छाय अक्कनी म्हणजेच अभिनेता नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांना वेगळे होऊन आता 8 महिने झालेत. त्यांची वेगळी होण्याची बातमी ही अनेकांना धक्का देणारी होती. पण आता दोघे त्यांच्या आयुष्यात सुखी असलेले दिसत आहे. समँथा सध्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असलेली दिसत आहे. ती तिच्या कामाशी बांधिल असून ती आता भूतकाळात रमताना अजिबात दिसत नाही. तर दुसरीकडे नागा चैतन्य हा नवे नाते जोडण्यासाठी सज्ज आहे. सध्या नागा चैतन्य कोणाला तरी डेट करत असल्याच्या बातम्यांनी चांगलाच जोर धरला आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला घेऊया जाणून
या अभिनेत्रीसोबत घालवतोय वेळ
नागा चैतन्य सध्या काही अभिनेत्रींसोबत आपला वेळ घालवताना दिसत आहे. यात सगळ्यात वर नाव येत आहे ते म्हणजे मेजर फेम अभिनेत्री शोभिता धूलिपालाचे (Shobita Dhulipala) या अभिनेत्रीसोबत नुकताच नागा चैतन्य त्याच्या नव्या घरी दिसला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घरी शोभिता ही त्याला भेटायला आली होती. तिला खास नव्या घरी नागा चैतन्यने आमंत्रण दिले होते. त्यामुळे तिच्यासोबत नागा बराच वेळ असतो असे अनेकांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर या यादीत केवळ शोभिताचे नाव नाही तर अन्य काहींचे नावही घेतले जात आहे पण शोभिताचे नवा या यादीत सगळ्यात वर आहे.
अधिक वाचा : ‘तमाशा लाईव्ह’चा प्रेक्षकांना संगीत नजराणा, पारंपरिक संगीताला आधुनिकतेचा साज
हॉटेलमध्येही दिसला नागा चैतन्य
एका खासगी चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार छाय अक्किनी हा अनेकदा शोभिता ज्या हॉटेलमध्ये राहतो त्या हॉटेलमध्ये जाताना दिसतो. मेजर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान छाया अक्किनी म्हणजेच नागा चैतन्यला अनेकदा पाहण्यास आले आहे. त्यामुळे हे दोघे डेट करत असल्याची चर्चा होत आहे. पण या दोघानीही या माहितीला कोणताही दुजोरा दिलेला दिसत नाही. नागा चैतन्यला असे वाटत असेल कोणीही नजर ठेवत नाही. पण त्याच्याकडे अनेकांच्या नजरा या खिळलेल्या आहेत.
या अभिनेत्रीसोबतही जोडले नाव
समँथा आणि नागा विभक्त होणार हे ऐकल्यावर खूप जणांना धक्का बसला होता. या दोघांमध्ये नेमके काय बिनसले याचे कारण खूप जणांना कळत नव्हते. या दोघांच्या मते कोणी आले का? अस वाटत होते. पण त्या दरम्यान अशा काही गोष्टी समोर आल्या नव्हत्या. पण शोभिता शिवाय त्याची को स्टार दिवांशा कौशिक हिच्यासोबतही त्याचे नाव जोडण्यात आले होते. त्यांच्या लग्नाच्या अफवा ही येत होत्या. पण आता शोभिताचे नाव जोडल्यानंतर आता को स्टारच्या नावाचा विसर पडला आहे हे नक्की!
समँथा करणार लग्न
तर दुसरीकडे समँथाही लवकरच लग्नगाठ बांधणार आहे असे कळत आहे. तिने सध्या कामात स्वत:ला झोकून घेतले असले तरी देखील तिला या पुढे आयुष्य एकट्याने घालायचे नाही. शिवाय पालकांनाही तिला त्रास द्यायचा नाही. त्यामुळे ती लवकरच लग्न करणार आहे असे कळत आहे.
सध्या या अफवांना पाहता नागा चैतन्य नक्कीच कोणाला तरी डेट करतोय
अधिक वाचा: कॉफी विथ करणचा सिझन सातवा लवकरच येणार ऑन एअर