नैसर्गिक घटकांचा उपयोग करुन त्वचेवर सकारात्मक बदल घडवता येतात. त्वचेवर असलेल्या समस्यांपैकी पुरळ-पुटकुळ्या या अगदी कोणालाही नकोशा असतात. अशा पुळ्यांपासून सुटका मिळवायची असेल तर त्यावर रामबाण उपाय म्हणजे कडुनिंब. कडुनिंबाची पाने ही अगदी सहज आणि कुठेही उपलब्ध होतील अशी असतात. कडुनिंबाचा उपयोग करुन अनेक सौंदर्यप्रसाधने बनवली जातात. पण जर तुम्हाला केमिकल्सयुक्त सौंदर्यप्रसाधने वापरायची नसतील तर तुम्ही थेटड कडुनिंबाचा पाला किंवा पावडर वापरुन चेहऱ्याची काळजी घेऊ शकता. कडुनिंबाचा नेमका वापर कसा करावा ते जाणून घेऊया.
उन्हाळ्यात या कारणांमुळे येतात पिंपल्स, करा सोपे उपाय
कडुनिंबाचे फायदे
कडुनिंबाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.. यामध्ये असलेले गेडुनिन नावाचे घटक आढळतात. जे मलेरियाच्या उपचारासाठी फारच फायदेशीर असते. कर्करोगासाठीही कडुनिंब हे फारच फायद्याचे असते. त्याचप्रमाणे कडुनिंब चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डागही निघून जाण्यास मदत मिळते. कडुनिंबाच्या वापरामुळे पुळ्या आणि पुटकुळ्या या नैसर्गिक पद्धतीने काम करतात. शरीर शुद्धीकरण करण्याचे कामही कडुनिंब करते. त्यामुळेही चेहऱ्यावरील पुळ्या आणि इतर त्रास कमी होण्यास मदत मिळते. त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही कडुनिंबा फारच फायद्याचे आहे. केसांच्या वाढीसाठीही कडुनिंब हे फारच चांगले असते. त्यामुळे केसांच्या वाढीला जोम येतो.
गुढीपाडव्यासाठी असा करा परफेक्ट महाराष्ट्रीयन लुक
कडुनिंबाचा असा करा वापर
कडुनिंबाचा त्वचेसाठी वापर करायचा असेल तर तुम्ही त्याचा असा वापर करा.
- कडुनिंबाची ताजी पाने घेऊन त्याची पेस्ट करुन घ्या. जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर या पेस्टमध्ये दही घाला. जर तुमचा चेहरा तेलकट असेल तर तुम्ही त्यामध्ये लिंबाचा रस घाला हा तयार पॅक तुम्ही संपूर्ण चेहऱ्याला लावा. जर तुम्हाला पिंपल्सवर लावायचे असतील तर तुम्ही पिंपल्सवर लावा. 10 मिनिटांसाठी ठेवून द्या. चेहरा धुवून घ्या.
- कडुनिंबाची पानं घरी सुकवून तुम्ही घरी त्याची पावडर करु शकता. ही पावडर दूधात किंवा पाण्यात भिजवून तयार पॅक चेहऱ्याला आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा लावा. चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तुम्हाला तुमचा चेहरा अधिक चांगला दिसेल.
- कडुनिंबापासून काढलेले तेल हे देखील फारच फायद्याचे असते. जर तुमच्या त्वचेवर पिंपल्सचे डाग राहिले असतील तर अशावेळी कडुनिंबाचे तेल तुम्ही डागांवर लावू शकता. त्यामुळे त्वचा स्वच्छ होऊन डाग कमी होण्यास मदत मिळते.
- कडुनिंबाचा रसही फारच फायदेशीर असतो. जर तुम्हाला त्वचेसाठी टोनर तयार करायचे असतील तर तुम्ही पान वाटून त्याचा रस काढून घ्या. एका स्प्रे बॉटलमध्ये तो रस काढून घ्या. चेहऱ्यावर हे टोनर लावल्यामुळे चेहरा अधिक चांगला दिसू लागतो.
- कडुनिंबाचे तेल हे केसांमध्ये असलेल्या पुळ्या कमी करते. त्यामुळे कडुनिंबाचे तेल तुम्ही लावा. त्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते.
आता कडुनिंबाचा वापर अशापद्धतीने करा आणि मिळवा सुंदर त्वचा
Ice Roller चा वापर कसा करावा, काय आहेत फायदे