ADVERTISEMENT
home / मनोरंजन
नेहा पेंडसेचा झाला का गुपचूप साखरपुडा

नेहा पेंडसेचा झाला का गुपचूप साखरपुडा

मराठीतील बोल्ड अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) नेहमीच तिच्या बोल्ड फोटोशूट्समुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या फोटोशूट्सचे फोटो अनेकदा व्हायरल होतात.

एवढंच नाहीतर तिच्या हॉट फोटोंची तुलनाही बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानीसोबतही झाली होती. पण यावेळी मात्र नेहाच्या वेगळ्याच फोटोने फॅन्सचं लक्ष वेधलं आहे. पाहा हा फोटो

या फोटोमध्ये नेहाने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. तिच्या हातात अंगठीही दिसत आहे. तसंच तिच्या मित्रपरिवाराने आनंदाने तिला मिठी मारलेली दिसत आहे. हा फोटो नेहाच्या मित्रमैत्रिणींनी इन्स्टावर शेअर केला आणि तिचं अभिनंदनही केलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आहे म्हणजे काही ना काही खूषखबर नक्कीच आहे.

neha-pendse-engagement 1
मग काय हा फोटो लगेचच व्हायरल झाला आणि फोटो व्हायरल होताच नेहाच्या फॅन्सनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. नेहाच्या फॅन्सना शंका आली की, तिने हातात इंगेजमेंट रिंग घातली आहे. तसंच या फोटोला देण्यात आलेलं कॅप्शनही अभिनंदनाचं होतं. जे बघताच नेहाला साखरपुडा झाल्याबद्दल फॅन्सनी शुभेच्छा दिल्या.

ADVERTISEMENT

सुव्रत जोशी आणि सखी गोखलेचा लग्नसोहळा

जेव्हा नेहाला साखरपुड्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तिने असं काहीही नसल्याचं सांगितलं. नेहाने सांगितलं की, माझा साखरपुडा झालेला नाही आणि इतक्या लवकर करण्याचा विचारही नाही. फोटोबद्दल बोलायचं झाल्यास माझ्या मित्रमैत्रिणींनी माझ्यासाठी काही प्लॅन्स बनवले आहेत आणि तो प्लॅन मी नुकताच पूर्ण केला. म्हणून त्यांनी मला शुभेच्छा दिल्या. यापेक्षा जास्त काही नाही.  

तर दुसरीकडे अशीही चर्चा आहे की, नेहाला बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनमध्ये जाण्याची संधी मिळाला आहे. याबाबतही तिने खुलासा केला की, ती बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सिझनचा भाग नसेल.

सिद्धार्थ – मिताली #tinypanda चा झाला साखरपुडा

ADVERTISEMENT

असो एवढं तर नक्कीच कळलं की, मराठी आणि हिंदीतली ही हॉट गर्ल अजूनही सिंगलच आहे.

01 May 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT