सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेद्वारे महाराष्ट्राचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा प्रेक्षांसमोर येतो आहे. स्वराज्याचा राजा घडवण्यासाठी जिजाऊ शिवबांना न्यायाचे, शास्त्राचे आणि धर्माचे धडे देताहेत. आपल्या सवंगड्यांबरोबर स्वराज्याची शपथ घेऊन शिवबांनी तोरणा गड स्वराज्यात आणला आहे आणि स्वराज्याचा पाया रचायला सुरुवात केली आहे. ही मालिका लवकरच लीप घेणार असून जिजामातांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी दिसणार आहेत. नीना कुळकर्णींसारखी दिग्गज अभिनेत्री जिजाऊंची भूमिका साकारायला सज्ज झाली आहे. स्वराज्याचा राजा, रयतेचा जाणता राजा घडवणाऱ्या मातेची कथा या मालिकेत दिसते आहे. या मालिकेत स्वराज्याचा देदीप्यमान इतिहास जिजाऊंच्या नजरेतून मांडण्यात आला आहे.
प्रियांकाचा आनंद गगनात मावेना, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मिळणार गुडन्यूज
नीना कुलकर्णी बऱ्याच वर्षानंतर मराठी मालिकेत
मराठी आणि हिंदी मालिकेत नीना कुलकर्णी हे नाव कोणाला माहीत नाही असं नाही. नीना कुलकर्णींचा अभिनय म्हणजे प्रेक्षकांसाठी नक्कीच पर्वणी आहे. नीना कुलकर्णी हिंदी मालिकांमध्ये व्यस्त असल्याने काही वर्ष मराठी मालिकेत दिसल्या नाहीत. मात्र आता पुन्हा एकदा मराठी मालिका आणि तीदेखील अशी गाजलेली मालिका नीना कुलकर्णी करत असल्याने नक्कीच त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. नीना कुलकर्णी यांचं मुळात भारदस्त व्यक्तीमत्व असल्याने जिजामाताची भूमिका त्या उत्तम वठवू शकतात यात नक्कीच कोणालाही शंका नाही. प्रेक्षकही आता हे प्रसारित होणारे भाग पाहण्यास उत्सुक आहेत. यापूर्वी ही भूमिका अमृता पवार ही अभिनेत्री साकारत होती. मात्र आता शिवबा मोठा होणार असून जिजामातांच्या भूमिकेतही नीना कुलकर्णी दिसणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे हे नक्की.
अबब! आदित्य नारायणचे घर इतके महाग, स्वतः सांगितली घराची किंमत
ऐतिहासिक मालिका प्रेक्षकांना अधिक आवडतात
वेगवेगळ्या विषयाच्या आपण नेहमीच या वाहिनीवर पाहिल्या आहेत. ऐतिहासिक मालिकांबद्दल नेहमीच महाराष्ट्रात उत्सुकता असल्याचं पाहायला मिळालं आहे. याच पठडीतली जिजाऊंचं कर्तृत्त्व सांगणारी ही मालिका आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या जगदंब क्रिएशन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. तेव्हा अमोल कोल्हे आणि ऐतिहासिक मालिका, नाटकं हे समीकरण पुन्हा एकदा स्वराज्य जननी जिजामाता च्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहता येत आहे. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही जगदंब creations ची दुसरी निर्मिती असून स्वराज्यरक्षक संभाजीनंतर पुन्हा एक वेगळं शिवधनुष्य पेलण्याचं आव्हान आहे.
Bigg Boss 14: कविता कौशिक-अभिनव शुक्ला आमनेसामने, आरोप-प्रत्योरोपाने रंगला एपिसोड
जिजाऊंचं जीवनचरित्र
या मालिकेबाबत सांगताना जगदंब क्रिएशन्सच्या डॉ अमोल कोल्हे यांनी सांगितलं होतं की, शहाजीराजांची स्वराज्यसंकल्पना ज्यांनी जपली, जोपासली आणि स्वराज्यसंस्थापक शिवरायांना घडवलं त्या जिजाऊ मासाहेबांचं जीवनचरित्र प्रेक्षकांसमोर आणणं, या मालिकेच्या माध्यमातून शक्य होत आहे. ही आनंदाची बाब आहे आणि तितकीच जबाबदारीचीही ! ही मालिका केवळ मनोरंजनासाठी नाही तर संस्कारसाठीही असेल आणि तमाम जिजाऊंच्या लेकींसाठी अभिमानाचा हुंकार असेल!, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. त्यानुसार नक्कीच मालिकेचा प्लॉट आणि कथा जपली जात आहे हे महत्वाचं. ही मालिका प्रेक्षकांना आवडत असून जिजामाता आणि शिबवाचं नातं किती सुंदर होतं याची पुन्हा एकदा प्रचितीही प्रेक्षकांना घेता येते आहे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक