ADVERTISEMENT
home / Recipes
कांदेपोह्यांचा आला असेल कंटाळा तर नाश्त्यासाठी बनवा तर्री पोहे

कांदेपोह्यांचा आला असेल कंटाळा तर नाश्त्यासाठी बनवा तर्री पोहे

आज नाश्त्यासाठी काय बनवू असा प्रश्न आला की, पटकन पोहे असं उत्तर येतं. पोहे हा अगदी उत्तर भारतापासून ते दक्षिणेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने खाण्यात येणारा पदार्थ आहे. पोह्यामध्ये अत्यंत कमी तेल असून हा हेल्दी नाश्ता म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. तसंच पोहे खाल्ल्याने पोट भरते आणि लवकर भूक लागत नाही. तसंच पोहे चवीला अप्रतिम लागत असल्यामुळे आणि अगदी सामान्यालाही खिशाला परवडणारे असल्यामुळे सर्वात स्वस्त, मस्त, चविष्ट आणि अप्रतिम नाश्ता म्हणून पोहे ओळखले जातात. पोहे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. पण त्यातही आपल्याकडे नुसत्या कांदेपोह्यांचा खायचा कंटाळा आला असेल तर त्याला उत्तम पर्याय आहे तो म्हणजे नागपुरी झणझणीत तर्री पोहे (Tarri Poha). नुसते कांदे पोहे खायचा बऱ्याचदा कंटाळा येतो. मग त्यात शेव घालून किंवा लोणच्यासह अथवा दह्यासहदेखील खाल्ले जातात. पण तर्री पोहे नुसतं नाव जरी घेतलं तरी नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असणार ना? नागपूर मध्ये सर्वात जास्त तर्री पोहे खाल्ले जातात. खरं तर हा तिथलाच उगम आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. याचा स्वाद अप्रतिम असतो आणि ज्यांना तिखट आणि चमचमीत खायची आवड आहे त्यांच्यासाठी तर नाश्त्याला तर्री पोहे म्हणजे मेजवानीच. तुम्ही घरच्या घरीही हे चविष्ट नागपूरी तर्री पोहे तयार करू शकता. याची खास रेसिपी आम्ही तुम्हाला देत आहोत या लेखातून. चला तर मग वाट कसली पाहताय. लागा तयारीला…

तुम्ही बनवलेले कांदे पोहे होतील परफेक्ट तेही दोन मिनिटात, वाचा कसे

तर्री पोह्यासाठी लागणारे साहित्य

तर्री पोह्यासाठी लागणारे साहित्य

Instagram

ADVERTISEMENT

तर्री पोह्यासाठी लागणारे सर्व साहित्य तुम्हाला नक्की घरात मिळू शकते. पण तुम्हाला तर्री आणि पोहे या दोन्हीसाठी वेगवेगळे साहित्य लागेल. त्यासाठी नक्की काय काय घ्यायचे ते आपण आधी जाणून घेऊ. 

तर्रीसाठी लागणारे  साहित्य – 

  • ½ कप उकडलेले चणे 
  • 3 चमचे तेल
  • 1 लहान चिरलेला कांदा 
  • 2 चमचे सुक्या नारळाचे तुकडे 
  • ½ चमचा हळद पावडर 
  • 1 चमचा तिखट पावडर अथवा लाल मिरची पावडर 
  • 1 चमचा काश्मिरी लाल मिरची 
  • आलं – लसूण पेस्ट
  • 1 चमचा गोडा मसाला अथवा गरम मसाला 
  • 1 चमचा धने पावडर 
  • चवीपुरते मीठ 
  • दोन टॉमेटो
  • 1 चमचा चिरलेली कोथिंबीर
  • दोन चमचे बेसन 

पोह्यांसाठी साहित्य 

  • दोन कप जाडे पोहे 
  • 1 लहान चिरलेला कांदा 
  • 1 चमचा मोहरी
  • 1 चमचा जिरे 
  • 1 चमचा हिंग 
  • कडिपत्ता
  • कापलेल्या हिरव्या मिरच्या 
  • लिंबू
  • 1 चमचा हळद पावडर 
  • चवीपुरते मीठ 
  • तेल

सर्व्हिंगसाठी

ADVERTISEMENT
  • चिवडा
  • शेव
  • कोथिंबिर
  • लिंबू
  • चिरलेला कांदा 

झटपट नाश्ता रेसिपी मराठी भाषेत, तुमच्यासाठी खास (Easy Breakfast Recipes In Marathi)

बनविण्याची पद्धत

तर्री पोहे बनविण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागत नाही. पोह्यांची रेसिपी कोणाला माहीत नाही असं नाही.  तरीही एका विशिष्ट पद्धतीने तुम्ही हे पोहे  बनवून त्यावर तर्री घालून खाल्ली की अप्रतिम चव तुम्हाला मिळते. 

  • कांद्याचे लांबट तुकडे करून घ्या. टॉमेटोचे तुकडे करा. नारळाचेदेखील तुकडे  करून घ्या. चणे उकडून घ्या
  • एका कढईत तेल घाला. गरम झाल्यावर त्यात कांदा परता, नारळाचे तुकडे हलका ब्राऊन रंग येईपर्यंत भाजा. नंतर एका ताटलीत काढून घ्या
  • थंड झाल्यावर त्यात आलं – लसूण पेस्ट मिक्स करा आणि मिक्सरमधून वाटून घ्या.  तुम्हला कच्ची आलं – लसूण पेस्ट आवडत नसेल तर तुम्ही कांदा भाजताना आलं – लसूण पेस्ट भाजून घेऊ शकता
  • पुन्हा कढईतील तेलात ही मिक्सरमधून काढलेली पेस्ट भाजून घ्या.  त्यात बेसन घालून भाजा आणि कोथिंबीर घाला.
  • वरून टॉमेटोचे तुकडे, हळद, लाल मिरची पावडर, गोडा मसाला, गरम मसाला, धने पावडर, मीठ मिक्स करून नीट मिश्रण भाजून मिक्स करून घ्या. उकडलेले चणे आणि पाणी यामध्ये घालून व्यवस्थित उकळी येऊ द्या. उकळल्यावर त्यात लिंबाचा रस पिळा. तुमची तर्री तयार
  • तर दुसऱ्या बाजूला पोहे भिजवा. कढईत तेल घाला. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कडिपत्ता, हिरवी मिरची तुकडे घाला आणि परतून घ्या
  • तडतडल्यावर त्यात हळद घालून पोहे मिक्स करा आणि मीठ घालून चांगले वाफवा. वरून कोथिंबीर घालून व्यवस्थित वाफ द्या आणि पोहे तयार
  • आता एका डिशमध्ये पोहे घ्या, त्यावर चिवडा, शेव आणि शेंगदाणे घाला. वरून तयार करण्यात आलेली तर्री घाला. कोथिंबीर घाला आणि लिंबाचा रस हवं तर घालून द्या अथवा लिंबाची फोड बाजूला ठेवा

असे तयार केलेले तर्री पोहे नाश्त्यामध्ये अगदी चविष्ट लागतात आणि नेहमीच्या पोह्यांपेक्षा याची चवही अप्रतिम असते. दिवसभर याचा स्वाद काही जिभेवरून जाणार नाही हे नक्की. तुम्हीही करा नागपूरचे झणझणीत तर्री पोहे घरच्या घरी!

चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

ADVERTISEMENT

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

16 Feb 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT