दिवाळी म्हटलं की, फराळ आणि फटाके आलेच. पण दिवाळी आणि प्रदूषणाचा मुद्दा दरवर्षी हातात हात घालून येतो. एकीकडे दिवाळीचा आनंद तर असतोच पण दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारं वायू आणि ध्वनी प्रदूषण हासुद्धा कळीचा मुद्दा असतोच. पण यंदा मात्र मुंबईकरांनी प्रदूषण टाळत सर्वात शांत आणि इकोफ्रेंडली दिवाळी साजरी केली.
मुंबईकर होत आहेत जागरूक
यंदाची दिवाळी संपूर्णतः फटाकेविरहीत साजरी करण्यात आली नाही. पण तरीही गेल्या 5 वर्षांतील ही रेकॉर्डब्रेक दिवाळी आहे. यंदा मुंबईत दिवाळीदरम्यान रात्री 10 पर्यंत फटाके उडवण्याची परवानगी असूनही मुंबईकरांनी जास्त फटाके उडवले नाहीत. ज्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषणाचा स्तर खूपच कमी झाला. त्यामुळे मुंबईकरांची चांगल्या पर्यावरणाच्या दिशेने जाण्याला सुरूवात तरी झाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
मुंबईतील एका एनजीओनुसार मुंबईमध्ये रविवारी दिवाळीच्या धूमधडाक्यात फक्त 112.3 डेसिबल स्तरचा आवाज रेकॉर्ड झाला. 2017 च्या दिवाळीमध्ये हाच आकडा 117.8 dB एवढा होता. ध्वनीप्रदूषणांबाबत मुंबईकरांमध्ये वाढलेल्या जागरूकतेचा हा परिणाम असल्याचं कळतंय. त्यामुळे बहुतांश मुंबईकर आता कमी फटाके वापरताना दिसत आहेत. 2010 पर्यंत मिळणारे अनेक फटाके हे जास्त आवाजाचे होते. काही फटाक्यांचा आवाज तर 145 dB एवढा होता.
ही दिवाळी कमी ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषणाची
यावर्षी सर्वात जास्त 112.3 dB डेसिबल एवढा आवाज होता. रश्शी बॉम्बसारखे जास्त आवाजवाले फटाके यंदा कमी प्रमाणात फोडण्यात आले. जास्तकरून फुलबाज्या, भुईचक्र आणि अनारसारखे फटाके उडवले. त्यामुळे मुंबईकरांचं खरंच कौतुक झालं पाहिजे. सफर या हवामान संस्थेनुसार या दिवाळीत हवेतील प्रदूषण फारच कमी होतं. तरीही बीकेसी आणि मालाड भागातील वायूची प्रदूषण पातळी सर्वात जास्त होती. तसंच कार्र सायक्लोन आणि तुरळक पावसांच्या सरींमुळे हवेतील वायूप्रदूषणाची पातळीही कमी होती. ही दिवाळी खरंच मुंबईकरांसाठी हॅपी दिवाळी ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील प्रदूषणाची पातळीही कमी आढळली आहे.
सर्वात जास्त फटाके या भागात…
मुंबईतील फटाके उडवण्याच्या बाबतीत सर्वात जास्त मरीन ड्राईव्ह, जिमखान आणि दक्षिण मुंबईत हे परिसर अग्रेसर होते. पण तरीही शहरांमध्ये 10.45 नंतर फटाके उडवण्यात आले नाहीत.
दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न कायम
एकीकडे मुंबईतील दिवाळी पर्यावरणासाठी दिलासादायक ठरली तरी भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्न मात्र कायम आहे. आकडेवारीनुसार यंदाही दिल्लीतील वायूप्रदूषण कमी झालेलं नाही. दिल्लीत फटाक्यांबाबत जनजागृती करूनही हवा तसा परिणाम साधता आलेला नाही. दिल्लीतील न्यायालयाने फटाक्यांवर बंदी आणून आणि दिल्ली सरकारने लोकांना आवाहन करून राजधानीतील प्रदूषण पातळीत फरक पडलेला नाही. त्यामुळे फटाके उडवल्यामुळे दिल्लीकरांना श्वास घेणंही मुश्कील होताना दिसलं. वायूप्रदूषण टाळण्यासाठी दिल्लीत ऑड-इव्हन फॉर्म्युलाही वापरण्यात आला होता.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा –
मुंबईतील या 5 बाजारांमध्ये मिळतात स्वस्त आणि मस्त इनरवेअर्स
मुंबईतील नाईट लाईफ अनुभवायचं आहे, मग या ठिकाणांना जरूर भेट द्या