ADVERTISEMENT
home / Recipes
nachni satva recipe in marathi

नाचणी सत्व आणि नाचणी रेसिपीज (Nachni Satva Recipe In Marathi)

नाचणी सत्व म्हणजे दूध, गूळ अथवा साखर टाकून तयार केलेली नाचणीची खीर… हिवाळा जवळ आला की घरोघरी नाचणीचे सत्व तयार केले जाते. कारण नाचणीचे सत्व पौष्टिक आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम असते. चविष्ट अशा या नाचणीच्या सत्वामुळे तुमच्या शरीराला पुरेसे कॅल्शिअम, लोह, फायबर्स आणि इतर पोषक घटक सहज मिळतात. त्यामुळे हिवाळ्यात नाचणीचे सत्व पिणे (ragi recipes in marathi ) हा एक उत्तम पर्याय आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी शरीराला पुरेशी ऊर्जा मिळण्यासाठी नाचणीच्या सत्वाची हिवाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच गरज असते. या काळात तान्ह्या बाळाला खास नाचणीचे सत्व दिले जाते ज्यामुळे बाळ लवकर बाळसे धरते. थोडक्यात बाळाच्या वाढ आणि विकासासाठी नाचणीचे सत्व उपयुक्त ठरते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाचणीचे सत्व बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी जाणून घ्या नाचणी सत्व आणि नाचणी रेसिपीज (nachni satva recipe in marathi)

नाचणीचे फायदे आरोग्यासाठी (Nachni Benefits In Marathi)

नाचणी सत्व रेसिपी (Nachni Satva Recipe In Marathi)

Nachni Satva Recipe In Marathi

नाचणीचे सत्व बनवणे अतिशय सोपे असून तुम्ही अगदी झटपट केव्हाही नाचणीचे सत्व बनवू शकता.

नाचणी सत्व साहित्य –

ADVERTISEMENT
  • नाचणी एक वाटी
  • किसलेले ओले खोबरे एक वाटी
  • गूळ एक वाटी
  • सुकामेवा गरजेनुसार
  • मीठ चवीपुरते
  • पाणी गरजेनुसार
  • तूप एक चमचा
  • वेलची पावडर चिमूटभर

नाचणी सत्व रेसिपी 

1. नाचणी रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी.

2. सकाळी नाचणी उपसून चांगली धुवून घ्यावी

3. मिक्सरमध्ये नाचणी आणि ओले खोबरे वाटून घ्यावे. पातळ पेस्ट करून ते गाळणीने गाळून त्याचे सत्व काढावे.

ADVERTISEMENT

4. या पेस्टमध्ये गरजेनुसार गूळ घालावा. गूळ नसेल तर साखरही चालेल पण गूळ आरोग्यासाठी उत्तम असल्याने गूळ वापरणे योग्य ठरेल.

5. या पेस्टमध्ये सत्व जितके पातळ करायचे आहे त्यानुसार पाणी मिसळावे.

6. नाचणी सत्वात गूळ विरघळ्यावर ते मिश्रण गॅसवर मंद आंचेवर शिजू द्यावे. सत्व भांड्याला चिकटू नये यासाठी सतत चमच्याने ढवळत राहावे. शिजल्यावर चवीपुरते मीठ त्यात टाकावे.

7. नाचणीचे सत्व जस जसे शिजू लागेल तस तसे ते घट्ट  होईल. 

ADVERTISEMENT

8. तयार नाचणी सत्वात सुकामेवा आणि वरून तूपाची धार सोडावी. हवी असल्यास वेलची पूड टाकावी आणि गरमागरम खाण्यासाठी सत्व द्यावे.

नाचणीचे सत्व बनवण्यासाठी काही सोप्या टिप्स (Some Recipe Tips For Nachni Satva Recipe In Marathi)

नाचणीचे सत्व (nachni satva recipe in marathi) बनवताना काही खास गोष्टींची काळजी घ्यायला हवी. 

  • तुमचे बाळ तान्हे असल्यास या सत्वामध्ये सुकामेवा, खोबरे, वेलची पूड बेताने टाकावी. मात्र तूप आणि गूळ प्रमाणात असावा. मोठ्या मंडळींसाठी वर दिलेल्या कृतीप्रमाणेच सत्व बनवावे.
  • नाचणी सत्व बनवण्यासाठी रात्रभर नाचणी पाण्यात भिजत घालणे गरजेचे आहे.  रात्रभर शक्य नसल्यास कमीत कमी सहा ते सात तास नाचणी भिजत ठेवावी.
  • मुलांसाठी तुम्ही त्यांच्या आवडीनुसार सुकामेवा या सत्वात मिसळू शकता. मात्र फार तान्हा बाळासाठी सुकामेवा वापरू नये. शिवाय सुकामेवा वापरायचा असेलच तर त्याची पूड वापरावी. ज्यामुळे मुलांच्या घशात सुक्यामेव्याचे तुकडे अडकणार नाहीत.
  • गुळाला पर्याय म्हणून नाचणी सत्वात साखर वापरण्यास काहीच हरकत नाही. मात्र सत्व पौष्टिक करण्यासाठी गूळच उत्तम ठरेल.
  • नाचणीचे सत्व एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये टिकू शकते पण ते बनवण्यासाठी जास्त कष्ट नसल्यामुळे ते बनवून ताजे खाणे जास्त योग्य राहिल. 

नाचणीचे पापड रेसिपी (Nachaniche Papad Recipe In Marathi)

Nachaniche Papad Recipe In Marathi

नाचणीचे पापड खाणे देखील आरोग्यासाठी चांगले आहे. शिवाय नाचणीचे पदार्थ (ragi recipes in marathi) हा बेगमीचा पदार्थ असल्यामुळे तो बरेच दिवस टिकू शकतो.

नाचणीचे पापड साहित्य –

ADVERTISEMENT
  • नाचणी एक किलो
  • मीठ चवीनुसार
  • पापडखार तीस ग्रॅम
  • हिंग तीन ग्रॅम
  • जिरे

नाचणीचे पापड बनवण्याची कृती –

  1. नाचणी रात्री धुवून रात्रभर ओल्या फडक्यावर सुकत ठेवावे.
  2. नाचणी सुकल्यावर दळून पीठ चांगले गाळून घ्यावे.
  3. पिठात हिंग, मीठ, पापरखार टाकून पीठ मिसळावे.
  4. पीठाला समप्रमाणात पाणी टाकून चांगली उकड काढावी.
  5. पीठ गरम असतानाच पापड लाटावे आणि वाळवावे.

नाचणीचे लाडू रेसिपी (Nachani Ladoo Recipe In Marathi)

Nachani Ladoo Recipe In Marathi

लाडवाचे विविध प्रकार घरात केले जातात पण नाचणीचे लाडू खूपच पौष्टिक असतात आणि हिवाळ्यात या लाडवामुळे शरीरात चांगली ऊर्जा निर्माण होते.

नाचणीचे लाडू साहित्य –

  • नाचणीचे पीठ दोन वाटी
  • गव्हाचे पीठ 1 वाटी
  • सुके खोबरे 1 वाटी
  • पातळ पोहे अर्धी वाटी
  • तूप 1 वाटी
  • पिठी साखर सव्वा वाटी
  • किसलेला गूळ 1  वाटी
  • वेलची पूड चिमूट भर
  • सुकामेवा गरजेनुसार
  • दूध अर्धी वाटी

नाचणीचे लाडू रेसिपी –

ADVERTISEMENT
  1. सुकामेवा भाजून मिक्सरमध्ये वाटून घ्या
  2. पोहे दळून घ्या आणि सुकमेवा तळून घ्या
  3. कढईत तूप घ्या त्यात त्यात नाचणीचे पीठ भाजून घ्या
  4. पिठात दूध आणि सर्व साहित्य मिसळा.
  5. सर्व साहित्य एकत्र करा आणि लाडू वळून घ्या.

नाचणी डोसा रेसिपी (Nachni Dosa Recipe In Marathi)

Nachni Dosa Recipe In Marathi

तांदळाचे डोसे तर आपण नेहमीच करतो मात्र नाचणीचे डोसे तुम्ही कधी केले आहेत का हे करायला अतिशय सोपे आणि खायला अतिशय चविष्ट लागतात.

नाचणीचा डोसा साहित्य –

  • तांदूळ 1 वाटी
  • नाचणी 1 वाटी
  • उदीड डाळ अर्धी वाटी
  • चिमूटभर मेथीचे दाणे
  • चवीपुरते मीठ

नाचणीचे डोसे बनवण्याची कृती –

  1. नाचणी, उडीद डाळ आणि तांदूळ मेथीचे दाणे टाकून रात्रभर पाण्यात भिजत ठेवावी.
  2. सर्व साहित्य वाटून त्याचे पीठ तयार करावा
  3. मीठ टाकून डोशाचे बॅटर तयार करावे
  4. नॉनस्टिक तव्यावर थोडं तेल लावून पळीभर बॅटर टाकून डोसे बनवावे
  5. चटणी सोबत गरमागरम डोसे सर्व्ह करावे

डोसा कसा बनवायचा, निरनिराळ्या डोसा रेसिपी मराठी (Dosa Recipes In Marathi)

ADVERTISEMENT

नाचणी आंबिल रेसिपी (Nachni Ambil Recipe In Marathi)

Nachni Ambil Recipe In Marathi

हिवाळ्यात बऱ्याचदा नाचणीच्या सत्वाप्रमाणेच नाचणीचे आंबिलदेखील केले जाते. नाचणीचे आंबिल खाण्यामुळे हिवाळ्यात शरीराला चांगले पोषण मिळते.

नाचणीचे आंबिलसाठी लागणारे साहित्य –

  • नाचणीचे पीठ 1 वाटी
  • चवीपुरते मीठ
  • चार पाच लसणाच्या पाकळ्या
  • दही 

नाचणीचे आंबिल करण्याची कृती –

  1. रात्री नाचणीच्या पीठात दह्याचे ताक करून आंबिलचे पीठ तयार करावे
  2. सकाळी मीठ पीठ शिजवून घ्यावे
  3. लसणाची वरून फोडणी द्यावी
  4. थंड झाल्यावर आंबिल ताक घालून प्यावे

नाचणी बिस्किट रेसिपी (Nachni Biscuits Recipe In Marathi)

Nachni Biscuits Recipe In Marathi

चहासोबत घरगुती बिस्किटे खाण्याचा मोह झाला असेल तर घरीच बनवा ही नाचणीची बिस्किटे

ADVERTISEMENT

नाचणीचे बिस्किट साहित्य

  • नाचणीचे पीठ 1 वाटी
  • गव्हाचे पीठ 1 वाटी
  • अर्धी वाटी तूप
  • एक वाटी गुळाची पावडर
  • एक चमचा बेकिंग पावडर
  • अर्धा चमचा वेलची पूड

नाचणीचे बिस्किट कृती

  1. थंड तूप फेटून घ्या आणि त्यात सर्व पीठ आणि बेकिंग पावडर टाका
  2. गुळाची पावडर मिसळून पीठ चांगले मळून घ्या
  3. पिठाचे समान गोळे करून त्याला बिस्किटाचा आकार द्या
  4. बिस्किटे ओव्हनमध्ये बेक करा 

नाचणी खीर रेसिपी (Nachni Kheer Recipe In Marathi)

Nachni Kheer Recipe In Marathi

नाचणीच्या सत्वासाठी नाचणी भिजवून खीर केली जाते पण जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही नाचणीच्या पीठापासूनच ही चविष्ट खीर तयार करू शकता.  

नाचणी खीर साहित्य – 

ADVERTISEMENT
  • नाचणीचे पीठ दोन चमचे
  • एक वाटी दूध
  • पाणी
  • दोन चमचे गूळ
  • वेलची पूड

नाचणीची खीर कृती –

  1. नाचणीचे पीठ दूध आणि हवे तेवढे पाणी मिसळून भिजवून घ्यावे. 
  2. पिठात गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्या. 
  3. मीठ आणि गूळ टाकून मिश्रण गॅसवर शिजवावे.
  4.  शिजली की गरमागरम खीर वाढावी.

नाचणी इडली रेसिपी (Nachni Idli Recipe In Marathi)

Nachni Idli Recipe In Marathi

नास्तासाठी मस्त इडली चटणी करायचा बेत असेल तर या रविवारी बनवा मस्त इडलीची चटणी त्यासाठी वाचा ही नाचणीची इडली रेसिपी

नाचणी इडली साहित्य – 

  • एक वाटी नाचणी
  • अर्धी वाटी इडली रवा
  • अर्धी वाटी उदीड डाळ
  • मीठ
  • पाणी

नाचणी इडलीची कृती –

ADVERTISEMENT
  1. नाचणी आणि उडीद डाळ आठ तास वेगवेगळी भिजत ठेवावी.
  2. रात्री सर्व साहित्य वाटून त्यात इडली रवा मिसळून रात्रभर मिश्रण एकत्र तयार होण्यास ठेवावे.
  3. सकाळी इडलीचे बॅटर चांगले तयार होईल.
  4. सकाळी इडलीच्या भांड्यात इडली उकडून घ्यावा.
  5. वीस मिनीटे उकडून इडली तयार करावी.
  6. गरमागरम इडली आणि चटणी सर्व्ह करावी. 

घरच्या घरी बनवा मऊ लुसलुशीत इडलीचे वेगवेगळे प्रकार (Idli Recipe In Marathi)

नाचणी सूप रेसिपी (Nachni Soup Recipe In Marathi)

Nachni Soup Recipe In Marathi

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध प्रकारचे सूप केले जाते. नाचणीचे सूप तर थंडीत अप्रतिम लागते.               

नाचणीचे सूप साहित्य –

  • नाचणीचे पीठ दोन चमचे
  • एक चमचा तेल
  • जिरे धणे पूड
  • सर्व मिक्स भाज्या एक वाटी
  • काळीमिरी पावडर 
  • मीठ

नाचणीचे सूप कृती –

ADVERTISEMENT
  1. सर्व भाज्या उकडून घ्याव्या.
  2. नाचणीचे पीठ तूपावर परतून घ्या.
  3. भाज्या उकडून त्या तव्यावर परताव्या. 
  4. नाचणीचे पीठ पाण्यात भिजवून घ्यावे शिजलेल्या भाज्या स्मॅश करून त्याचा रस काढावा.
  5.  सर्व साहित्य एकत्र करून गॅसवर शिजवावे. 
  6. मीठ, काळीमिरी टाकून  गरमागरम सूप वाढावे. 

नाचणी थालीपिठ रेसिपी (Nachni Thalipeeth Recipe In Marathi)

Nachni Thalipeeth Recipe In Marathi

थालीपिठ हा जेवणाच्या मधल्या वेळी खाण्यासाठी एक उत्तम पदार्थ आहे. पण यावेळी सर्व प्रकारची पीठ वापरून थालीपिठ करायचे नसेल तर नाचणीच्या पिठापासून बनवा खमंग थालीपिठ

नाचणीचे थालीपिठ साहित्य –

  • दोन वाटी नाचणीचे पीठ
  • एक चिरलेला कांदा
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा जिरे पावडर
  • चिमूटभर हळद पावडर
  • चवीपुरते मीठ
  • कोथिंबीर
  • एक चमचा दही
  • तेल

नाचणीचे थालीपिठ कृती –

  1. नाचणीच्या पिठात कांदा आणि सर्व साहित्य मिक्स करावे
  2. पिठाचा गोळा पंधरा ते वीस मिनीटे ओल्या फडक्याखाली ठेवावा.
  3. तव्यावर थालीपिठ घालावे आणि खरपूस भाजावे
  4. लोण्यासोबत गरमागरम सर्व्ह करावे
12 Nov 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT