कर्करोगामध्ये संक्रमित पेशींची वाढ झपाट्याने झाल्यास आसपासचा कोणताही अवयव निकामी होण्याची शक्यता असते. तोंडाचा कर्करोगा ही एक भयंकर गंभीर आरोग्य समस्या आहे. कारण तोंडाचा कर्करोग झाल्यास तोंडाचा आतील भाग आणि घसा निकामी होण्याची शक्यता वाढते. कर्करोग वाढत गेल्यास रुग्णाची जीभ, ओठ, तोंड, हिरडी, टाळू, जीभेचा खालील जबडा, घसा, कानाकडील भाग संक्रमित होतो. भारतात जगाच्या तुलनेत तीस टक्के जास्त लोकांना तोंडाचा कर्करोग होतो. तोंडाचा कर्करोग होण्याचे कारण अती प्रमाणात धुम्रपान करणे, मद्यपान करणे, तंबाखूचे सेवन करणे अथवा कर्करोगाच्या विषाणूचा संसर्ग होणे हे असू शकते. यासाठीच जाणून घ्या तोंडाचा कर्करोग लक्षणे आणि उपाय (Mouth Cancer Symptoms In Marathi) यासोबतच जाणून घ्या रक्ताचा कर्करोग, लक्षणे (Symptoms Of Blood Cancer In Marathi)
तोंडाचा कॅन्सर लक्षणे (Mouth Cancer Symptoms In Marathi)
तोंडाचा कर्करोग व्यसनांपासून दूर राहून टाळता येऊ शकतो. मात्र व्यसनांच्या अती आहारी गेल्यामुळे दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठीच जाणून घ्या तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे (Symptoms Of Mouth Cancer In Marathi).
तोंडाच्या आतील भागात पांढरे अथवा लाल चट्टे येणे (White Or Red Patches In The Mouth)
तोंडाचा कर्करोग बरा करण्याचा एकमेव उपाय म्हणजे प्राथमिक लक्षणे आढळतात त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे. कारण जर हा तोंडाचा कॅन्सर दुर्लक्षित राहिला तर काही वर्षात हळू हळू यात वाढ होत जाते. हा हळू हळू विकसित होणारा आजार असल्यामुळे अचानक रूग्णाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता वाढते. यासाठीच जर एखाद्याला तोंडाच्या आतील टाळू अथवा जीभेकडील भागात पांढरे अथवा लाल चट्टे दिसून आले तर त्या व्यक्तीने दोन आठवड्याच्या आत तज्ञ्ज डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. ज्यामुळे वेळीच उपचार करता येऊ शकतात.
गिळण्यास त्रास होणे (Difficulty Swallowing)
तोंडाचा कर्करोग बळावू लागताच तोंड आणि घशातील संवेदना कमी होतात. तोंडातील स्नायू संक्रमित झाल्यामुळे कोणतीही गोष्ट गिळण्यास रुग्णाला त्रास होतो. अन्नाप्रमाणे साधे पाणीसुद्धा रुग्ण या कर्करोगामुळे सहज पिऊ शकत नाही. यासाठीच गिळण्यास त्रास होत असेल तर त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका.
बोलण्यास अडचण येणे (Speech Problems)
तोंडाचा कर्करोग झाल्यास ओठ, घसा, जीभ संक्रमित होते. बोलण्यासाठी या सर्व अवयवांची मदत लागत असते. मात्र हे अवयव संक्रमित झाल्यामुळे रुग्णाला बोलताना अडचणी येतात. स्वरयंत्राच्या कार्यात अडचण आल्यामुळे कोणाशी संवाद साधणे कठीण जाऊ शकते. यासाठीच बोलण्यास अडचण येत असेल तर हे तोंडाच्या कर्करोगाचे मुख्य लक्षण असू शकते हे वेळीच ओळखा.
मानेजवळ गाठ असणे (Lump In Neck)
तोंडाचा कर्करोग झाल्यास तोंडात त्रासदायक फोड आणि चट्टे येतात. शिवाय मानेजवळ दाह झाल्यामुळे कर्करोगाची गाठ विकसित होत जाते. ज्यामुळे मानेजवळ एखादी गाठ विकसित होताना दिसली तर तुम्ही त्वरीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. मानेजवळील गाठ विकसित झाल्यामुळेही बोलताना आणि खाताना त्रास होतो.
अचानक वजन कमी होणे (Weight Loss)
अचानक वजन कमी होणे हे कर्करोगाचे मुख्य लक्षण आहे. तोंडाच्या कर्करोगाप्रमाणे अनेक प्रकारच्या कर्करोगामध्ये हे लक्षण जाणवते. मात्र तोंडाच्या कर्करोगामुळे रुग्णाला साधे पाणी पिणे अथवा अन्न गिळणे शक्य होत नाही. याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागतो. ज्यामुळे अशा रुग्णाचे वजन अचानक आणि झपाट्याने कमी होते.
तोंडात वेदना होणे (Mouth Pain)
तोंडाच्या कर्करोगामध्ये तोंडात फोड आणि गाठ विकसित होते. ज्यामुळे तोंडात असह्य वेदना जाणवू शकतात. मात्र कधी कधी खाताना अथवा बोलताना हे फोड फुटतात आणि तोंडाच्या आतून रक्तस्त्राव होतो. ज्यामुळे तोंडात वेदना जाणवू शकतात. मात्र हे लक्षण तोंडाचा कर्करोग बळावल्यानंतर जाणवते. त्यामुळे याआधीच रुग्णाने यावर उपचार घेण्याची गरज असते.
कान दुखणे (Ear Pain)
कान दुखणे हे तोंडाच्या कर्करोगातील एक प्राथमिक लक्षण असू शकते. कारण तोंडाचा कर्करोग तोंडात आणि घशाजवळ विकसित होतो. ज्यामुळे घशासोबत कानाकडील भागही संक्रमित होतो. कानाच्या स्नायूंना त्यांचे कार्य करण्यात अडचणी आल्यामुळे कानामधून वेदना जाणवू शकतात. ज्यामुळे कान दुखणे या लक्षणावरूनही तोंडाचा कर्करोगाचे प्राथमिक स्थरावर निदान केले जाऊ शकते.
दात निखळणे (Loose Yeeth)
तोंडाचा आतील भाग कर्करोगामुळे संक्रमित झाल्यामुळे दात आणि हिरड्या हे तोंडातील मुख्य अवयव संक्रमित होतात. हिरड्या कमजोर झाल्यामुळे दात निखळून पडतात आणि रुग्णाचा अवस्था अधिक त्रासदायक होते. यासाठी सुरुवातीच्या काळात जर दात आणि हिरड्या दुखत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. यासोबतच वाचा हार्ट अटॅक येण्याची लक्षणे (Heart Attack Symptoms In Marathi)
तोंडाचा कॅन्सर घरगुती उपाय (Home Remedies for Mouth Cancer In Marathi)
तोंडाचा कर्करोग झाल्यास वेळीच निदान करून योग्य वैद्यकीय उपचार घेणं गरजेचं आहे. मात्र काही असे घरगुती उपचार आहेत ज्यामुळे तुम्ही तोंडाच्या कर्करोगापासून स्वतःचा बचाव करू शकता.
ग्रीन टी
शरीरात फ्री रेडिकल्स वाढल्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. मात्र ग्रीन टीने तुम्ही ही समस्याा रोखून धरू शकता. कारण ग्रीन टीमधील अॅंटि ऑक्सिडंट तोंडातील विषाणूंचा नाश करतात. ज्यामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो. दिवसभरात एक ते दोन वेळा ग्रीन टी घेणे यासाठी फायदेशीर ठरू शकते. वाचा मनाला शांत आणि शरीराला निरोगी ठेवणाऱ्या ‘ग्रीन टी’चे फायदे (Green Tea Benefits In Marathi)
संतुलित आहार घेणे
कोणताही आजार होण्यामागचे महत्त्वाचे कारण असते रोग प्रतिकार शक्ती कमी असणे. तोंडाच्या कर्करोगापासून सुरक्षित राहण्याचा सोपा मार्ग म्हणजे योग्य आणि संतुलित आहार घेणे. जर तुमच्या आहारात अॅंटि कॅन्सर पदार्थ असतील तर तुम्हाला तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका नक्कीच कमी होतो. यासाठीच आहारात पालेभाज्या, फळभाज्या, तृणधान्य, कंदमुळे, प्रोटिनयुक्त आहार, कॅल्शिअमयुक्त आहार असायला हवा. टोमॅटोमधील लाइकोपिन नावाच्या घटकामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. व्हिटॅमिन सी युक्त पदार्थ खाणे आणि हिरव्या पालेभाज्यांचे प्रमाण आहारातत वाढवणे यासाठी गरजेचे आहे.
सूर्याच्या अतिनील किरणांपासून दूर राहणे
सूर्यकिरणातील अतिनील किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होतो. मात्र चेहरा आणि ओठांच्या माध्यमातून तोंडाचा कर्करोगही यामुळे होऊ शकतो. यासाठीच घराबाहेर जाताना अथवा दुपारच्या उन्हात फिरताना त्वचेला सनस्क्रिन लावणं गरजेचं आहे. चेहरा झाकण्यासाठी तु्म्ही हॅट, गॉगल, स्कार्फ, छत्रीचा वापर करू शकता. ज्यामुळे तुम्ही तोंडाच्या कर्करोगापासून दूर राहू शकता.
मद्यपान आणि धुम्रपान टाळणे
व्यसन करणे हे तोंडाचा कर्करोग होण्यामागचे महत्त्वाचे कारण असू शकते. कारण तंबाखू अथवा अल्कोहोलचे अती प्रमाण शरीरासाठी हानिकारक ठरते. या सवयी कमी करून आणि व्यसनापासून दूर राहून तुम्ही तोंडाच्या कर्करोगाचा धोका नक्कीच टाळू शकता.
तुळस आणि हळदीचा काढा घेणे
तुळस आणि हळदीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म आहेत. ज्यामुळे तुमचे तोंडाच्या कर्करोगापासून नक्कीच संरक्षण होते. तुळशीमध्ये अॅंटि इनफ्लैमटरी गुणधर्म आहेत तर हळदीमध्ये नॅचरल हिलिंग करणारे गुणधर्म आहेत. त्यामुळे या दोन्ही औषधांचा एकत्र वापर केलेला काढा घेणे या कर्करोगापासून दूर राहण्याचा सोपा मार्ग आहे. आयुर्वेदिक उपायांचा वापर करून तुम्ही पोटाचा कॅन्सर लक्षणेही टाळू शकता.
तोंडाचा कर्करोग निवडक प्रश्न (FAQ’s)
1. तोंडाचा कर्करोग किती लवकर विकसित होतो ?
बऱ्याच लोकांमध्ये खूप उशीरा पौढ वयात तोंडाच्या कर्करोगाचे निदान होते. कारण हा आजार विकसित होण्यास काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे प्राथमिक लक्षणे आढळल्यावर लगेच उपचार करणं गरजेचं आहे.
2. लवकर निदान झाल्यास तोंडाचा कर्करोग पूर्ण बरा होऊ शकतो का ?
तोंडाचा कर्करोग प्राथमिक लक्षणे ओळखून वेळीच निदान झाल्यास लवकर बरा होऊ शकतो. वर्षातून एकदा तोंड आणि दातांची तपासणी करून वेळीच याचे निदान करता येऊ शकते.
3. तोंडाच्या कर्करोगाची लास्ट स्टेज अर्थात शेवटचा टप्पा कोणता ?
तोंडाच्या कर्करोगाची अॅडवान्स स्टेज म्हणजे चौथी स्टेज होय. या स्टेजमध्ये तोंडाचा कर्करोग खूप वाढून तोंडातील टीश्यूजमध्ये पसरतो. ज्यामुळे तोंडाचा आतील जबडा संक्रमित होतो.