ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
मौनी रॉयचा साखरपुडा, फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत

मौनी रॉयचा साखरपुडा, फोटो व्हायरल झाल्याने चर्चेत

अभिनेत्री मौनी रॉय कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. लॉकडाऊनदरम्यान मौनी दुबईमध्ये अडकली होती. मात्र तिथूनच ती लंडनला चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेली. मात्र आता मौनी चर्चेत आली आहे ती एका वेगळ्याच कारणाने. मौनी दुबईमध्ये असताना तिच्या बोटात कोणतीही हिऱ्याची अंगठी नव्हती. मात्र आता तिच्या रिंग फिंगरवर एक हिऱ्याची अंगठी दिसली आहे. ही अंगठी पाहिल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मौनीने साखरपुडा तर केला नाही ना? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. मौनी नेहमीच आपल्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अपडेट करत असते.  पण आता हा फोटो पाहिल्यानंतर चाहतेही बुचकळ्यात पडते आहेत. 

मौनी लंडनमध्ये करत आहे चित्रीकरण

लंडनच्या रस्त्यावर अनेक व्हिडिओ आणि मस्ती मौनी शेअर करत असते. वास्तविक मौनी आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते. पण मौनीच्या अनामिकावर असणाऱ्या अंगठीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुबईला असताना मौनीच्या बोटात अशी कोणतीही अंगठी नव्हती. पण आता शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या अनामिकामध्ये अंगठी दिसल्याने आता सर्वांनाच मौनीने गुपचूप साखरपुडा तर उरकून घेतला नाही ना? असा प्रश्न पडला आहे. मौनीने आपल्या इन्स्टास्टोरीमध्ये एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये आपली मैत्रीण रोशनी चोप्राचे ती अभिनंदन करत होती. मात्र तिच्या बोटाकडे लक्ष गेल्यामुळे आता ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. मौनी नेहमीप्रमाणेच या व्हिडिओमध्ये सुंदर दिसत आहे. मात्र तिची अंगठी या व्हिडिओमध्ये इतकी चमकत आहे की, मौनीपेक्षा लक्ष त्या हिऱ्याच्या अंगठीकडे अधिक वेधलं जात आहे. त्यामुळे आता मौनीने स्वतःच स्वतःला ही अंगठी दिली आहे की, साखरपुडा केला आहे याची चर्चा सुरू झाली आहे.  

कपूर खानदानात जाणार करण जोहरची दुसरी ‘स्टुडंट’, नात्यावर केलं शिक्कामोर्तब

मौनीचं लव्ह लाईफ नेहमीच चर्चेत

मौनी या इंडस्ट्रीमध्ये गेले कित्येक वर्ष काम करत आहे. तिचं लव्ह लाईफही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. गौरव चोप्रापासून ते अगदी मोहित रैनापर्यंत मौनीने डेट केलेल्या व्यक्तींबद्दल नेहमीच चर्चा झाली आहे. मात्र कधीही मौनीने आपल्या नात्याचा स्वीकार केलेला नाही. मोहित रैनाशी मौनीचं ब्रेकअप झाल्याच्याही अनेक बातम्या काही महिन्यांपूर्वीच आल्या होत्या. त्यानंतर दिग्दर्शक अयान मुखर्जीसह मौनीचं नाव जोडलं गेलं. मात्र अयान आणि आपण  अतिशय चांगले मित्र असल्याचं मौनीनं स्पष्ट केलं होतं. इतकंच नाही तर अयानचं आपल्या आयुष्यात खूपच महत्त्वाचं स्थान असल्याचंही तिने सांगितलं होतं. मात्र आता मौनीकडून या अंगठीचं काय स्पष्टीकरण येतं याची तिचे चाहते वाट पाहात आहेत.  

ADVERTISEMENT

बाहुबलीतील भल्लालदेव अडकला लग्नाच्या बेडीत, फोटो झाले वायरल

लॉकडाऊनबाबतचा अनुभवही केला होता शेअर

यादरम्यान लॉकडाऊनबाबतचा अनुभवही मौनीने शेअर केला होता.  ‘मला नेहमी  फिरायला आवडत होतं. कारण मला प्रत्येक 15-20 मिनिट्सने चित्रपट पाहणं आणि झोपणं अत्यंत आवडतं.  पण आता अनुभव अजिबातच असा नव्हता. तर वाट पाहणं इतकी एकच गोष्ट माझ्या हातात होती. अशा स्वरूपाच्या प्रवासासाठी तर मी अजिबातच तयार नव्हते. मला खूप वेळ लागला. पण लॉकडाऊननंतर मी पहिल्यांदा बाहेर पडले ते लंडनला आले.’ लॉकडाऊनचा प्रत्येकाचा अनुभवच खूप वेगळा होता.  दरम्यान या काळात गेले कित्येक महिने मौनी आपल्या आईला भेटू शकलेली नाही. त्यामुळे तिला तिच्या आईची काळजी सतत लागून राहिलेली असते. 

अभिनयासाठी ‘या’ बॉलीवूड कलाकारांनी सोडली हातातली नोकरी

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

ADVERTISEMENT
09 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT