लॉकडाऊन असूनही गायिका नेहा कक्कर सध्या तिच्या टिकटॉक व्हिडिओजमुळे फार चर्चेत आहे. नेहा घरातूनच टिकटॉक व्हिडिओज करून चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. मात्र नेहाने सध्या एक हटके आणि युनिक चॅलेंज घेतलं आहे. तिने टिकटॉकवर एक आगळीवेगळी स्टाईल कॅरी करत व्हिडिओ तयार केला आहे. ज्यामध्ये तिने कोणताही फॅशनेबल ड्रेस घातलेला नसून चक्क उशीच अंगावर पांघरून घेतली आहे. यासाठी जाणून घ्या काय आहे नेहाचं हे अनोखं पिलो चॅलेंज…
नेहा कक्कर आणि पिलो चॅलेंज ट्रेंड
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर सतत काहीतरी हटके चॅलेंज देण्यात येत आहेत. लोकंही हे चॅलेंज स्वीकारतात आणि मग काही दिवस या चॅलेंजचा ट्रेंडच सुरू राहतो. गायिका नेहानेदेखील नुकतंच असं एक हटके चॅलेंज स्वीकारलं आहे.हे चॅलेंज स्वीकारत तिने एक टिकटॉक व्हिडिओ तिच्या अकाउंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने चक्क घरातील तीन निरनिराळ्या रंगाच्या पिलो अंगावर बांधल्या आहेत. असं करून तिने स्वतःची एक हटके आणि युनिक फॅशन तयार केली आहे. लॉकडाऊनमध्ये थोडं स्टायलिश दिसण्यासाठी तिने या उशा एका बेल्टच्या मदतीने कंबरेवर बांधल्या आहेत. या व्हिडिओसोबत नेहाने शेअर केलं आहे की हे माझं पिलो चॅलेंज आहे. नेहाच्या या आगळ्या वेगळ्या फॅशनवर तिचे चाहते मात्र फारच खूष झाले आहेत. कारण तिला या व्हिडिओवर भरमसाठ कंमेट्स सध्या मिळत आहेत. नेहाच्या भावाने म्हणजेच टोनी कक्करने तर “नेहा तू एखाद्या डॉलप्रमाणे दिसत आहेस” असं म्हटलं आहे. एका चाहत्याने तर “नेहा तू चांद का तुकडा म्हणजे चंद्रकोरीप्रमाणे दिसत आहेस” अशी कंमेट केली आहे. आणखी एका चाहत्याने “नेहा तू टॅलेंटचा पिटारा म्हणजेच टॅलेंटचा खजिना आहेस” असं म्हटलं आहे. चाहत्यांकडून मिळणाऱ्या या जबरदस्त कंमेट्समुळे नेहा फारच खुश झाली आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिच्या बॉलीवूड डेब्यूबाबत काही गोष्टींचा खुलासा केला होता. खरंतर नेहाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचं होतं. आता लॉकडाऊनमुळे घरात अडकल्यामुळे तिच्यातील अभिनेत्री आणि मॉडेल अचानक जाग्या झाल्या असाव्यात. म्हणूनच अशी हटके स्टाईल करून ती तिच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असावी.
नेहाला लहानपणी व्हायचं होतं…
नेहा कक्करला लहानपणापासूनच अभिनय क्षेत्रात यायचं होतं. काही दिवसांपूर्वी तिने एका मुलाखतीतून तिच्या मनातील या भावना मोकळ्या केल्या होत्या. लहानपणी टिव्हीवर गाणी पाहून ती डान्स करत असे. त्यामुळे अभिनय कौशल्य तर तिच्यात लहानपणापासूनच आहे असं तिचं म्हणणं आहे. बऱ्याचदा लाईव्ह शो अथवा गाण्याच्या अल्बममधून ती तिची अभिनयाची हौस भागवून घेते. आता तर टिकटॉक हा तिच्या अभिनयाला वाव देणारा एक चांगला पर्यायच तिला सापडला आहे. मात्र जेव्हा प्रश्न बॉलीवूडमध्ये अॅक्टिंग करण्याचा येतो तेव्हा मात्र तिला थोडी भिती वाटते. नेहाच्या मते तिला यापूर्वी अभिनयासाठी अनेक ऑफर्स आलेल्या आहेत. मात्र तिच्या मते इंडस्ट्रीमध्ये जितके गायक अथवा गायिका आहेत त्यांचा याबाबतचा अनुभव फार वाईट आहे. गाणं सोडून ते अभिनय करायला गेले आणि अपयशी झाले. सहाजिकच या लोकांप्रमाणे नको त्या वाटेने जाऊन नेहाला स्वतःचं स्टारडम खराब करायचं नाही आहे. त्यापेक्षा टिकटॉक व्हिडिओवरून अशी नौटंकी करणं तिला जास्त पसंत असावं. असो आता हे पिलो चॅलेंज आणखी कोण कोण स्वीकारणार आणि त्यातून पुढे काय काय स्टाईल पाहायला मिळणार हे दिसेलच.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
बॉयफ्रेंड रोहमनचं कुकिंग स्कील पाहून आश्चर्यचकीत झाली सुश्मीता सेन