#MeToo प्रकरणात नाना पाटेकर यांना क्लीनचीट मिळाली आहे. तनुश्री दत्ता हिचा आरोप सिद्ध करेल असा एकही पुरावा न मिळाल्यामुळेच नाना पाटेकर यांना क्लीनचीट मिळाली आहे. पण नाना पाटेकर यांची निर्दोष मुक्तता होत आहे हे कळल्यानंतर तनुश्रीने नाराजी व्यक्त केली आहे. तिने चक्क पोलीसांनाच या केस बाबत दुषणे लावत ‘भ्रष्ट पोलीस’ हा शब्द वापरत तिने पोलीसांच्या तपासावर संशयही व्यक्त केला आहे.
तनुश्री ठरली अपयशी
तनुश्री दत्ता हिने गेल्यावर्षी म्हणजेच 2018 साली #MeTooचं वादळ देशात आणलं. तिने नाना पाटेकर यांच्या विरोधात अंधेरी येथील ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तब्बल 10 वर्षांपूर्वी ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काय झाले याचा शोध घेण्यासाठी तपास सुरु करण्यात आला. पण नाना पाटेकर यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यात तनुश्री अपयशी ठरली आहे. तिने गोळा केलेले साक्षीदार नाना पाटेकर यांनी त्या दिवशी तनुश्रीसोबत काय केले? हे सांगण्यास अपयशी ठरले. अखेर एकही पुरावा न मिळाल्यामुळेच नाना पाटेकर यांना क्लीनचीट देण्यात आली आहे.
पोलीस भ्रष्ट
नाना पाटेकर यांना गुरुवारी या प्रकरणात क्लीनचीट देण्यात आली. त्यानंतर अनेकांनी तिची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तिने या संदर्भात ANI ला प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, भारताचे पोलीस भ्रष्ट आहे. येथील न्यायव्यवस्थाही तशीच भ्रष्ट आहे. जी नाना पाटेकरसारख्या भ्रष्ट माणसाला ओळखू शकत नाही. नाना पाटेकरने अनेक महिलांसोबत असे केले आहे. पण न्यायव्यवस्थाच भ्रष्ट असल्यामुळे हे सिद्ध होऊ शकले नाही याचे दु:ख आहे. त्यामुळे आता पुढे तनुश्री नेमंक काय करणार हे पाहावे लागेल. सध्या तनुश्री भारतात नाही.
डेझी शहा आणि गणेश आचार्य होते सेटवर
हॉर्न ओके प्लीज या चित्रपटातील आयटम साँगसाठी तनुश्री दत्ताला निवडण्यात आले होते. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी तिला डान्स शिकवण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य होता आणि त्याला अभिनेत्री डेझी शहा मदत करत होती. या दोघांनाही चौकशीसाठी बोलावण्यात आले. पण डेझी शहा देखील त्या दिवशी काय झाले हे नीट सांगू शकली नाही. त्यामुळेच तिच्या साक्षीतूनही फार काही हाती लागले नाही. या शिवाय सेटवर त्यावेळी काय झाले हे चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश सारंग यांनी सांगितले. पण तनुश्रीने त्यालाही खोटे ठरवले होते. त्यानंतर या प्रकरणावर तासनंतास चर्चा टीव्ही चॅनलवर करण्यात आली. पण काहींना तनुश्रीचे आरोप हे बिनबुडाचे ठरवले याचे कारण असे की, 10 वर्षानंतर तनुश्रीला या सगळ्याची आठवण अचानक का झाली? तनुश्रीने अचानक हे सगळं करणं म्हणजे काम मिळवण्यासाठीचा स्टंट तर नाही ना असे अनेकांना वाटले. त्यामुळे बॉलीवूडमध्येच दोन गट पडताना दिसले. या प्रकरणात आतापर्यंत साजिद खान, आलोकना, चेतन भगत, प्रकाश झा यांची नावे देखील पुढे आली होती.
आता काय करणार तनुश्री
दहावर्षांपूर्वीचे झालेले प्रकरण समोर आणल्यानंतर तनुश्रीने अनेक महिलांना बळ दिले. ज्यामुळे त्यांच्यासोबत झालेल्या अन्यायाला त्यांनी वाचा फोडली. पण तनुश्री प्रकरणात तिला साक्षीदारांची कोणतीच मदत झाली नाही. पण तिच्यामुळे अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत झालेला अन्याय सोशल मीडियावरुन सांगितला. त्यामुळे जवळजवळ वर्षभर #MeTooच वादळ देशात घोंगावत होतं.
हेही वाचा
सनी लिओनसोबत चित्रपटात दिसणार साऊथ कॉमेडी स्टार ब्रम्हानंद
आगामी चित्रपटासाठी दीपिकाला मिळाले इतके मानधन की, आकडा वाचून व्हाल थक्क
सारा अली खानचा हा लुक सध्या होत आहे व्हायरल