

11. हजार जन्म गेले तरी,
या एका जन्माचे ऋण कधीच फिटणार नाही,
आई लाख चुका होतील माझ्याकडून,
पण तुझं समजावणं काही मिटणार नाही, मातृदिनाच्या शुभेच्छा!

12. आई,
आमची सर्वप्रथम गुरु,
तुझ्याचपासून माझे अस्तित्व सुरु,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

13. आई तुझ्या संस्कारातून
कोवळ्या रुपाचे झाले तरु,
मी कसा गं विसरेन तुला,
तुझ्याचमुळे मी झालो यशस्वी,
मातृदिनाच्या गोड शुभेच्छा!

14. तिच्या मांडीवर डोकं ठेवून
अश्रूंना वाट मोकळी करुन द्यावीशी वाटते,
पण तिचे आलेले अश्रू आठवताच
मी मुक्याने माझे अश्रू गाळून टाकतो,
आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा

15. आई, आभाळाएवढी
माया जिची,
ईश्वरासमान कृपा तिची,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

16. तुझ्या गर्भात नक्कीच स्वर्ग असावा
म्हणूनच वाटे तुझ्या कुशीत घ्यावा विसावा,
समस्त मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा!

17. कोठेही न मागता भरभरुन मिळालेले
दान म्हणजे ‘आई’,
विधात्याच्या कृपेचे निर्मळ वरदान म्हणजे ‘आई’
मातृदिनाच्या शुभेच्छा!

18. देवा सुखी ठेव तिला,
जिने जन्म दिलाय मला,
आई तुला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

19. ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या ह्रदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी आई,
मातृदिनाच्या शुभेच्छा!

20. गुतंलेले तुझे हात
नेहमीच व्यस्त असतात कामात,
तुझी अंगाई ऐकावया,
घेऊन येई  रात्र,
मातृदिनाच्या शुभेच्छा

मदर्स डे निमित्त मराठीतून कॅप्शन (Mothers Day Caption In Marathi)

Mothers day caption in marathi

Mothers Day Caption In Marathi

मदर्स डे निमित्त मराठीतून तुम्हाला जर काही कॅप्शन हवे असतील तर तुम्ही नक्की या कॅप्शनचा वापर करू शकता. 

1. यशाच्या शिखरावर येण्यासाठी तूच माझी कायम प्रेरणा होतीस…आई तुझ्याशिवाय मी काहीच नाही – Happy Mothers Day 

2. तुझ्यासारखी आई मिळणं यापेक्षा अधिक काही मागूच शकत नाही 

3. मैत्रीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि चांगुलपणाचा अर्थ शिकवणारी पहिली व्यक्ती म्हणजे आई 

4. माझ्या आयुष्याचा प्रेमाचा झरा, प्रेरणेचा स्रोत आणि जगण्याचा मंत्र म्हणजे माझी आई – Happy Mothers Day

5. माझ्यासाठी कायम भक्कम उभी राहणारी व्यक्ती म्हणजे माझी आई – Happy Mothers Day

6. जगातील सर्वात सुंदर आणि प्रेरणादायी व्यक्तीला अर्थात माझ्या आईला मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

7. प्रेमाचा खरा अर्थ म्हणजे आई – Happy Mothers Day

8. आयुष्याची गणितं चुकल्यानंतरही हिशेब लावत नाही ती म्हणजे आई – Happy Mothers Day

9. माझ्या चुका माफ करून मला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. या मातृदिनी मी तुला कायम सोबत देईन हे वचन देतो 

10. कधीही दुरावा न देणारी व्यक्ती म्हणजे आई – Happy Mothers Day

You might also like

Mothers Day Status in Hindi
Mothers Day Quotes in Hindi
Mothers Day Poems in Hindi 
Diy Gifts for Mother’s Day in English