ADVERTISEMENT
home / Care
must have skin care essentials of all brides in Marathi

प्रत्येक नववधूकडे असायलाच हवे हे स्किन केअर प्रॉडक्ट

लग्नाचा सीझन जोरदार सुरू झाला आहे. त्यामुळे लग्न ठरलेल्या नववधू सध्या स्वतःचा फिटनेस आणि सौंदर्य याकडे जरा जास्त लक्ष देऊ लागल्या आहेत. सौंदर्याची काळजी घेण्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे त्वचा आणि केसांची निगा राखणं. कारण ताणतणाव, जबाबदारीची चिंता, धावपळ, मेकअप याचा नकळत तुमच्या त्वचेवर परिणाम होत असतो.यासाठी लग्नाची तारिख ठरताच तुमच्या त्वचेची योग्य काळजी घेण्यास सुरूवात करा. त्वचेची निगा राखण्यासाठी प्रत्येक नववधूकडे हे स्किनकेअर असणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जाणून घ्या नववधूचे रुप खुलवणाऱ्या एअरब्रश मेकअप (Airbrush Makeup) विषयी जाणून घ्या सर्व काही

नववधूकडे असायला हवेत हे स्किनकेअर

लग्न ठरल्यावर प्रत्येक नववधूने या स्किन केअर रुटीनला फॉलो करायला हवं.

मॉईस्चराईझर 

लग्नाचा सीझन हा हिवाळा आणि उन्हाळ्याचा असतो. या काळात तुमच्या त्वचेला योग्य पोषणासाठी गरजेचं असतं चांगलं मॉईच्सराईझर. यासाठी तुमच्या स्किनकेअरमध्ये ते आवर्जून असायला हवं. कोणतं मॉईस्चराईझर नववधूने वापरायला हवं याचा विचार करण्यापेक्षा तुमची त्वचा कोणत्या टाईपची आहे हे लक्षात घ्या. त्यानुसार तुमच्यासाठी योग्य मॉईस्चराईझर निवडा आणि नियमित वापर करा. फेस सीरम आणि मॉईस्चराईझर यात काय आहे फरक (Facial Serum Vs Face Moisturizer)

फेस वॉश

मॉईस्चराईझर वापरण्याआधी तुमच्या त्वचेचं क्लिझिंग तितकंच गरजेचं आहे. कारण जर त्वचा मुळापासून स्वच्छ असेल तरच तुम्ही वापरलेलं मॉईस्चराईझर त्वचेत खोलवर मुरेल. यासाठी त्वचा क्लिन करण्यासाठी चांगलं फेसवॉश त्वचेवर लावा. त्वचा जास्त कोरडी होणार नाही याची काळजी घेण्यासाठी त्वचेच्या प्रकारानुसार फेस वॉश निवडा. त्वचेचे पोअर्स मोकळे राहू नयेत यासाठी क्लिझिंगनंतर गुलाबपाणी अथवा टोनर त्वचेला लावा.

ADVERTISEMENT

बॉडी वॉश 

फेसवॉशप्रमाणेच नववधूने चांगला बॉडी वॉश वापरणंही तितकंच गरजेचं आहे. इतर गोष्टींची काळजी घेताना याकडे दुर्लक्ष करू नका. कारण या काळात तुम्ही अशा बॉडी वॉशची निवड करायला हवी. ज्यामुळे तुमच्या त्वचेला मऊपणा मिळेल आणि त्वचेला एक छान सुंगध मिळेल.

फेस मास्क 

फेसमास्कमुळे तुमच्या त्वचेला अधिक चमक मिळते. तुमचं लग्न ठरलं आहे त्यामुळे तुम्हाला आता त्वचेवर जास्त चमक आणि ग्लो यावा असं नक्कीच वाटत असेल. अशा वेळी काही दिवसांच्या अंतराने त्वचेवर चांगले फेस मास्क लावण्यास सुरुवात करा. रात्री झोपण्यापूर्वी अथवा मधल्या रिकाम्या वेळेत तुम्ही एखादा शीट मास्क वापरून तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. लग्नाची तयारी करता करता खास वाचा मराठी उखाणे नवरीसाठी (Marathi Ukhane For Bride)

ताण कमी करणारे प्रॉडक्ट

लग्नकार्य म्हटलं की सतत काही ना काही गोष्टींचा ताण हा येणारच. पण ताणामुळे तुमची त्वचा वयस्कर दिसू शकते. यासाठी लग्नाआधी तुम्ही ताण कमी करणारे काही प्रॉडक्ट नक्कीच वापरायला हवेत. डिस्ट्रेस रुटीनसाठी तुम्ही रात्री झोपताना लव्हेंडर ऑईल अथवा  टी ट्री ऑईल तुमच्या हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना लावू शकता. हॉट बाथ घेऊन आणि स्ट्रेस फ्री प्रॉडक्ट वापरून तुम्ही तुमचा ताण नियंत्रणात ठेवू शकता. 

नववधूसाठी ‘पर्ल पर्ल’ दिल के पास (Pearl Jewellery Designs In Marathi)

ADVERTISEMENT
17 Jan 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT