Advertisement

मनोरंजन

प्रेग्नन्सीनंतर नेहा धुपिया बॅक टू वर्क

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Nov 30, 2018
प्रेग्नन्सीनंतर नेहा धुपिया बॅक टू वर्क

Advertisement

बॉलीवूड अभिनेत्री नेहा धुपिया नेहमीच सोशल मिडीयावर तिच्या स्टायलिश लुक आणि खाजगी आयुष्याबाबत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच नेहाने एका गोड मुलीला जन्म दिला. जिचं नाव तिने ‘मेहेर’ ठेवलं आहे. मात्र मुलीच्या जन्मानंतर लगेचच म्हणजे अगदी दहाच दिवसात नेहा पुन्हा कामावर रुजू झाली आहे. एवढंच नाहीतर तिच्या मुलीच्या जन्माच्या आदल्या दिवसापर्यंत ती काम करत होती.

1-Neha-Dhupia-goes-back-to-work-insta-story-1 %281%29

2-Neha-Dhupia-goes-back-to-work-insta-story-2
काही वेळापूर्वीच नेहाने तिच्या इन्टाग्राम अकाउंटवरुन फोटो शेअर केले आहेत. ज्यामधील एका फोटोत तिने शुटींगसाठी तयार होतानाचा तिचा आरश्यासमोरील एक सेल्फी शेअर केला आहे आणि म्हंटल आहे. ‘….अॅन्ड वी आर बॅक टू वर्क…# शूट लाईफ..बेबी स्टेप्स’ तर दुसरा फोटो तिच्या अॅड शूटचा असून त्यावर तिने वर्क मोड ऑन असं लिहीलं आहे.

5-Neha-Dhupia-goes-back-to-work-Neha-baby-shower

१८ नोव्हेंबरला नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या घरी एका तान्हुलीचा जन्म झाला.नेहाने तिच्या बाळाचं नाव मेहर असं ठेवत चाहत्यांसोबत तिचा फोटो शेअर केला होता. मात्र त्या फोटोत तिच्या मुलीचे फक्त चिमुकले पायच दिसत होते.

3-Neha-Dhupia-goes-back-to-work-Mehr-baby-photo
नेहा आणि अंगद १० मे ला विवाह बंधनामध्ये अडकले. याचाच अर्थ लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती.मात्र लग्नापूर्वी तिने तिच्या प्रेग्नंसीची बातमी लपवून ठेवली होती.ऑगस्टमध्ये तिने तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.प्रेग्नसीची बातमी समजली तर कदाचित तिला तिची कामे बंद करावी लागतील अशी भिती नेहाला वाटत होती.म्हणूनच तिने ही बातमी आधीच उघड केली नाही, असं एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं.

4-Neha-Dhupia-goes-back-to-work-Neha-baby-bump

प्रेग्नंट असताना देखील नेहाने शेवटच्या क्षणापर्यंत काम केलं होतं. गरोदर असताना देखील नेहाने ‘हॅलिकॉप्टर ईला’ आणि ‘स्टाईल बाय नेहा’ चं शूटींग पूर्ण केलं होतं.तिचं बेबी बंप लवकर न दिसल्याने आणि तिची एनर्जी लेव्हल चांगली असल्याने ती या काळात देखील कामे पूर्ण करु शकली, असं तिचं म्हणणं आहे. तसंच बाळंतपणानंतरही ती आता लगेच पुन्हा कामावर रूजू झाली आहे. यावरुन तिचं तिच्या कामावर असलेलं प्रेम दिसून येतं.

फोटो सौजन्य ; Instagram

AWESOME NEWS! POPxo SHOP is now Open! Get 25% off on all the super fun mugs, phone covers, cushions, laptop sleeves, and more! Use coupon code POPXOFIRST. Online shopping for women never looked better!