logo
Logo
User
home / मनोरंजन
Mouni roy wedding

मौनी रॉय चढणार बोहल्यावर, हळदी-मेहंदीचे व्हिडिओ व्हायरल

काही दिवसांपूर्वीच मौनी रॉय 27 जानेवारी रोजी लग्न करणार हे POPxo मराठीने आपल्या वाचकांना सांगितले होते. त्याप्रमाणे आता मौनी रॉयच्या लग्नाच्या (Mouni Roy Wedding) विधींना सुरूवात झाली असून मौनीच्या मित्रमैत्रिणींनी मौनीला टॅग करत लग्नाच्या विधींचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करायला सुरूवात केली आहे. गोव्यामध्ये मौनी आपला बॉयफ्रेंड सूरज नाम्बियार(Suraj Nambiar) याच्यासह आज (27 जानेवारी) रोजी लग्न करत असून हळदीच्या आणि मेहंदीच्या सोहळ्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आपल्या वाचकांसाठी हे खास व्हिडिओ आम्ही आणले आहेत. 

गोव्यामध्ये जवळच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत लग्न 

गेल्या काही दिवसांपासून मौनी रॉयच्या लग्नाची चर्चा होती. मौनीच्या लग्नाच्या विधींना सुरूवात झाली असून आपल्या जवळच्या नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत मौनी रॉय ही सूरज नाम्बियारशी लग्नगाठ बांधत आहे. अर्जुन बिजलानी (Arjun Bijlani), राहुल शेट्टी (Rahul Shetty), प्रतीक उतेकर (Pratik Utekar), मंदिरा बेदी (Mandira Bedi) या आपल्या अगदी जवळच्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत मौनीची हळद आणि मेहंदी पार पडली आहे. मौनी आणि सूरज दोघांचेही अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मौनी आपल्या मेहंदीच्या विधीला अगदी मनसोक्त नाचताना दिसून येत आहे. तर तिचा होणारा नवरा सूरजही तिला साथ देताना दिसत आहे. मौनी आणि सूरज गेले अनेक वर्ष एकमेकांना डेट करत असून अखेर दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. सूरज हा दुबईस्थित व्यावसायिक असला तरीही दोघांनी गोव्यात लग्नगाठ बांधायचे पक्के केले आणि अखेर आपल्या जवळच्या लोकांमध्ये दोघेही विवाहबद्ध होत आहेत. 

मौनीने आपल्या हळदीसाठी सुंदर पांढरा लेहंगा परिधान केला असून मेहंदीसाठी पिवळा लेहंगा घातला आहे. या दोन्ही पोषाखांमध्ये मौनी अत्यंत सुंदर दिसत आहे. तर तिचा लग्नाचा लुक अथवा लग्नासाठी वेडिंग ड्रेस कसा असेल हे पाहण्यासाठीही आता तिचे चाहते आतुर झाले आहेत. 

मित्रमैत्रिणींनी दिल्या शुभेच्छा

मंदिरा बेदीने आपल्या सोशल मीडियावर मौनी आणि सूरज दोघांचेही फोटो शेअर करत अखेर लग्नाचा दिवस उजाडलाच म्हणत दोघांना मनापासून शुभेच्छा देत आपले दोघांवरही अत्यंत प्रेम असल्याचे सांगितले आहेत. तर राहुल शेट्टी आणि प्रतीक उतेकरने मौनीचे मेहंदी विधीचे फोटो शेअर करत आपण तिच्यासाठी अत्यंत आनंदी असल्याचे म्हटले आहे. याशिवाय मौनीच्या हळदी आणि मेहंदीसाठी तिचा सर्वात जवळचा मित्र अर्जुनही आपल्या पत्नीसह पोचला आहे. त्यानेही आपल्या पत्नीसह काही रिल्स शेअर केले आहेत. त्यामुळे गेल्या काही तासांपासून मौनीच्या लग्नाचे रिल्स आणि फोटो वाऱ्यासारखे व्हायरल होताना दिसून येत आहेत. तर मौनीदेखील अत्यंत आनंदी असल्याचे दिसून येत आहे. याआधीच काही महिन्यांपूर्वी मंदिराच्या घरी सूरजच्या आई-वडिलांची भेट मौनीच्या आईने घेतली असल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत खुलासा झाला नसला तरी अखेर मौनी आणि सूरज लग्नबंधनात अडकत असल्यामुळे ही गोष्टही खरीच असावी असाही अंदाज बांधला जात आहे. कोरोनामुळे अत्यंत कमी माणसांच्या उपस्थितीत, मोजक्या मित्रमैत्रिणी आणि परिवारामध्ये मौनी आणि सूरज लग्न करत आहेत. तर इंडस्ट्रीतील अनेक मित्रमैत्रिणींनी मौनीला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

26 Jan 2022

Read More

read more articles like this
good points logo

good points text