तारक मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. म्हणूनच लहानांपासून मोठ्यांपर्यंत आजही अनेक जण आवर्जून ही मालिका पाहतात. या मालिकेचं वैशिष्ठ्य हेच आहे की या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना खूप प्रिय आहे. या मालिकेत गोकुळधाम सोसायटी दाखवण्यात आली आहे ज्यामध्ये विविध प्रांतातील लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहताना दिसतात. मात्र आता या मालिकेला उतरती कळा लागल्याची लक्षणं दिसत आहेत. म्हणूनच की काय या मालिकेतील एक एक कलाकार आता मालिका सोडण्याच्या मार्गावर आहे. गेल्या तीन वर्षांपासून या मालिकेतील मुख्य पात्र दयाबेन म्हणजेच दिशा वकानी तिच्या बाळंतपणामुळे या मालिकेतून गायब झालेली आहे. तर आता काही दिवसांपासून बबीता म्हणजेच मुनमुन दत्ताही मालिकेत दिसत आहे. ज्यामुळे मुनमुन दत्तानेही मालिका सोडल्याची चर्चा सुरू होती. मात्र आता स्वतः मुनमुन दत्ताने या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
मुनमुन दत्ताने शेअर केलं
मुनमुन दत्ता काही आठवड्यांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दिसत नाही आहे. बबीता सारख्या पात्राने या मालिकेतून गायब होणं प्रेक्षकांना मुळीच आवडलं नाही. ज्यामुळे प्रेक्षकांनी असा अंदाज लावला की बबीताने ही मालिका आता सोडली असावी. काही जणांनी दिशा वकानीप्रमाणे मुनमुन दत्ताही गरोदर आहे अशी अफवाही पसरवली होती. मात्र आता या सर्व अफवांवर मुनमुन दत्ताने स्वतःच पडदा पाडला आहे. मुनमुन दत्ताच्या मते अशा अफवा पसरवल्यामुळे तिच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मुनमुन दत्ताने तारक मेहता का उल्टा चष्मा सोडला नसल्याचं सांगितलं आहे. सध्या मालिकेमध्ये तिच्या भूमिकेवर आधारीत ट्रॅक सुरु नसल्यायमुळे ती शूटिंगसाठी जात नसल्याचं तिने उघड केलं आहे. …आणि त्यासाठी साकारणार पाण्याखाली राहून गायनाचा अद्भुत असा लाईव्ह सोहळा
जेव्हा मी मालिका सोडेन…
मुनमुन दत्ता म्हणतेय, “मालिकांमधील सीन्स आणि ट्रॅक हा प्रॉडक्शन टीमकडून ठरवला जातो. सहाजिकच कलाकार हे सर्व ठरवत नाहीत. आम्ही फक्त आमच्या शेड्यूल प्रमाणे शूटला जातो आणि आमचे काम करतो. ज्या सीन्ससाठी आमची गरज नसते तेव्हा आम्ही उगाच शूटिंगसाठी जात नाही. त्यानुसार मी काही दिवसांपासून शूटवर जात नाही आहे. शिवाय जर मला मालिका सोडायची असेल तर मी स्वतः ही गोष्ट माझ्या चाहत्यांसोबत शेअर करेन. त्यामुळे अंदाज लावण्यापेक्षा खंर काय ते सर्वांना समजणं गरजेचं आहे असं मला वाटतं.”
मागील काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट आणि लॉकडाऊन यामुळे अनेक मालिकांच्या शूटिंगचे लोकेशन बदलण्यात आले होते. तारक मेहता का उल्टा चष्मा त्यावेळी दमनमध्ये शूट करण्यात येत होती. मात्र त्या काळात त्या लोकेशनवर मुनमुन दत्ता शूटिंगसाठी नव्हती. त्यानंतर मुनमुन सेन एका सोशल मीडियावरील वादातही सापडली होती. तिने सोशल मीडियावर जातिसूचक शब्दप्रयोग केल्याचा आरोप होता. ज्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. सहाजिकच या प्रकारणानंतर ती मालिकेमध्ये दिसली नाही त्यामुळे मुनमुन दत्ताने मालिका सोडण्याची चर्चा सुरू झाली. चित्रपटात नाही मिळाले यश म्हणून पुन्हा मालिकांकडे वळले हे स्टार्स