‘बिग बॉस 13’ नंतर पारस छाब्रा आणि शहनाझ गिल या दोघांचाही ‘मुझसे शादी करोगे’ हा रियालिटी शो आला होता. मात्र या शो ला जास्त टीआरपी मिळू शकला नाही. पण या रियालिटी शो ची विजेती आंचल खुराणाला या शो चा चांगला फायदा झाला होता. आंचल ही टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तसंच तिने ‘रोडीज’ चा 8 वा सीझनही जिंकला होता. मात्र आता आंचलच्या बाबतीत एक वाईट बातमी समोर आली आहे. आंचलचा अपघात झाला असून वाढदिवसाच्या आधी दोन दिवस आधी ही घटना घडली आहे. आंचलने आपल्या सोशल मीडियावरून आपल्याला झालेल्या अपघाताबद्दल माहिती देत आपल्याला किती लागलं आहे याचे फोटोही पोस्ट केले आहेत. सध्या तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची
15 दिवसांची सक्तीची विश्रांती
अभिनेत्री आंचल खुराणा तिच्या नेगेटिव्ह भूमिकांसाठी प्रसिद्ध आहे. आंचलचा आज अर्थात 6 ऑगस्टला वाढदिवस असतो. मात्र दोन दिवस आधीच आंचलचा अपघात झाला असून तिने स्वतः याबद्दल आपल्या चाहत्यांना सांगितले आहे. डॉक्टर्सने तिला 15 दिवसांची सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितले आहे. आंचलचा अपघात हा एका कार रिव्हर्सिंगमुळे घडला. आंचल रस्त्यावर उभी असता एक कार रिव्हर्स घेत होती मात्र ड्रायव्हरला आंचल दिसली नाही आणि अचानक हा अपघात घडला. यामुळे आंचलला भरपूर लागले असून तिच्या पायाचे मसल्स फाटले आहेत. तिला पंधरा दिवसांची संपूर्ण बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. याचा फोटो आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करत आंचलने ‘हॅप्पी बर्थडे हो गया’ असं लिहिलं होतं. आपला यावर्षीचा वाढदिवस आपल्या कुटुंबासह दिल्लीला साजरा करण्याचा आंचलचा विचार होता. मात्र आता या अपघातामुळे तिला कुठेही जाता येणार नसल्याने तिला खूपच दुःख होत आहे. तिने आपल्या भावना व्यक्त करत पुढचे पंधरा दिवस आपल्याला साधं चालताही येणार नसल्याचं दुःख होत आहे असं म्हटलं आहे. पण माझे मित्रमैत्रिणी माझ्यासोबत आहेत त्यामुळे मी आनंदी आहे असंही तिने म्हटलं आहे. तसंच सर्वांचा पाठिंबा मिळाल्याबद्दल सर्वांचे आभार असंही तिने आपल्या पोस्टमधून चाहत्यांना सांगितलं आहे.
करिना कपूरने नेपोटिझमवर सुनावले खडे बोल, यावर चर्चा होणंच विचित्र वाटतं
‘मुझसे शादी करोगे’ नंतर आंचलला मिळाली जास्त प्रसिद्धी
आंचल खुराणा गेले काही वर्ष टीव्ही इंडस्ट्रीत काम करत आहे. रोडीज जिंकल्यानंतर आंचलला लोक ओळखू लागले. मात्र जास्त प्रसिद्धी मिळाली ती ‘मुझसे शादी करोगे’ या रियालिटी शो मधून. पारस छाब्राने सर्व स्पर्धकांमधून आंचलची निवड केली होती. त्याशिवाय आंचलने याआधी ‘सपने सुहाने लडकपन के’, ‘जिंदगी की महक’ आणि ‘विक्रम बेताल की रहस्य गाथा’ या मालिकांमधून काम केले होते. त्यापैकी ‘सपने सुहाने लडकपन के’ या मालिकेतील तिची नकारात्मक भूमिका गाजली होती. मात्र त्यावेळी तिला तितकी ओळख मिळू शकली नव्हती. आता अपघातामुळे आंचल थोडक्यात बचावली असून तिला आरामाची अर्थात सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. आंचल आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या तब्बेतीविषयी माहिती देत आहे.
शकुंतला देवी नंतर आता ‘शेरनी’ व्हायचं आहे विद्या बालनला, लवकरच सुरू होणार शूटिंग