ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
myths about ageing you should never believe in Marathi

वाढत्या वयाबद्दल असलेल्या या गैरसमजांवर कधीच ठेवू नका विश्वास

वृ्द्धत्व हा माणसाच्या आयुष्यातील एक  छान टप्पा आहे. प्रत्येकाने त्याचा स्वीकार करून तो काळ आनंदात घालवला पाहिजे. मात्र वय वाढू लागलं की लोकांना म्हातारं होण्याची भीती आणि चिंताच जास्त सतावताना दिसते. पांढरे केस, चेहऱ्यावरील सुरकुत्या, पडलेले दात, विस्मरण, जवळच्या लोकांनी वेळ न देणं अशा अनेक दडपणाखाली लोक हा वृद्धत्वाचा काळ घालवतात. याला कारण लहानपणापासून वय वाढण्याबाबत सांगण्यात आलेले काही समज असू शकतात. यासाठीच आज आपण असेच काही गैससमज जाणून घेणार आहोत.

वाढत्या वयासोबत झोप कमी येते 

असं समजलं जातं की वय वाढणं म्हणजे तुमची  झोप आपोआप कमी होणं. पण झोप ही माणसाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. ज्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळतो आणि मेंदूला निवांतपणा…तुम्ही तरूण असा वा वृद्ध निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाला कमीत कमी सहा ते आठ तास झोप मिळायला हवी. यापेक्षा कमी झोपल्यास तुम्हाला अशक्तपणा अथवा थकवा जाणवू शकतो. यासाठीच वय वाढलं तरीपण प्रत्येकाने निवांत झोप घ्यायला हवी. यावर सोपा उपाय म्हणजे लवकर झोपणं आणि लवकर उठणं हा ठरू शकतो. त्यामुळे वय वाढलंय म्हणून उगाचच रात्रभर जागे राहू नका.

चाळीशीनंतर झोप झाली असेल कमी तर वापरा सोप्या टिप्स

वृद्धांनी जास्त शारीरिक व्यायाम करू नये

वृद्धांबाबत करण्यात येणारी सर्वात मोठी चूक म्हणजे वय वाढू लागतात त्यांना कोणतेही शारीरिक व्यायाम अथवा हालचाल करण्यावर मर्यादा घातली जाते. घरच्यांचा त्यामागे हा हेतू असतो की उगाच तोल गेला तर जखम अथवा फ्रॅक्चर होऊ नये. मात्र यासाठी शारीरिक हालचाल करण्यापासून वृद्धांना कधीच थांबवू नये. कारण असं झालं तर त्यांना आजारी असल्याचे वाटू लागते आणि त्यांच्यामधील जगण्याचा उत्साह कमी होतो. यासाठी सकाळी आणि संध्याकाळी थोडं फार फिरणं आणि ओळखीच्या लोकांशी भेटणं फार गरजेचं आहे.

ADVERTISEMENT

नियमित व्यायाम करूनही वजन होत नाही कमी, मग असू शकतं हे कारण

वृद्धांना नैराश्य येणं स्वाभाविक आहे 

नैराश्य येणं वय वाढलेल्या अथवा वृद्ध लोकांमध्ये स्वाभाविक आहे हा एक मोठा गैरसमज आहे. कारण नैराश्य फक्त तेव्हाच येतं जेव्हा तुमच्या मनावर कोणतं तरी दडपण असतं. जर वाढत्या वयासोबत तुमच्या घरातील लोकांना नैराश्य येत आहे असं वाटत असेल तर त्याचं कारण त्यांचे वाढणारे वय नसून त्यांची मानसिक अवस्था कारणीभूत असू शकते. यासाठी घरातील वृद्धांचा आदर करा आणि त्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही तणावाखाली तर नाही ना… जाणून घ्या नैराश्य लक्षणे (Depression Symptoms In Marathi)

13 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT