‘बाटला हाऊस’ आणि ‘सुपर 30’ सारख्या हिट चित्रपटात काम केल्यानंतर मृणार ठाकूर तिच्या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. मृणाल लवकरच एक्सेल इंटरटेंटमेंट आणि आरओमपी पिक्चर्सच्या अॅमेझॉन प्रस्तुक ‘तूफान’ मध्ये झळकणार आहे. राकेश ओमप्रकाश मेहराच्या तूफानमध्ये मृणालसोबत फरहान अख्तर, परेश रावल आणि मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठकदेखील असणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटात मृणार अनन्या या मराठी मुलीची भूमिका साकारत असून ती तिची मातृभाषा मराठीमधून संवाद साधताना दिसणार आहे.
तूफानमध्ये मृणाल साकारणार मराठी मुलगी
तूफान हा एक स्पोर्ट्स ड्रामा असून या चित्रपटाबद्दल बोलताना मृणालने तिच्या मनातील भावना प्रेक्षकांसोबत शेअर केल्या आहेत. तिच्या मते या चित्रपटात ती अनन्या नावाची एक सर्वसाधारण मराठी मुलगी साकारणार आहे जी जगण्यातून इतरांना प्रेरणा देत राहते. “अनन्या एक भावनिक मुलगी असून तिच्या पात्र साकारत असताना मी स्वतःला तिच्याजागी आणण्याचा काटोकाट प्रयत्न केलेला आहे. अनन्या ही एक भावनित, उत्साही आणि कुटुंबवत्सल मुलगी आहे. त्यामुळे मला स्वतःलाही या भूमिकेतून बरंच काही शिकायला मिळालं आहे. अनन्या या चित्रपटात अज्जू ( फरहान अख्तर) च्या नाही तर तिच्या जीवनात येणाऱ्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. कारण ती खूपच प्रेमळ, समजूतदार आणि जीवनाकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टीकोन असलेली मुलगी आहे. अनन्या ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळते ते पाहून मलादेखील आश्चर्य वाटतं. अनन्या सर्वांना समान दृष्टीकोनातून पाहते. इतरांना प्रेरणा देणं हेच तिच्या जीवनाचं ध्येय आहे. आता जेव्हा मी रोज सकाळी उठते तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारते की, मी आज लोकांना प्रेरणा देण्यासाठी काय करू शकते. मी एक कलाकार म्हणून स्वतःला खूपच भाग्यवान समजते की असं पात्र साकारत आहे. हा चित्रपटाची निवड करून मी देखील जगाला एक प्रेरणा देत आहे असं मला वाटतं.”
मातृभाषेतून बोलण्याचा मृणालला वाटतोय अभिमान
मराठी बोलण्याची संधी मिळाल्याबद्दलही मृणालला खूपच अभिमान वाटत आहे. कारण ती यात तिच्या मातृभाषेतून प्रेक्षकांसोबत संवाद साधणार आहे. तिने शेअर केलं, “या चित्रपटाचं वैशिष्ठ्यं हे आहे की मी आणि अनन्या दोघीपण महाराष्ट्रीयन आहोत. ज्यामुळे चित्रपट हिंदी जरी असला तरी तुम्ही मला बऱ्याचदा या चित्रपटात मराठीतून बोलताना पाहाल. कारण मराठी बोलणं ही या चित्रपटाची गरज आहे. या चित्रपटात मराठी बोलणं हे नैसर्गिक पद्धतीने आणि ओघाने आलेलं आहे. जेव्हा तुमच्यासोबत परेश रावल सरांसारखे कलाकार मराठीतून प्रतिक्रिया देतात तेव्हा तो एक छान संवाद आणि मस्तीचं वातावरण निर्माण करणारा अनुभव असतो.” तूफान चित्रपट रितेश सिधवानी, राकेश ओमप्रकाश मेहरा आणि फरहान अख्तर करत आहेत. या चित्रपटाचा प्रिमिअर 21 मेला अॅमेझॉन प्राईमवर होणार आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटात मृणालचा हा मराठमोठा लुक आणि मातृभाषेतून संवाद ऐकण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक आहेत.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ‘रॉकेट्री’चं कौतुक, आर माधवनसोबत पाहिली झलक
जेव्हा संगीताचा देव ए. आर. रहमान करतो मराठमोळ्या अंजलीची स्तुती…
बॉलीवूडवर कोरोनाचा गंभीर परिणाम, घर विकण्याची काहींवर आली वेळ