Advertisement

Weight Loss

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा

Dipali NaphadeDipali Naphade  |  Apr 20, 2021
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतो दालचिनीचा चहा

Advertisement

कोरोना व्हायरस (Coronavirus) ज्या गतीने सध्या वाढत आहे ते पाहता आपल्याला आपली प्रतिकारशक्ती (Strong immunity) सर्वात जास्त मजबूत करण्याची जास्त आवश्यकता आहे. जर प्रतिकारशक्ती चांगली असेल तर तुम्ही कोणत्याही व्हायरसच्या संक्रमणापासून स्वतःला वाचवू शकता. कोणत्याही कारणाने इन्फेक्शन झालेच तर चांगल्या प्रतिकारशक्तीमुळे व्हायरसशी दोन हात करण्याची शक्ती मिळते. यामुळे आजारातून लवकर बरं होण्यासाठी मदत मिळते. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक (natural and ayurvedic) पदार्थांचा रोज आपल्या आयुष्यात समावेश करून घ्यायला हवा. त्यापैकीच एक आहे दालचिनीचा चहा. 

इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते दालचिनीचा चहा

इन्फेक्शनशी लढण्यास मदत करते दालचिनीचा चहा

freepik

आपल्या शरीराची रोजप्रतिकारकशक्ती मजबूत बनविण्यासाठी दालचिनीचा चहा (cinnamon tea) अत्यंत उपयुक्त ठरतो. दालचिनीमध्ये असणाऱ्या अँटिमायक्रोबायल, अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल घटकांमुळेच शरीरात कोणताही जंतू शिरण्यास आधीच प्रतिकार केला जातो. तसंच दालचिनीमध्ये अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही अधिक असते. व्हायरस आणि इन्फेक्शनशी लढण्यासाठी (fight virus and infections) याची मदत होते. म्हणूनच तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर दालचिनीच्या चहाचा नियमित तुमच्या आयुष्यात समावेश करून घ्या. दालचिनीमध्ये असणारे घटक हे शरीरासाठी पोषक ठरतात. त्यामुळे तुम्ही नियमित दालचिनीचा चहा दिवसातून एकदा तरी प्यायला हवा. 

प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा रेसिपी (Immunity Boosting Kadha Recipe In Marathi)

असा बनवा दालचिनीचा चहा

प्रतिकारशक्ती वाढविणारा हा दालचिनीचा चहा बनविणे काही कठीण नाही. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हा चहा घरच्या घरी बनवून सकाळच्या वेळी अथवा दिवसातून एकदा पिऊ शकता. जाणून घेऊया कसा बनवायचा हा दालचिनीचा चहा. 

  • दालचिनीचा चहा बनविण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही पाण्यामध्ये दालचिनी नीट उकळून घ्या 
  • दालचिनी नीट उकळल्यावर एका कपमध्ये हे पाणी गाळून घ्या. तुमचा चहा तयार आहे
  • तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही आल्याचा एक लहानसा तुकडा किसून घाला
  • चहा गाळून घेतल्यावर त्यात अर्धा चमचा मध अथवा एक चमचा लिंबाचा रस घालून हा चहा प्या
  • या चहाची चवही चांगली लागते. त्यामुळे तुम्हाला पितानाही चविष्ट चहा प्यायल्याचे समाधान मिळते

चहा, कॉफी ऐवजी सुरु करा या पेयांचे सेवन आणि मिळवा फायदेच फायदे

 

दालचिनीच्या चहाचे अनेक फायदे (Benefits of Cinnamon Tea)

दालचिनीच्या चहाचे अनेक फायदे (Benefits of Cinnamon Tea)

Freepik

दालचिनीच्या चहाचे प्रतिकारशक्ती वाढविण्यासह अनेक फायदे आहेत. यामुळे शरीर निरोगी राखण्यास मदत मिळते. नक्की काय फायदे आहेत ते जाणून घेऊया. 

  • दालचिनी नैसर्गिक पद्धतीने वजन घटविण्यासाठी (weight loss) मदत करते. कारण ही शरीरातील मेटाबॉलिजम लवकर कमी करून शरीरात जमा झालेली चरबी लवकरात लवकर जाळण्याचे काम करते. त्यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत मिळते
  • दालचिनीमध्ये पॉलिफेनॉल्स अँटिऑक्सिडंट्स असतात जे रक्तदाबावर नियंत्रण (Blood pressure control) मिळवून हृदयाशी संबंधित आजारापासूनही रक्षण करण्यास मदत करते
  • दालचिनी शरीरामधील इन्शुलिनची संवेदनशीलता वाढविते. ज्यामुळे साखरेची पातळी कमी करण्यास मदत मिळते. मधुमेही व्यक्तींसाठीही दालचिनीचा चहा उत्तम ठरतो
  • मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास आणि क्रॅम्प्स (periods pain and cramps) या समस्येपासूनही दालचिनीचा चहा मदत मिळवून देतो.

(टीप – आम्ही सांगितलेले उपाय हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावे. याची जबाबदारी आमच्यावर नाही)

दालचिनी खाण्याचे फायदे जाणून घ्या (Dalchini Benefits In Marathi)

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक