ADVERTISEMENT
home / Diet
Navratri 2021 How To Identify Real And Fake Sabudana in Marathi

भेसळयुक्त साबुदाणा ओळण्यासाठी सोप्या टिप्स, नवरात्रीच्या उपवासासाठी आहे उपयुक्त

नवरात्रोत्सव सुरू झाल्यामुळे घरोघरी उपवासाचे पदार्थ बनू लागले आहेत. उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचे प्रकार आवर्जून केले जातात. उपवास नसला तरी नाश्ता करण्यासाठी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा खूप लोकप्रिय असतात. साबुदाणा हा एक प्रक्रिया केलेला पदार्थ असून तो टौपिओका या कंदमुळापासून तयार केला जातो. मात्र व्रतवैकल्यांमध्ये बाजारात साबुदाण्याची मागणी वाढू लागताच त्याची भेसळ केल्याचे प्रमाण वाढू लागते. या दिवसांसाठी बाजारात खास पॉलिश केलेले आणि अगदी मोत्याप्रमाणे चमकणारे नकली साबुदाणे विकले जातात. यासाठीच प्रिजजनांना नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासोबत त्यांना साबुदाणा ओळखण्यासाठी या टिप्स जरूर द्या. कारण या साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर केमिकल्स वापरण्यात येते जे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. यासोबतच जाणून घ्या काय आहेत नवरात्रीचे नऊ रंग, नवरात्रीच्या 9 रंगाचे महत्त्व (Importance Of Navratri Colors) आणि नवरात्र उत्सव मराठी माहिती | Navratri Information In Marathi | Navratri Mahiti

How To Identify Real And Fake Sabudana in Marathi

कसा असतो नकली साबुदाणा

सणासुदीला आणि व्रतवैकल्याचा सीझन सुरू झाला की  बाजारात नकली साबुदाणा विकण्याचे प्रमाण हळू हळू वाढू लागते. तुमच्या नजरेला हा साबुदाणा नेहमीच्या साबुदाण्याप्रमाणेच दिसतो त्यामुळे तुमची सहज फसगत होऊ शकते. मात्र या साबुदाण्यामध्ये शुभ्रपणा आणि चमक येण्यासाठी विविध प्रकारच्या हानिकारक केमिकल्सचा वापर केलेला असतो. केमिकलयुक्त साबुदाणा न ओळखता खाल्ल्यास विविध आरोग्य समस्यांना तुम्हाला तोंड द्यावे लागू शकते. असा साबुदाणा खाण्यामुळे तुम्हाला जुलाब, मुळव्याध, पोटाचे आजार होण्याचा धओका असतो. यासाठीच तुम्हाला भेसळयुक्त साबुदाणा कसा ओळखावा हे माहीत असणं गरजेचं आहे.

कशी ओळखाल साबुदाण्याची भेसळ

साबुदाण्याची ओळख पटण्यासाठी तुम्हाला काही सोप्या टिप्स माहीत असायला हव्या. 

  • साबुदाणा काही मिनीटे पाण्यात भिजत ठेवा जर तो वेळेत फुगला तर तो शुद्ध आहे हे ओळखा पण जर तो लवकर फुगला नाही तर तो केमिकलयुक्त असण्याची शक्यता दाट आहे. 
  • साबुदाणा गॅसवर जाळून तुम्ही याची पारख करू शकता. जर साबुदाणा सहज जळला तर तो नक्कीच केमिकलयुक्त आहे हे ओळखा कारण खरा साबुदाणा कधीच जळून राख होणार नाही. साबुदाणा जाळल्यावर त्यातून धुर आणि सुंगध येईल.
  • साबुदाणा ओळखण्याची आणखी एक सोपी युक्ती म्हणजे एक दुसरा दाणा तोंडात टाका आणि थोडावेळ चावा. कच्चा साबुदाणा खाताना लाळेमुळे त्यातून स्टार्च निघून तुमच्या तोंडातील साबुदाणा चिकट होतो. पण जर तो केमिकलयुक्त असेल तर तो सहज तुटेल आणि त्याची पावडर होईल. 

या काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही साबुदाण्याची  भेसळ ओळखू शकता. कारण नवरात्रीचे उपवास करताना निरोगी राहण्यासाठी आहारात पोषक आणि शुद्ध उपवासाचे पदार्थ असायला हवेत.  

ADVERTISEMENT
07 Oct 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT