अनेक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassanandani) खूपच प्रसिद्ध आहे. विशेषतः एकता कपूरच्या नागिन (Naagin) आणि ये है मोहब्बते (Ye Hai Mohabbatein) या मालिकेतून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली. अनिताने काही महिन्यांपूर्वीच गोंडस बाळाला जन्म दिला असून त्याचे नाव आरव रेड्डी (Aarvavv Reddy) आहे. गरोदरपणानंतर अनिता सध्या आपल्या वाढलेल्या वजनावर काम करत आहेच. पण आरवचे अनेक व्हिडिओदेखील ती पोस्ट करत असते. डिलिव्हरीपूर्वी आणि नंतरचा काळही अनिता खूपच मजेत घालवत आहे. पण सध्या आरवच्या जन्मानंतर अनिताने आपले करिअर सोडले असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. गरोदरपणापासून अनिताने केवळ आपल्या बाळावर लक्ष केंद्रित केल्यानेच या चर्चा सुरू झाल्या असून आता नक्की अनिताचं यावर काय म्हणणं आहे याबाबत तिच्या चाहत्यांनाही जाणून घ्यायचं आहे. कारण अचानक अनिताने असं करिअर सोडणं तिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक ठरत आहे. पण अनिताने स्वतः यावर खुलासा केला आहे.
Big Boss Marathi 3: संग्राम समेळ आणि नेहा जोशीचा सहभाग असण्याची शक्यता
सध्या बाळावर लक्ष केंद्रित
अनिताने स्वतः या गोष्टीवर खुलासा करत ट्विट केले होते. वास्तविक अनिताने आपल्या अभिनयाच्या करिअरमधून ब्रेक घेतला आहे. तिने करिअर सोडलेले नाही. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा दिलासा आहे. ‘सर्व ठिकाणी मी करिअर सोडले असल्याच्या अफवा येत आहे. पण असं मी कधीही म्हटलेलं नाही. मी इतकंच म्हटलं आहे की, सध्या माझं लक्ष केवळ माझ्या बाळावर आहे आरव हा माझे प्राधान्य आहे. जेव्हा मला वाटेल तेव्हा मी कामावर परत येईन’ असं अनिताने ट्विट करत सांगितले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या या चर्चेवर आता नक्कीच ब्रेक लागला असेल. तर लवकरच तिने पुन्हा पडद्यावर दिसावं अशीही तिच्या चाहत्यांची अपेक्षा आहे. मात्र अनिता सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. त्यामुळे तिचे व्हिडिओ आणि रिल्स पाहूनदेखील चाहते आनंदी होतात. इतकंच नाही तर तिच्या व्हिडिओमध्ये ती आरव आणि तिचा पती रोहित रेड्डी या दोघांनाही सामावून घेते.
मी बनू शकते उत्तम दिग्दर्शक कंगनाचा दावा
It’s all over that I’m quitting my first love ACTING
I never said that…. All I said was that my focus right now is my child…. Aaravv is my priority… I will resume work when I’m ready 🌈💫❤️— Anita Hassanandani (@anitahasnandani) June 11, 2021
रोहित रेड्डीची प्रतिक्रिया
याबाबत अनिताचा पती रोहित रेड्डीनेदेखील एका मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. अनिताने अभिनय सोडलेला नाही. ती सध्या केवळ मदरहूड एन्जॉय करत आहेत. आपल्या बाळासह अधिक वेळ तिला घालवायचा आहे. आई आणि वडील दोघांनीही त्याला अधिकाधिका वेळ द्यावा इतकंच तिला वाटत आहे. काम हे तिच्यासाठी सध्या अगदी शेवटच्या यादीत आहे. असं असलं तरीही ती सध्या अनेक ब्रँड्ससाठी काम करत आहे. घरात ती व्यस्त आहे. त्यामुळे टीव्हीवर परत येणे अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणे या सगळ्यासाठी नक्कीच थोडा कालावधी लागणार आहे. यावर्षी तर ती नक्कीच परत येणार नाही. फेब्रुवारी 2021 मध्ये अनिताने आरवला जन्म दिला. आरव केवळ चार महिन्याचा असला तरीही तो इंटरनेटवरील सध्या प्रसिद्ध बाळांपैकी एक आहे. त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर अनेक क्यूट आणि मजेशीर व्हिडिओ अनिता पोस्ट करत असते. त्यामुळे आता आरवचेही अनेक चाहते झाले आहेत.
तुझ्यात जीव रंगला फेम धनश्री काडगावकरच्या बाळाचं झालं बारसं
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक