Advertisement

मनोरंजन

मुनमुन दत्ताची संतापजनक प्रतिक्रिया, भारताची मुलगी असल्याची लाज वाटत असल्याचं वक्तव्य

Dipali NaphadeDipali Naphade  |  Sep 13, 2021
munmun and raj

मीडियामध्ये आजकाल लिंकअपचे वृत्त येणे हे अत्यंत कॉमन आहे. मात्र त्याचा समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होऊ शकतो याबाबत कधीही विचार केला जात नाही. सेलिब्रिटीच्या आयुष्याच्या बाबतीत हे जास्त घडते. पण सेलिब्रिटीदेखील एक माणूसच आहे याचा विचार मात्र फारच कमी वेळा होतो. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ‘तारक मेहता उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Ulta Chashma) मालिकेतील बबिताची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat) हे नात्यात असल्याच्या चर्चा होत्या. मात्र या चर्चांना आता रोख लावत राज आणि मुनमुन दोघांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. यापैकी मुनमुनची प्रतिक्रिया ही अतिशय संतापजनक असून तिने आपलं मन मोकळं केलं आहे. 

अधिक वाचा – श्री गणेशाच्या आगमनासाठी ‘हे गणराया’ गाणे प्रेक्षकांच्या भेटीस

मुनमुनने शेअर केली पोस्ट

मुनमुन दत्ताने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. आपल्या आयुष्याबाबत अशी बातमी देण्याचा अधिकार तुम्हाला नक्की कोणी दिला असा संतप्त सवालही तिने विचारला आहे. ‘कोणत्याही व्यक्तीच्या खासजी आयुष्यावर काल्पनिक बातमी देण्याचा अधिकार नक्की तुम्हाला कोणी दिला? तुमच्या या वृत्तामुळे त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो अथवा कोणता बदल होतो याची जबाबदारी तुम्ही येऊन स्वीकारणार आहात का? एखाद्या महिलेने तिचा प्रियकर अथवा मुलगा गमावलाय तर तुम्ही त्या अवस्थेत तिचे फोटो आणि व्हिडिओ काढता, हे सर्व केवळ टीआरपीसाठी करण्यात येते. तुमच्या मनाला हवे तसे हेडिंग आणि वृत्त देऊन तुम्ही कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का देता, त्यांचं आयुष्या उद्धस्त करण्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला हवी आणि जर तुम्ही तसं करू शकत नास तर तुम्हाला स्वतःचीच लाज वाटायला पाहिजे’ असे मुनमुनने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. 

तर दुसऱ्या पोस्टमध्येही तिने आपला राग व्यक्त केला आहे, ‘मी सर्वांकडूनच चांगल्या अपेक्षा ठेवल्या. पण तुम्ही सर्वांनी कमेंट सेक्शनमध्ये जो काही अश्लीलपणा केला आणि आपल्या समाजातील शिकलेल्या व्यक्तीही किती खालच्या थराला जाऊ शकतात हे दाखवलं आहे. महिलांना नेहमीच त्यांच्या वयावरून, आईवरून हिणवलं जातं. तुम्ही बोलत आहात त्याचा समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतोय याबाबत तुम्हाला काहीही वाटत नाही. मी गेल्या 13 वर्षांपासून तुमचे मनोरंजन करत आहे आणि माझी प्रतिष्ठा उद्धस्त करण्यासाठी तुम्हाला 13 मिनिट्सही लागली नाहीत. यापुढे जर कोणी नैराश्याच्या गर्तेत जादत असेल अथवा स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न करत असेल तर हे तुमच्यामुळेच घडलं नाही ना याचा जरा विचार करा. आज मला खरंच भारताची मुलगी आहोत हे म्हणायलाही लाज वाटत आहे.’

अधिक वाचा – माही विजने पती जय भानुशालीला केले इन्स्टाग्रामवर ब्लॉक, कारण वाचून व्हाल हैराण

राजनेही व्यक्त केले मत

दरम्यान राजनेही याबाबत आपली प्रतिक्रिया देत हे अत्यंत वाईट असून आपण जे लिहितोय त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत याचा किमान विचार करावा असे म्हटले आहे. दोघांमध्येही किमान 9 वर्षांचे अंतर आहे. मात्र दोघांनीही या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देत संताप व्यक्त करत आपल्यामध्ये असे कोणतेही नाते आहे की नाही याबाबत बोलण्यापेक्षाही सध्या ज्या पद्धतीने पत्रकारिता चालू आहे त्याबद्दल ताशेरे ओढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खरंच दर्जा खालावला असल्याचे सर्वच पातळीवर ऐकू येत आहे. त्यामुळे आता बातमी करताना किमान याचे तरी भान राखले जाईल अशी अपेक्षा चाहत्यांकडूनही होत आहे. 

अधिक वाचा – नागाचैतन्य आणि समांथामधील वाद मिटवण्याचा नागार्जुन करत आहेत प्रयत्न

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक