तुम्हीही नियमित व्यायाम करता? व्यायामानंतर तुम्हालाही लागते का भूक? तर आजचा विषय तुमच्यासाठी फारच महत्वाचा आहे. कारण खूप जणांना व्यायाम केल्यानंतर लागलेली भूक अजिबात आवरता येत नाही. व्यायाम केल्यानंतर भूक लागली की, काय खाऊ आणि काय नको असे होऊन जाते. भुकेच्या बाबतीत तुम्हालाही अगदी असेच होत असेल आणि तुम्ही अगदी कोणतेही पदार्थ खात असाल तर आताच ही सवय थांबवा. कारण तुमच्या व्यायाम करण्याला त्यामुळे काहीच अर्थ उरणार नाही. कारण खूप वेळा व्यायामानंतर खाल्लेले काही पदार्थच शरीरातील फॅट वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. असे पदार्थ तुमचे पोट आत घालण्याऐवजी पोट सुटण्यास कारणीभूत ठरतात. जाणून घेऊया असे काही पदार्थ जे व्यायामानंतर कधीच खाऊ नये.
स्नायूंना आराम देणारी अक्वाटिक थेरपी ठरते आहे अव्वल
केळी
खूप जणांना वर्कआऊटनंतर केळी खाण्याची सवय असते. पण केळ्याच्या सेवनामुळे शरीरात मोठ्या प्रमाणात कार्बोदकांचे प्रमाण वाढते. शरीरात कार्बोदकांचे प्रमाण वाढले की, त्यामुळे वजन वाढते. व्यायाम केल्यानंतर आधीच आपण कॅलरीज बर्न केलेल्या असतात. त्यात तुम्ही केळं खाल्ल्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. ज्यांना वजन कमी करायचे असेल अशांनी तर मुळीच केळी खाऊ नये. कारण त्यामुळे पोट सुटण्याची जास्त शक्यता असते.
अंजीर
अंजीर हे शरीरासाठी फारच चांगले असते. अंजीरमध्ये कॅलरीज कमी असल्या तरीदेखील तुम्ही अंजीर खायला हवे. अंजीर खाल्ल्यामुळे गोड खाण्याची इच्छा होत नसली तरी देखील ते व्यायामानंतर खाल्ल्यामुळे शरीरात फॅट वाढतात. डाएटिशिअनही अशावेळी तुम्हाला व्यायामानंतर अंजीर खाण्याचा सल्ला देत नाही.
खोबरं
नारळाचे पाणी हे शरीरासाठी कितीही चांगले असले तरी देखील व्यायामानंतर नारळ पाणी प्यायले तर चालेल पण त्याची मलई अथवा खोबरे खाऊ नका. कारण त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फॅट असते. मलई किंवा त्यामधील खोबरे खाल्ल्यामुळे तोंडाला चव जरी येत असली तरी देखील त्यामध्ये असलेले कार्ब्स तुमचे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे काहीही झाले तरी नारळाचे खोबरं किंवा खोबऱ्याचे कोणतेही पदार्थ खाऊ नका.
खाद्यपदार्थ ज्यामुळे मिळतील भरपूर कार्बोदके
खजूर
खूप जणांच्या डाएटमध्ये खजूर हे गोड शमवण्यासाठी दिले जातात. पण व्यायामानंतर खजूर खाणे अजिबात चांगले नाही. त्यामुळे तुमची गोड खाण्याची क्रेव्हिंग ही वाढू शकते. शिवाय त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. वजन वाढणेच म्हणजे त्यामुळे पोट बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही खजूराचे सेवन करु नका.
आंबा
आंबा हे फळ देखील वर्कआऊटनंतर अजिबात खाऊ नका. कारण आंब्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळेही वजन वाढण्याची शक्यता असते. आंबा हे फळ खाल्ल्यानंतर वजन वाढण्याची शक्यता असते. म्हणून वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्यांना कार्बोदकांचे सेवन करु नका असे सांगितले जाते. कारण त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
आता कधीही व्यायाम केल्यानंतर हे पदार्थ अजिबात खाऊ नका. कारण त्यामुळे पोट वाढण्याची शक्यता असते.
गरोदरपणाच्या 7 व्या महिन्यात कशी घ्याल काळजी, तुमच्यासाठी टिप्स