ADVERTISEMENT
home / आरोग्य
must have fitness gadgets for workout from home in marathi

घरी वर्कआऊट करण्यासाठी तुमच्याजवळ असायलाच हवेत ‘हे’ फिटनेस गॅझेट्स

आरोग्य हीच खरी संपत्ती आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे प्राचीन काळापासून आरोग्य उत्तम राखण्यासाठी काही नियम सांगितले जातात. लवकर उठणं, वेळेवर झोपणं, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम यासाठी गरजेचं असतं. पण आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या सर्व गोष्टी पाळणं थोडं कठीण झालं आहे. मात्र मागील काही वर्षांपासून कोरोनामुळे पुन्हा एकदा आरोग्याचं महत्त्व सर्वांना पटलं आहे. सहाजिकच दररोज व्यायाम करण्याकडे आता अनेकांचा कल वाढला आहे.  पावसाळ्यात जर तुम्हाला व्यायाम करण्यासाठी जीम अथवा बाहेर जाणं शक्य नसेल तर घरीच व्यायाम करा. मात्र सोबत हे गॅझेट्स ठेवा ज्यामुळे व्यायाम करणं होईल अधिक सोपं… तसंच यासाठी वाचा Vyayamache Mahatva | व्यायामाचे जीवनातील महत्त्व आणि फायदे आणि आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

स्किपिंग रोप

दोरीच्या उड्या हा आपण लहानपणापासून खेळत असलेला एक खेळ आहे. पण आता मोठेपणी तुम्ही घरी व्यायामासाठी हे हे साधन वापरू शकता. पावसाळ्यात घराबाहेर जाऊन व्यायामाचा कंटाळा येत असेल तर घरीच दोरीच्या उड्या मारा. कार्डिओ वर्कआऊटसाठी हा व्यायामप्रकार बेस्ट आहे. विशेष म्हणजे आजकाल स्मार्ट जंप रोप विकत मिळतात. ज्यामध्ये तुम्हाला तुमचा वर्कआऊट डेटा, जंप काऊंट आणि किती कॅलरी बर्न झाल्या हे देखील समजू शकते. यासाठी तुमच्या वक्त

स्मार्ट वॉच 

जीममध्ये गेल्यावर तुम्ही कितीवेळ व्यायाम केला, किती पावलं तुम्ही चालला, किती अंतर तुम्ही धावला अशा अनेक गोष्टींची नोंद होते. मात्र घरात व्यायाम करताना तुम्हाला याची नोंद ठेवता येत नसेल तर व्यायाम करताना स्मार्ट वॉच घाला. कारण यात तुमचा डेली वर्क आऊट, तुम्ही चाललेले अंतर अशा अनेक गोष्टींची आपोआप नोंद ठेवली जाते. तुमचे एक्सरसाईज गोल सेट करण्यासाठी तुम्हाला स्मार्ट वॉचची नक्कीच मदत होते. ह्रदयाचे ठोके, स्टेप्स काउंट, ऑक्सिजनची पातळी अशा अनेक गोष्टींचा ट्रॅक तुम्ही यावर ठेवू शकता.

पोर्टेबल ट्रेडमिल

जीममध्ये व्यायाम करण्यासाठी तुम्ही सर्वात जास्त वापरता ती म्हणजे ट्रे़ड मिल. कारण कार्डिओ व्यायाम करण्यासाठी तुम्हाला ट्रे़डमिलवर धावणं गरजेचं असतं. वजन कमी करण्यासाठी, अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी हा उत्तम व्यायाम असतो. पण यासाठी जीममध्ये जाणं शक्य नसेल तर घरीच एखादं छोटं, पोर्टेबल ट्रेडमिल आणा. ज्यामुळे तुम्हाला घरच्या घरी धावण्याचा व्यायाम करता येतो. वाचा सकाळी चालण्याचे अप्रतिम फायदे (Morning Walk Benefits In Marathi)

ADVERTISEMENT

केटलबेल

स्ट्रेंथ, कोअर पॉवर, फ्लेस्किबिलीटी सुधारण्यासाठी तुम्हाला व्यायामाचे हे टूल नक्कीच फायद्याचं ठरेल. फॅट बर्न करण्यासाठी आणि मसल्स टोन करण्यासाठी तुम्ही घरीच केटलबेलने व्यायाम करू शकता. आजकाल केटलबेलचा वापर जीममध्ये वाढत आहे. त्यामुळे घरीच व्यायाम करण्यासाठी तुम्ही नक्कीच हे साधन वापरू शकता. आता आकाराने लहान आणि कुठेही नेता येतील अशी केटलबेल सहज विकत मिळतात. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

27 Jun 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT