नेहा कक्कर मागच्या काही दिवसांपासून तिचे वेडिंग अल्बम आणि अचानक झालेलं लग्न यामुळे चर्चेत होती. आता पुन्हा सोशल मीडियावर तिच्याच नावाची चर्चा आहे. याचं कारण नेहाने नाव आता फोर्ब्सच्या टॉप लिस्टमध्ये समाविष्ट झाले आहे. फोर्ब्सने जाहिर केलेल्या टॉप 100 सेलिब्रेटीजमध्ये तिचे नाव टॉपवर आहे. फोर्ब्सने नुकतीच अशा सेलिब्रेटीजची लिस्ट जाहीर केली आहे जे सेलिब्रेटीज सोशल मीडियावर खूर अॅक्टिव्ह आहेत. शिवाय जे लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत प्रेरणा देत असतात. आशिया- पॅसिफिक भागातील सेलिब्रेटीजच्या या लिस्टमध्ये नेहा कक्कडचे नावदेखील आहे. या लिस्टमध्ये तिच्या व्यक्तिरिक्त आणखी 12 भारतीय आहेत.
नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यात तिने फोर्ब्स मॅगझिनचे कव्हरपेज शेअर केलं आहे. या फोटोला तिने कॅप्शन दिली आहे की, “गर्व आहे गर्व आहे. मला माझ्यावर गर्व वाटत आहे. तुम्हाला तर माहीतच आहे यामध्ये या लिस्टमध्ये फक्त 12 भारतीय आहेत. ज्यामध्ये अमिताभ बच्चन सर, शाहरूख खान सर आणि मी देखील आहे. देवा मी तुझी कृतज्ञ आहे. मी तुम्हा सर्वांची कृतज्ञ आहे. माझ्या सर्व फॅन्सची मी कृतज्ञ आहे. तिच्या या पोस्टवर तिचा पती रोहनप्रीतनेही तिचं सोशल मीडियावर कौतुक केलं आहे”
रोहनप्रीतने कंमेट केली आहे की, “अरे वाह! हे तर अगदी शानदारच आहे माझा बच्चा. मी खूप खूप खूश झालो आहे आणि मला तुझ्याबद्दल गर्व वाटतो… तु बेस्टच आहेस त्यामुळे तुझ्यासाठी काहीच अशक्य नाही…मला तुझा पती असण्याचा गर्व आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे माझी राणी”
नेहा बॉलीवूडची लोकप्रिय गायिका
अर्थातच या बातमीमुळे नेहाचा आनंद आता गगनात मावेनासा झाला आहे. नेहा केवळ 32 वर्षांची आहे आणि तिने या वयातच इंडस्ट्रीमध्ये खूप नाव आणि गौरव प्राप्त केला आहे. ती बॉलीवूडची एक लोकप्रिय गायिका आहे. ती सध्या इंडिअन आयडॉलच्या बाराव्या सिझनची परिक्षक आहे. यापूर्वीदेखील तिने अनेक सिंगिंग शोजचं परिक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. तिला काही दिवसांपूर्वीच ‘सर्वोत्कृष्ट हिंदी आणि पंजाबी फिमेल आर्टिस्ट 2020’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. आता तिच्या पुरस्कारांमध्ये आणखी एका मोठ्या जागतिक स्तरावरच्या फोर्ब्स पुरस्काराची भर पडली आहे. तिला एशिया पॅसिफिक मोस्ट इनफ्लुंशिअल सेलिब्रेटीज ऑन सोशल मीडियाने गौरवण्यात आलं आहे.
नेहा आणि रोहनप्रीतची लव्हस्टोरी
लग्नानंतर काही दिवसांनी नेहा आणि रोहनप्रीत ‘दी कपिल शर्मा’ या शोमध्ये सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी त्यांची लव्हस्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली होती. नेहा आणि रोहनप्रीत यांची भेट लॉकडाऊनमध्ये एका अल्बमच्या शूटनिमित्त झाली होती. काही भेटींमध्येच नेहा आणि रोहनप्रीत एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र नेहाला रिलेशनशिपमध्ये न राहता लग्न करायचं होतं. रोहनप्रीत 25 वर्षांचे असल्यामुळे त्यांना इतक्यात लग्न करायचं नव्हतं. मग नेहाने रोहनप्रीतपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. मात्र रोहनप्रीतला त्याच्या प्रेमाची जाणिव झाली आणि त्याने नेहाला सांगितलं की तो तिच्याशिवाय जगू शकत नाही. त्याने लगेच लग्नाचा निर्णय घेतला आणि दोघं लग्नाच्या बंधनात अडकले. दोघांच्याही घरातून या लग्नाला सहज परवानगी मिळाली आणि त्याचं थाटामाटात लग्न झालं.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
प्रेमाला वयाचं नाही बंधन, सेलिब्रिटी ज्या आहेत आपल्यापेक्षा लहान मुलांच्या प्रेमात
हे बॉलिवूड सेलिब्रिटी नाहीत आऊडसाईडर, त्यांचे आहेत असे कनेक्शन
बॉलीवूड कलाकार जे आहेत उत्तम लेखक