अभिनेत्री मौनी रॉयने गेल्यावर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिच्याकडे अनेक चित्रपटांची रीघ लागली आहे. मौनी रॉयचा सध्या ‘मेड इन चायना’ हा राजकुमार रावबरोबरील चित्रपट येत असून लवकरच प्रदर्शित होईल. मौनी रॉय सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. आपले वेगवेगळे फोटोज ती पोस्ट करत असते. नुकतंच मौनीने आपलं फोटोशूट करून घेतलं आहे. मौनीचे हे hot photoshoot सध्या व्हायरल होत असून तिचे चाहते तिच्या या फोटोंमुळे नक्कीच घायाळ झाले आहेत. मौनीने टीव्ही तर गाजवलाच आता ती मोठा पडदाही गाजवत आहेत. आपली जादू सध्या आपल्या चाहत्यांवर मौनी चालवत असून राजकुमार राव बरोबर तिची फ्रेश जोडी लवकरच दिसणार आहे. इतकंच नाही तर चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान मौनीच्या स्टाईलचीदेखील चर्चा सुरू आहे.
मौनी दिसत आहे HOT
मौनीने नुकतंच एक फोटोशूट करून घेतलं आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मौनी अत्यंत HOT दिसत आहे. मौनीने या फोटोशूट दरम्यान फुल स्लीव्ह्ज प्रिंटेड टॉप घातला आहे. हा फ्रंट नोट टॉप असून मौनी यामध्ये आपलं शरीर फ्लॉंट करताना दिसून येत आहे. या फोटोंमध्ये अनेक चाहत्यांनी तिला ‘कातिलाना’ अशी कमेंट दिली आहे. तसंंच यामध्ये तिने अगदी सटल मेकअप केला असून लिपस्टिकदेखील न्यूड लावली आहे. मौनीच्या या अदा सध्या तिच्या चाहत्यांना नक्कीच घायाळ करत आहेत. तिने हे फोटो पोस्ट केल्यापासून तिला भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. मौनीला अनेक चाहते असले तरीही त्यांच्या मनातील आपली जागा तसूभरही हलू नये याची काळजी अशा फोटोशूटमधून मौनी घेताना दिसत आहे.
सानिया मिर्झाच्या बहिणीचा निकाह होणार मोहम्मद अझरुद्दीनच्या मुलाशी
मौनीने बसवला जम
गेल्यावर्षी ‘गोल्ड’ या चित्रपटातून मौनीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. अक्षयकुमारच्या पत्नीची व्यक्तिरेखा तिने साकारली होती. त्यानंतर मौनीने जॉन अब्राहमसह ‘रोमिओ अकबर वॉल्टर’मध्येही काम केलं. आता लवकरच तिचा राजकुमार रावबरोबर ‘मेड इन चायना’ येत आहे. ट्रेलरमध्ये या दोघांची अप्रतिम केमिस्ट्री दिसून येत आहे. मौनीचा चाहता वर्ग खूपच मोठा आहे. लहान पडद्यावरील ‘नागिन’ या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर मौनीला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या. मौनी आता बॉलीवूडमध्ये स्थिरावली असून तिने व्यवस्थित जम बसवला आहे असं म्हणायला हरकत नाही.
प्रियंकाने बेबी प्लानिंगबाबत केला आहे ‘हा’ खुलासा
‘ब्रम्हास्त्र’ मध्येही महत्त्वाची भूमिका
अयान मुखर्जीचा चर्चित ‘ब्रम्हास्त्र’ या चित्रपटामध्येही मौनीची महत्त्वाची भूमिका असून ती यामध्ये नकारात्मक भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. पहिल्यांदाच मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय तिचं या चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्यासह नावही जोडण्यात आलं होतं. मात्र आपण चांगले मित्र असल्याचं दोघांनीही सांगितलं आहे. याशिवाय तिच्याकडे अजूनही काही प्रोजेक्ट आहेत. त्याबद्दल मौनीने सध्या तरी मौन बाळगले आहे. काही महिन्यांपूर्वीच नवाजुद्दीन सिद्दीकीबरोबरील ‘बोले चुडिया’ हा चित्रपट मौनीच्या हातून निसटला असून यासंदर्भात वादही झाला होता. पण त्यानंतर मौनीने यावर काहीही बोलणं टाळलं. आता मौनी पुन्हा नवीन काय करणार याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आणखी एका रेट्रो गाण्यावर थिरकतेय नोरा फतेही, टीझर आऊट
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.