अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) च्या आत्महत्येला जूनमध्ये एक वर्ष पूर्ण होणार आहे. मध्यंतरी सुशांतच्या मृत्यूबाबत तपासणी अत्यंत कमी झाल्याचं जाणवलं होतं. पण आता पुन्हा सुशांत सिंग राजपूतच्या केसला वेग आल्याचे दिसून येत आहे. एनसीबी पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाल्याचे दिसून येत आहे. नुकतंच अभिनेत्याचा फ्लॅटमेट असणारा सिद्धार्थ पिठानी (Siddharth Pithani) याला एनसीबीने हैदराबाद येथून अटक केली आहे. तर सुशांतच्या घरी काम करणाऱ्या कुक आणि हाऊस हेल्परलादेखील समन्स पाठवून बोलावून घेण्यात आलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा या केसबाबत सुशांतच्या चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली असून सुशांतला न्याय मिळेल असा विश्वास जागृत झाला आहे.
‘ही’ मराठी मालिका आहे टीआरपीच्या रेसमध्ये सर्वात पुढे, स्टार प्रवाहची घोडदौड
सुशांतच्या कुकला पुन्हा एकदा बोलावले
अभिनेता सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे गूढ अजूनही उकलले नाही. मात्र त्याचा कुक नीरज याने अभिनेता सुशांत नशील्या पदार्थांचे सेवन करत असल्याचा खुलासा केला होता. त्यामुळे एनसीबीने नीरज आणि केशव या दोघांनाही पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजत आहे. गेल्या आठ महिन्यापासून नीरज आणि केशव हे दोघेही या प्रकरणापासून वाचण्यासाठी मुंबईच्या बाहेर असल्याचे आता समोर आले आहे. पण पुन्हा एकदा मुंबईत येऊन वेगवेगळ्या सेलिब्रिटींकडे काम करणे त्यांनी सुरू केले होते असंही सांगण्यात येत आहे. पण आता पुन्हा एकदा चौकशीचा फेरा या दोघांभोवती आवळला जाणार आहे.
रणबीर आणि आलियाच्या ‘ब्रम्हास्त्र ‘चा आता निर्माता झाला अयान मुखर्जी
सिद्धार्थ पिठानीला हैदराबादवरून अटक
सिद्धार्थ पिठानी हा सुशांतबरोबर त्याच्या घरात राहात होता. पण आता एनसीबीच्या टीमने त्याला हैदराबादवरून काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्यानंतर त्याला चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले आहे. 1 जूनपर्यंत सिद्धार्थ पिठानीला तुरूंगात ठेवण्यात आले आहे. तर आता नीरज आणि केशव यांच्या नव्या चौकशीतून पुन्हा काही नवा खुलासा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मागच्या वर्षी 14 जूनला सुशांत सिंह राजपूत याने आपल्या मुंबईमधील घरात आत्महत्या केली होती. सुशांतच्या निधनानंतर सर्वात पहिले सिद्धार्थनेच त्याला पाहिलं होतं आणि त्याचे शवदेखील त्यानेच खाली उतरवले होते असं सांगण्यात येते. सुशांतच्या मृत्यूनंतर ही केस अधिकाधिक गुंतत गेली. यामध्ये ड्रग्ज केसदेखील सुरू झाली आणि अनेक सेलिब्रिटीचे नावही यामध्ये आले. यासंदर्भात तपासणी चालूच आहे. यासंदर्भात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांनाही अटक होऊन त्यांना तुरूंगवास झाला होता. मात्र अजूनही याबाबत कोणतीच स्पष्टता होऊ शकलेली नाही. आता पुन्हा एकदा या केसचे काम वेगाने सुरू झाले असून पुढे नक्की काय काय खुलासे होणार आहेत याकडे सर्वांचेच लक्ष आहे. दरम्यान सुशांतच्या मृत्यूचे गूढ लवकरात लवकर उकलावे असंच सर्वांना वाटत आहे.सुशांत एक अत्यंत गुणी अभिनेता होता असंच सर्वांना वाटत आहे. पण त्याच्याबरोबर असं नक्की काय घडलं की, त्याला इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलं हा प्रश्न आज एक वर्षानंतरही अनेकांच्या मनात तसाच आहे आणि या प्रश्नाचं उत्तर मिळावं असंही सर्वांना वाटत आहे.
राहुल वैद्यच्या ‘अली’ गाण्याने केले सगळ्यांना मंत्रमुग्ध, फॅन्सही झाले आनंदी
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक