अभिनेत्री नेहा धुपिया आणि मॉडेल अगंद बेदी यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे. मागच्या वर्षी 10 मेला या दोघांनी गपचूप लग्न केलं होतं. सोशल मीडियावरून त्यांनी त्यांच्या लग्नाची बातमी सर्वांना दिली होती. हे सेलिब्रेटी कपल त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस मॉरीशसमध्ये साजरा करणार आहे. आश्चर्य म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी त्यांच्यासोबत त्यांची सहा महिन्यांची मुलगी ‘मेहर’देखील असणार आहे. लग्नानंतर काही महिन्यातच नेहाने ती प्रेंग्नट आहे हे जाहीर केलं होतं. लग्नापूर्वी तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी लपवून ठेवली होती. ऑगस्टमध्ये तिने तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. प्रेग्नसीची बातमी समजली तर कदाचित तिला तिची कामे बंद करावी लागतील अशी भिती नेहाला वाटत होती.म्हणूनच तिने ही बातमी आधीच उघड केली नाही, असं एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं.
सहा महिन्याच्या मेहेरचा पहिला विमानप्रवास
१८ नोव्हेंबरला नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी एका तान्हुलीचा जन्म झाला. या दोघांना ‘मेहर’ नावाची एक गोंडस मुलगी आहे. मेहरचा हा पहिला परदेश दौरा असणार आहे. नेहाने देखील तिचा पहिला परदेश प्रवास हा मॉरीशसपासूनच सुरू केला होता. त्यामुळे तिच्या मुलीच्या या मॉरीशस दोऱ्यासाठी नेहा फारच उत्सुक आहे. नेहा आणि अंगदने मेहरचा पासपोर्ट त्यांची मुलगी एक महिन्याची असतानाच बनवून घेतला होता.
मेहरला आयर्लंडवर घेऊन जाण्याचं हे आहे ‘खास’ कारण
नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांना पाणी आणि आयर्लंडवर फिरायला जाणं फार आवडतं. म्हणूनच ते त्यांच्या मुलीला पहिल्यांदा एका बेटावर घेऊन जात आहेत. ज्यामुळे तिची पाण्याशी लवकर मैत्री होऊ शकते. हे तिघंही ही त्यांची मॉरीशस ट्रिप छान एन्जॉंय करणार आहेत. नेहाच्या मते सहा महिन्यांच्या मुलीला घेऊन विमान प्रवास करणं कठीण असलं तरी अशक्य नक्कीच नाही.
आई झाली असली तरी नेहा तिच्या कामाच्या बाबतीत आहे अगदी परफेक्ट
बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमीच सोशल मिडीयावर तिच्या स्टायलिश लुक आणि खाजगी आयुष्याबाबत चर्चेत असते. मात्र ती तिच्या कामाबाबत तितकीच परफेक्ट आहे. मुलीच्या जन्मानंतर लगेचच म्हणजे अगदी दहाच दिवसात ती पुन्हा कामावर रुजू झाली होती. या शिवाय तिच्या मुलीच्या जन्माच्या आदल्या दिवसापर्यंत ती काम करत होती. प्रेग्नंट असताना देखील नेहाने शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं होतं. गरोदर असताना देखील नेहाने ‘हॅलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल बाय नेहा’ चं शूटींग पूर्ण केलं होतं.तिचं बेबी बंप लवकर न दिसल्याने आणि तिची एनर्जी लेव्हल चांगली असल्याने ती या काळात देखील कामे पूर्ण करु शकली, असं तिचं म्हणणं होतं. यावरुन तिचं तिच्या कामावर असलेलं प्रेम दिसून येतं.
नेहा धुपियाच्या या १० फॅशन टिप्समुळे गरोदरपणातही दिसू शकता स्टायलिश
Good news: कॉमेडी क्वीन भारती सिंहच्या घरी येणार नवा पाहुणा
झाशीच्या राणीऐवजी पद्मावतीची वर्णी
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम