ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
त्वचेचा हा प्रकार असणाऱ्यांनी टाळा हे नैसर्गिक घटक

त्वचेचा हा प्रकार असणाऱ्यांनी टाळा हे नैसर्गिक घटक

प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळ्या प्रकारची असते. त्वचेचे वेगवेगळे प्रकार पाहता काहींना त्वचेवर काही खास गोष्टी अजिबात चालत नाही. विशेषत: असे काही नैसर्गिक घटक असतात जे काहींच्या त्वचेवर मुळीच चालत नाही. सौंदर्यवर्धक असे जरी हे घटक असले तरी देखील काही जणांना याच्या वापरामुळे अधिक त्रास होऊ लागतो. एखादी होमकेअर रेमिडी सांगितली असेल आणि तुम्ही ती केली असेल पण त्याचे चांगले फायदे होण्याऐवजी तुम्हाला त्याचे विपरित परिणाम होऊ लागले असतील तर तुम्ही देखील हे काही घटक वापरायचे सोडून द्यायला हवेत. जाणून घेऊया असे काही नैसर्गिक घटक आणि त्याचे होणारे नेमके परिणाम

तांदूळापासून बनवा हे सोपे फेस केअर किट

हळद
हळद ही अँटीसेप्टीक म्हणून वापरली जाते. कोणतीही जखम झाली असेल तर ती हळदीच्या प्रयोगाने बरी होण्यास मदत मिळते. पण हळदीचे हेच गुणधर्म काहींच्या त्वचेसाठी अजिबात चांगले नाही. कारण काहींना हळदीचा लेप किंवा हळद भिजवून लावल्याने जास्ती फोड्या येऊ लागतात. जर तुमची त्वचा खूप कोरडी आणि अत्यंत संवेदनशील अशा प्रकारातील असेल तर तुम्ही हळदीचा वापर करणे टाळा. कारण हळदीमुळे तुम्हाला त्रास होण्याची शक्यता ही जास्त आहे.  अशा त्वचेने चेहऱ्यावर अॅक्टिव्ह पिंपल्स असतील तर त्याचा अजिबात वापर करु नये. कारण त्यामुळे त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.


मुलतानी माती  

ADVERTISEMENT

मुलतानी मातीचा उपयोग हा बऱ्याच सौंदर्यप्रसाधनांमध्ये केला जातो. त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यासाठी मुलतानी माती ही फारच फायदेशीर ठरते. पण ज्यांची त्वचा ही खूप जास्त कोरडी असेल अशांनी मुलतानी मातीचा वापर हा टाळणेच योग्य. कारण मुलतानी मातीचा अति वापर केल्यामुळे त्वचा कोरडी पडते. त्वचेवरील सगळे मॉईश्चर निघून जाते. अशा त्वचेला भेगा पडू लागतात. जर अशी त्वचा अॅक्ने प्रोन असेल तर ती अधिक त्रास देऊ लागते.

चेहऱ्याला द्या क्विक मसाज आणि मिळवा अफलातून फायदा

हळद

Instagram

ADVERTISEMENT

बदामाचे तेल
बदामाचे तेल हे त्वचा नरिश कऱण्यासाठी फारच फायद्याचे असते. खूप जण दररोज बदामाच्या तेलाचा उपयोग करुन त्वचा चांगली ठेवतात. काही जणांना बदामाच्या तेलाच्या उपयोगाने त्वचा चांगली ठेवण्यास मदत मिळते. त्वचेवरील पिंपल्स आणि त्याचे डागही अनेकदा या तेलाच्या वापरामुळे कमी होतात. पण जर तुमची त्वचा तेलकट प्रकारातील असेल तर तुम्ही तेलाचा उपयोग त्वचेसाठी मुळीच करु नका.  कारण त्यामुळे तुम्हाला पुरळ, पुटकुळ्या येण्याची शक्यता ही थोडी जास्त असते.


दालचिनी पावडर
गरम मसाल्यातील हा प्रकार खूप जण त्वचेसाठी वापरतात. पण त्वचेसाठी त्याचा वापर काहीजणांसाठी त्रासदायक ठरु शकते.  दालचिनी ही खूपच उष्ण असते. ज्यांची त्वचा नाजूक प्रकारातील आहे त्यांनी अजिबात दालचिनीचा उपयोग करु नका. कारण दालचिनीमुळे त्वचेचा दाह होऊ शकतो. त्यामुळे नाजूक त्वचा असणाऱ्यांनी दालचिनीचा अजिबात वापर करु नका. 


दही
दही हे खूप जण फेसपॅकमध्ये वापरतात. पण दह्यामध्ये खूप तेलकट पदार्थ असतात. त्यामुळे त्याचा वापर करताना थोडेसे जपून. कारण जर त्वचा तेलकट असेल तर तुम्हाला दह्याच्या वापरामुळे पिंपल्स येण्याची दाट शक्यता आहे. दही हे त्वचा तेलकट किंवा मिश्र प्रकारातील असणाऱ्यांनी मुळीच वापरु नये. 


आता तुम्ही हे काही घटक वापरुन सुंदर त्वचा मिळवण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आताच त्याचा वापर करणे टाळा 

ADVERTISEMENT

हेअर प्रॉडक्ट वापरताना मुळीच चुकवू नका हा क्रम

13 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT