बॉलिवूडमध्ये सध्या चित्रपट सोडून अन्य गोष्टींवरुन गदारोळ माजला आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर त्याच्याशी असलेला ड्रग्जचा संबंध त्यामध्ये अडकलेली रिया आणि रियाने अन्य बॉलिवूड कलाकारांची घेतलेली नाव. यामुळे अनेक सेलिब्रिटी आता गोत्यात येण्याची शक्यता आहे. अनेक कलाकारांची नाव यामध्ये जोडली गेली असून त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये एक वेगळीच खबराट भीती दिवसेंदिवस पसरु लागली आहे. रिया चक्रवर्ती आणि तिच्या भाऊ ड्रग्ज प्रकरणात तुरुंगात आहेत. पण तिने चौकशी दरम्यान आणखी काही बॉलिवूडमधील सेलिब्रिटींची नावं घेतली अशी बातमी वाऱ्यासारखी पसरली. पण आता नार्कोटिक विभागाकडून त्याचा खुलासा करण्यात आला आहे. या मध्ये सातत्याने येणारे सारा अली खान आणि इतर अभिनेत्रींची नाव यामागील खरे काय? ते आता आपण जाणून घेऊया.
पूनम पांडे अडकली विवाहबंधनात,गुपचूप केले लग्न
25 अभिनेत्रींच्या नावांचा समावेश
रिया चक्रवर्तीला बॉलिवूडमधील ड्रग्जसंदर्भात विचारणा करण्यात आल्यानंतर तिने काही प्रसिद्ध अभिनेत्रींची नाव घेतली. ज्या ड्रग्ज घेतात आणि त्यांचे ड्रग्ज पॅडलर्सशी संबंध आहेत. यामध्ये सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, सिमोन खंबाटा, रोहिणी अय्यर, मुकेश छाबडा अशा काही सुप्रसिद्ध नावांचा समावेश आहे. ही मोठी नाव तिने घेतल्यानंतर संपूर्ण दिवसभर सारा अली खानवर संशयाची सुरी फिरत होती. अनेकांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाशी तिचा संबंध लावल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या फिरत होत्या. पण आता या बातमीने युटर्न घेतल्यासारखी गोष्ट घडली आहे. NCB कडून एक नवा खुलासा या संदर्भात करण्यात आला आहे. त्यामुळे सेलिब्रिटींना दिलासा मिळाला आहे.
रियाने दिली नाही माहिती
NCB कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार रियाने कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं आतापर्यंत घेतलेली नाही. तिचा भााऊ शौविक आणि तिला ड्रग्ज विकणारे आणि ड्रग्ज पेडलर यांची चौकशी करण्यात आली असून तिने दिलेल्या माहितीमध्ये ड्रग्ज पेडलर यांचा समावेश आहे. त्यामुळे याचा बॉलिवूडशी कोणत्याही प्रकाराचा संबंध नाही असे NCB कडून स्पष्ट करण्यात आले आहे. ड्रग्ज प्रकरणाशी निगडीत अनेकांना आतापर्यंत यामध्ये अटक करण्यात आली. रिया तिचा भाऊ शौविक यासोबतच अन्य काही जणही सध्या तुरुंगात आहेत.
करिश्मा कपूरचा कमबॅक, अभिनेत्री नाही दिसणार निर्मातीच्या भूमिकेत
कंगनाचीही होणार का चौकशी?
एकीकडे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आणि त्यामधील ड्रग्ज अँगलची चौकशी केली जात असताना कंगना रणौतचा मुंबई महापालिकेशी सुरु असलेला पंगाही अनेकांसाठी खास आहे. शिवसेनेचे संजय राऊत यांनी कंगनासाठी वापरलेला ‘हरामखोर मुलगी’ हा शब्द आणि तिच्या कार्यालयावर केलेली कारवाई या सगळ्यामुळे सर्किट कंगना अशी ओळख असलेल्या कंगनालाही अनेकांचा पाठिंबा मिळू लागला आहे. शिवसेना- संजय राऊत- कंगना असा वॉर सुरु असताना आता महापालिकेकडून कंगनाला आणखी एक नोटीस पाठवण्यात आली आहे. 2018 साली कंगनाने तिच्या खार येथील फ्लॅटमध्ये केलेल्या बदलाला अवैध ठरवून तिच्यावर ही कारवाई करण्यासाठीची ही नोटीस असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.
NCB च्या खुलास्यानंतर आता काही सेलिब्रिटींना दिलासा मिळाला असला तरी या प्रकरणात आणखी किती जणांना अटक होणार आणि त्यातून सुशांत आत्महत्या प्रकरणाचे सत्य उलगडणार का? हा प्रश्न कायम आहे.