ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
साऊथ अभिनेत्री नयनताराचा बॉलीवूड डेब्यू, शाहरूखसोबत झळकणार

साऊथ अभिनेत्री नयनताराचा बॉलीवूड डेब्यू, शाहरूखसोबत झळकणार

शाहरूख खानचे चाहते शाहरूखच्या आगामी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. 2018 साली ‘झिरो’ चित्रपटाच्या अपयशानंतर शाहरूखने बॉलीवूडकडे जवळजवळ पाठच फिरवली होती. गेली चार वर्षे त्याने कोणत्याही चित्रपटात काम केलं नाही. या वर्षी जूनमध्ये शाहरूख खानने चित्रपटसृष्टीत 29 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यामुळे शाहरूखच्या  चाहत्यांना त्याचा आगामी चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. शाहरूखने हिरोचे अपयश खूपच मनाला लावून घेतलं होतं. त्यामुळे तो आताा बॉलीवूडला राम राम ठोकेल असं सर्वांना वाटू लागलं होतं. मात्र बॉलीवूडच्या किंग खानने मागच्या वर्षी लॉकडाऊन संपताच कमबॅक करणार असल्याची आशा निर्माण केली. लवकरच पठाण चित्रपटातून शाहरूख खान लवकरच प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु आहे. मात्र शाहरूख एक चित्रपट करून थांबणारा अभिनेता नाही. दमदार कमबॅकसाठी त्याने चांगलीच कंबर कसली आहे. कारण लवकरच तो आणखी एका चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे. साऊथचा फिल्ममेकर एटली कुमारच्या आगामी चित्रपटासाठी शाहरूखने होकार दिला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री नयनतारा झळकणार आहे.

शाहरूखसोबत नयनताराचा बॉलीवूड डेब्यू

एटली कुमार हा तमिळ चित्रपटांचा निर्माता आहे. तो पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाची निर्मिती करत आहे. एटलीच्या या चित्रपटाचे नाव सनकी असण्याची चर्चा आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र हा चित्रपट तमिळ चित्रपटाचा रिमेक नसून एक ओरिजनल हिंदी चित्रपट असणार आहे. या चित्रपटात शाहरूखची मुख्य भूमिका असून त्यात त्याची दुहेरी भूमिका असण्याची शक्यता आहे. शिवाय त्याच्यासोबत साऊथ अभिनेत्री नयनताराची मुख्य भूमिका असणार आहे. या चित्रपटात नयनताराची नेमकी काय भूमिका असेल ही गोष्ट अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरूख खान, नयनतारा यांच्यासोबत गेल्या काही दिवसांपासून एटली कुमारची चर्चा सुरू आहे. शाहरूख खाने या चित्रपटासाठी होकार दिल्यामुळे चित्रपटाची तयारी जोरदार सुरू झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती पॅन इंडिया करण्याच्या तयारीत आहे. चित्रपटाच्या प्री प्रॉडक्शनचं काम जवळजवळ होत आलं आहे. लोकेशन, लुक टेस्ट, कास्टिंगचे काम झालेले आहे त्यामुळे आता चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरूवात केली जाणार आहे. शिवाय चित्रपट अनेक भाषांमध्ये केला जाणार अशीदेखील चर्चा आहे. शाहरूख खान पठाण चित्रपटाचे शूटिंग संपल्यावर या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्याची शक्यता आहे. सिद्धार्थ आनंदच्या  पठाणमध्ये शाहरूखसोबत जॉन अब्राहिमदेखील असण्याची शक्यता आहे. याशिवाय सध्या शाहरूख खानकडे राजकुमार हिरानंदानीच्या एका चित्रपटाची ऑफर आहे.

एटलीसोबत नयनताराचा तिसरा चित्रपट

एटलीसोबत शाहरूख खानचा हा पहिलाच चित्रपट  आहे. मात्र नयनतारासोबत एटलीने यापूर्वी तीन चित्रपट केलेले आहेत. नयनताराला याआधी तमिळ कॉमेडी चित्रपट मुक्कुटी अमनमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं होतं. ज्यामध्ये तिने देवीची भूमिका साकारली होती. यासोबतच तिच्याकडे आगामी चित्रपट आहे जो एक तमिळ थ्रीलर चित्रपट असेल. या चित्रपटाचे नाव नेत्रीकन असून तो एका कोरिअन थ्रिलर ब्लाईंट चित्रपटाचा रिमेक असेल. त्यामुळे प्रेक्षक शाहरूख खान आणि नयनताराची फ्रेश जोडी पाहण्यासाठी नक्कीच  उत्सुक आहेत. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

ADVERTISEMENT

अधिक वाचा –

पुन्हा सुरू होणार ‘दी कपिल शर्मा शो’ या कलाकाराची होणार नव्याने एन्ट्री

म्हणून करिश्मा कपूरने दिला होता ‘दिल तो पागल है’ चित्रपटाला होकार

अटकेत असलेल्या राज कुंद्रावर सेलिब्रिटींच्या उमटत आहेत प्रतिक्रिया

ADVERTISEMENT
21 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT