Advertisement

मनोरंजन

‘कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर

Dipali NaphadeDipali Naphade  |  Jul 14, 2021
'कोण होणार करोडपती'मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर

‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम हिंदीमध्ये जितका प्रसिद्ध आहे तितकाच मराठीतही प्रसिद्ध आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला नुकताच हा कार्यक्रम आला आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ‘कोण होणार करोडपती’ला चांगला प्रतिसाद मिळाला असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत आहेत. हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत. ‘कोण होणार करोडपती’मध्ये आठवड्यातून एक दिवस ‘कर्मवीर विशेष’ भाग असतो. पहिल्याच आठवड्यात शनिवारी, 17 जुलैच्या  भागात पद्मश्री अभिनेते ‘नाना पाटेकर’ कर्मवीर म्हणून येणार आहेत.

आथिया शेट्टी आणि केएल राहुल घालवत आहेत इंग्लंडमध्ये एकत्र वेळ

आठवणींना उजाळा

आठवणींना उजाळा

नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला. कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत. फार कमी लोकांना माहीत असेल, पण नाना पाटेकर यांनी सैनिकी शिक्षण घेतले असून त्यांनी कारगिल युद्धात भागदेखील घेतला होता.  त्यांनी आपले कारगिल युद्धातील काही अनुभवही सांगितले. नानांच्या वडिलांबद्दल नाना कधी फार व्यक्त होत नाहीत, पण खेडेकरांनी त्या मुद्द्याला हात घालून नानांना बोलते केले. आपल्या वडिलांबद्दल बोलताना नाना भावूक झाले. अनेक किस्से, कविता, बालपणीच्या आठवणी, शेतावरच्या गप्पा असे नानांचे अनेक पैलू या मंचावर उलगडले. कर्मवीरच्या भागामध्ये स्पर्धक येऊन सामाजातील गरजू घटकांसाठी खेळतात व जिंकलेली रक्कम त्यांना मदत म्हणून देऊ करतात. आता नाना नेमकं कोणासाठी खेळणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे. नुकत्याच आलेल्या प्रोमो मध्ये नाना सचिन खेडेकरांना आपली पण त्यांच्यासारखा सूट घालायची इच्छा बोलून दाखवताना दिसले. पहिल्या  कर्मवीर भागात नाना पाटेकर आले आहेत तर या पर्वात पुढे आणखी कोणते कर्मवीर पाहायला मिळतील याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. 

हेमांगी कवीच्या त्या बिनधास्त वक्तव्याला अनेकांनी दिला पाठींबा

घरबसल्या लखपती होण्याची संधी

घरबसल्या लखपती होण्याची संधी

घरबसल्या लखपती होण्याची संधी सोनी मराठी वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. कोण होणार करोडपती’ टीव्हीवर पाहता-पाहता प्रेक्षक खेळू शकतात ‘कोण होणार करोडपती प्ले अलॉंग’! आणि जिंकू शकतात एक लाख रुपये आणि हॉटसीटवर येण्याची संधीदेखील प्रेक्षकांना मिळू शकते. हा शो गेले अनेक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासह प्रेक्षकांच्या संसारालादेखील हातभार लावण्याचे काम करत आहे. तुम्हालाही जिंकण्याची संधी आहे. सामान्य जनतेसाठीच हा शो असल्यामुळे प्रेक्षक म्हणून तुम्ही यामध्ये सहभागी होऊन आपलं नशीब नक्कीच आजमावून पाहू शकता. नुकताच हा शो मराठीमध्ये सुरू झाला असून हे या शो चे तिसरे पर्व आहे. हिंदीमधील शो चे सूत्रसंचालन गेले कित्येक वर्ष अभिताभ बच्चन करत आहेत तर मराठीसाठी ही धुरा सचिन खेडेकरने सांभाळली आहे. आपल्या सूत्रसंचालनाने अनेकांना सचिन खेडेकर यातून बोलते करत असल्याचेही दिसून येते. त्यामुळेच मराठीतील हा शोदेखील प्रेक्षकांना भावतोय असे दिसून आले आहे. 

हंगामा 2′ प्रदर्शित होण्याआधीच शिल्पा शेट्टीचा खुलासा, चित्रपट होणार सुपरहिट

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक