ADVERTISEMENT
home / स्टोरीज
नागपंचमी साजरी करतात

म्हणून साजरी केली जाते नागपंचमी, जाणून घ्या पौराणिक महत्व

श्रावण महिन्याची सुरुवात ज्या सणाने होेते तो सण म्हणजे ‘नागपंचमी’ नागपंचमीच्या या दिवशी नागाची मनोभावे पूजा केली जाते.  पण नागपंचमी हा सण नेमका का साजरा केला जातो? या विषयी तुम्हाला माहीत आहे का? कुटुंबातील सगळ्यांना चांगले आयुष्य लाभावे यासाठी नागाची पूजा केली जाते. ग्रामीण भागात या सणाचे फारच जास्त महत्व आहे. अगदी आठवड्यापूर्वीपासून याची तयारी सुरु होते. बरेच ठिकाणी नवविवाहित मुलींना तिचा भाऊ माहेरात घेऊन जायला येतो.  पुराणात नागपंचमीसंदर्भातील एक कथा सांगितली जाते. ही कथा तुम्ही जाणून घेणे फारच गरजेचे आहे. नागपंचमीच्या शुभेच्छा देऊन तुम्ही हा साजरा केला जातो

 नागपंचमी साजरी करण्यामागील कथा

नागपंचमी साजरी का करतात त्यामध्ये एक पौराणिक कथा सांगितली जाते. ही कथा जाणून घेऊया. 

एक गाव होते. या गावात एक शेतकरी आपल्या शेताता शेत नांगरत असताना. त्याच्याकडून चुकीने नागिणीची पिल्ले मारली गेली. शेतात काम करताना ही पिल्ले मारली गेली याचा अंदाजही शेतकऱ्याला नव्हता. पण ज्यावेळी नागिण आपल्या वारुळाकडे आली. त्यावेळी तिला वारुळात पिल्ले दिसली नाहीत.तिला शेतकऱ्याच्या फावड्याला रक्त लागलेले दिसले. नागिणीला अंदाज आला की, शेतकऱ्यांमुळे तिची पिल्लं मारली गेली आहेत. तिने लगेचच जाऊन शेतकऱ्याला सर्पदंश करायचे ठरवले. तिने लगेचच जाऊन त्याचा निर्वंश करायचा ठरवले. नागिणीने शेतकऱ्याच्या सगळ्या कुटुंबाला संपवले. इतकेच नाही तर तिने शेतकऱ्याच्या विवाहित मुलीला जाऊन मारण्याचे ठरवले. नाग तिथे वेगाने तिच्या गावी जाण्यास निघाली.ती ज्यावेळी त्या मुलीच्या घरी पोहोचली त्या वेळी ती मनोभावे पूजा करत होती. पाटावर तिने नाग आणि नागकुळाची रांगोळी काढली होती. त्यावर लाह्या आणि दूधाचा अभिषेक केला होता.  या दिवशी पुरणाचे दिंड हा पदार्थ केला जातो.

सौजन्य : Instagram

नाग पूजा पाहून नागिण  संतुष्ट झाली. ती प्रसन्न होऊन दूध प्यायली.  आनंदाने ती मुलगी कोण हे जाणून घेण्यासाठी नागिण व्याकुळ झाली. तिने मुलीला तू कोण? असा प्रश्न केला तेव्हा मुलगी घाबरुन गेली. ती आरडाओरड करु लागली. पण नागिणीने तिला शांत केले. विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन तिने या व्रताची कहाणी सांगितली. नागिणीला भरुन आले. तिने तिचे संपूर्ण कुटुंब पुन्हा जिंवत केले.  त्या दिवसापासून या दिवशी नागपंचमी साजरी करण्याची पद्धत सुरु झाली. या दिवशी शेतकरी शेतात नांगर चालवत नाहीत. शेतकऱ्यांचा मित्र म्हणून नागाची ओळख आहे. शेतात उपद्रव करणाऱ्या उंदीर आणि इतरांचा नायनाट करण्यासाठी साप हा शेतकऱ्याला मदत करतो. त्यामुळे शेतकऱ्यासाठी साप हा महत्वाचा असतो

ADVERTISEMENT

अशी करा पूजा

 नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करण्याचा विचार करत असाल तर या गोष्टी नक्की फॉलो करा. 

  1. नागाची प्रतिकृती किंवा नागाची मातीची मूर्ती आणा. त्यावर दूध, दही लाह्याचा अभिषेक करा. 
  2. नागाला दूध फार आवडते असे म्हणतात ( म्हणून त्याच्यावर दूधाचा अभिषेक केला जातो. पण प्रत्यक्षात नाग दूध पित नाही)
  3. नागाची मनोभावे पूजा करुन शेतीचे रक्षण कर आणि शेतात चांगले अन्नधान्य येऊ दे यासाठी मनोकामना केली जाते. 

आशा पद्धतीने नागपंची हा सण साजरा केला जातो. 

12 Aug 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT