निर्माते – नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट, फॉक्स स्टार स्टुडिओज
दिग्दर्शक – फरहाद सामजी
कलाकार – अक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दुगुबट्टी, शरद केळकर, क्रिती सनॉन, क्रिती खरबंदा, पूजा हेगडे, जॉनी लिव्हर, चंकी पांडे, रंजीत
स्टार्स – 3 (***)
हाऊसफुलचा हा चौथा भाग आहे आणि पहिले तिन्ही भाग पाहता या चित्रपटातही लॉजिक असण्याची शक्यता कमी होती. पण तरीही तुम्हाला कोणतंही लॉजिक न लावता फक्त हसायचं असेल आणि डोक्याला कोणताही ताप अथवा ताण नको असेल तर तुम्ही हा चित्रपट दिवाळीमध्ये पाहू शकता. या दिवाळीमध्ये तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये हाऊसफुल 4 बघण्यासाठी प्रेक्षक जास्त उत्सुक होते. कारण याआधी आलेली हाऊसफुल हे धमाल होते. शिवाय या वेळी वेगळी कथा असल्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण ही अपेक्षा तुम्ही जास्त लॉजिक लावून बघायला गेलात तर पूर्ण होणार नाही.
नागिन – 4 साठी एकता कपूरने दिली या Ex-Couple ला ऑफर
600 वर्षांची जुन्या कथेला दिलेला तडका
कथा सुरू होते ते हॅरी (अक्षय कुमार), मॅक्स (बॉबी देओल) आणि रॉय (रितेश देशमुख) पासून. कोणतंही लॉजिक नसलेली ही कथा आहे. पण तरीही यातील संवाद आणि अक्षय कुमार, रितेश देशमुख, जॉनी लिव्हर यांच्या अफलातून टायमिंगमुळे पहिल्यापासून अगदी शेवटापर्यंत पोट दुखेपर्यंत तुम्हाला हसायला येतं याची हमी नक्कीच आहे. त्याला मिळालेली इतर कलाकारांची साथही आहे. राणा दुगुबट्टी आणि शरद केळकर यांची भूमिका लहान असली तरीही लक्षात राहणारी आहे. राणाने नेहमीपेक्षा थोडी वेगळी भूमिका केली असून खलनायक आणि कॉमेडी यातील समन्वय चांगलाच साधला आहे. 600 वर्षांपूर्वीचा जन्म आणि पुनर्जन्म यातील मजा पडद्यावर साकारताना प्रेक्षकांना नक्कीच हसायला येतं. हॅरीचा विसरण्याचा स्वभाव, त्यातून त्याला सतत पडणारी पुनर्जन्माची स्वप्नं. आपल्या भावांना आणि त्यांच्या गर्लफ्रेंड्सना पुन्हा सर्व काही आठवून देण्याचा हॅरीचा प्रयत्न आणि क्रिती, पूजा आणि नेहा यांना सर्व काही न आठवता होणारी गडबड म्हणजे हा चित्रपट. या गडबडीतून खलनायकाचा (शरद केळकर) राजगादी मिळवण्याचा प्रयत्न आणि त्यातून गामा (राणा दुगुबट्टी) चा राजकारणासाठी करण्यात आलेला वापर हे कथेत व्यवस्थित गुंतण्यात आलं असलं तरीही काही ठिकाणी याचं लॉजिक लावताना मात्र नक्कीच त्रास होतो. पण हे जर डोक्याने विचार न करता चित्रपट पाहिला तर तुम्ही हाऊसफुल 4 नक्कीच एन्जॉय करू शकता.
कलाकारांनी सेटवरच साजरी केली दिवाळी फराळ पार्टी
जॉनी लिव्हर आणि रितेशचं अफलातून टायमिंग
जॉनी लिव्हर हा असा अभिनेता आहे हाऊसफुल 4 चित्रपटाची जान आहे असं म्हणावं लागेल. हाऊसफुलचा कोणताही भाग त्याच्याशिवाय पूर्ण होणं शक्य नाही. त्याचप्रमाणे रितेश देशमुखचा बांगडू महाराज. रितेश देशमुख आणि अक्षयकुमारच्या कॉमेडीचं टायमिंग हे अफलातून आहे. या दोघांचाही सध्या कॉमेडीमध्ये कोणीही हात धरू शकत नाही. रितेशच्या अभिनयात सहजता आहे आणि ती त्याच्या प्रत्येक सीनमध्येदेखील जाणवते. अगदी लहानात लहान सीनवरदेखील रितेश आणि जॉनी लिव्हरच्या नुसत्या हालचालीवरदेखील हसायला येतं. त्याचप्रमाणे आखरी पास्ता म्हणजे चंकी पांडेनेदेखील त्याचं काम अप्रतिम केलं आहे. त्याला देण्यात आलेले संवाद त्याने नेहमीप्रमाणे डिलिव्हर केले आहेत. मात्र यामध्ये क्रिती, पूजा हेगडे आणि क्रिती खरबंदा यांना देण्यात आलेली भूमिका कमी असली तरीही त्यांनी त्यामध्ये आपलं ग्लॅमर नक्कीच योग्य तऱ्हेने दाखवलं आहे.
Film Review : महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण पान सादर करणारी ‘हिरकणी’
एकंदरीतच तुम्हाला डोकं बाजूला ठेऊन फक्त हसायचं असेल आणि मजा घ्यायची असेल तर या दिवाळीत तुम्ही तुमच्या कुटुंबासह नक्कीच हा चित्रपट बघू शकता. पण जर तुम्हाला कोणतंही लॉजिक लावून बघायचं असेल तर नक्कीच हा चित्रपट तुमच्यासाठी नाही. हा चित्रपट क्लासी (Classy) नसून मासी (Massy) आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.
मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.