ADVERTISEMENT
home / खाणंपिण आणि नाइटलाईफ
टोमॅटोसोबत कधीच खाऊ नये काकडी, जाणून घ्या कारण

टोमॅटोसोबत कधीच खाऊ नये काकडी, जाणून घ्या कारण

प्रत्येक पदार्थांमध्ये निरनिराळे घटक पदार्थ असतात. जेव्हा आपण दोन पदार्थ एकत्र करतो तेव्हा त्यामधील घटक पदार्थ एकत्र मिसळले जातात. काही पदार्थ एकत्र येण्यामुळे शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं. यासाठी स्वयंपाक करताना अथवा जेवताना कोणते पदार्थ एकत्र खावे आणि कोणते खाऊ नयेत हे प्रत्येकाला माहीत असायला हवं. बऱ्याचदा जेवणासोबत कोशिंबीर अथवा सलाड करण्यासाठी काकडी आणि टोमॅटो एकत्र सर्व्ह केले जातात किंवा सलाडमध्ये दोन्ही पदार्थांचे तुकडे मिसळले जातात. मात्र लक्षात ठेवा काकडी आणि टोमॅटो एकत्र करून खाण्यामुळे तुमच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. यासाठीच जाणून घ्या. काकडी आणि टोमॅटो एकत्र करून का खाऊ नयेत.

काकडी आणि टोमॅटो एकत्र खाण्यामुळे काय होऊ शकतं

काकडी आणि टोमटो सलाड अथवा कोशिंबीरीच्या स्वरूपात खाणं शरीरासाठी योग्य असतं. मात्र यासाठी काकडी आणि टोमॅटोची वेगवेगळी कोथिंबीर अथवा सलाड तयार करावे. हे दोन्ही पदार्थ एकत्र केल्यामुळे त्यातून शरीरासाठी घातक पदार्थ तयार होतो. तज्ञ्जांच्या मते काकडी आणि टोमॅटो एकत्र खाण्यामुळे तुमच्या पचनशक्तीवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर खाण्यामुळे तुमच्या पोटात गॅस होणे, पोट फुगणे, अॅसिडिटी वाढणे, थकवा, उलटी, पोटदुखी, मळमळ, अपचन, बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता असते. याचं कारण काकडी हा पदार्थ पोटात सहज पचतो मात्र टोमॅटो आणि टोमॅटोच्या बिया पोटात बराच काळ तशाच पडून राहातात.प्रत्येक अन्नपदार्थांची पोटात विघटन अथवा पचन होण्याची क्षमता वेगवेगळी असते. शिवाय काकडीत जे घटक पदार्थ असतात ते टोमॅटोमधील व्हिटॅमिन सी सोबत मिसळल्यावर त्यातून विषारी पदार्थ तयार होतो.  जेव्हा तुम्ही हे दोन्ही पदार्थ एकत्र खाता तेव्हा पोटात गॅस निर्माण होतो. सतत हे दोन्ही पदार्थ एकत्र खाण्यामुळे  आतड्यांवर ताण येवून पोटाला सूज येण्याची शक्यता असते. पोटाचे गंभीर विकार यातून निर्माण होऊ शकतात. तज्ञ्जांच्या मते  काकडी आणि टोमॅटोच्या कोशिंबीरीत दही घालणंदेखील आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे काकडी, टोमॅटो आणि दही एकत्र करून कोशिंबीर तयार करू नये. कारण टोमटो आणि दह्याच्या एकत्र खाण्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतात.

pexels

ADVERTISEMENT

सलाड अथवा कोशिंबीर खाताना काय काळजी घ्यावी

जेवताना तोंडी लावण्यासाठी अथवा डाएटवर असताना जेवण म्हणून सलाड खाण्याची पद्धत आहे. मात्र लक्षात ठेवा रिकाम्या पोटी,जेवणाआधी अथवा जेवणानंतर कधीच सलाड खाऊ नये. कारण कोशिंबीर अथवा सलाड हे नेहमी जेवणासोबतच खावे. आय़ुर्वेद आणि भारतीय खाद्य संस्कृतीत यासाठीच पानात कोशिंबीर, रायतं वाढण्याची पद्धत आहे. शिवाय ते नेहमी प्रमाणातच खावे. भात अथवा पोळीप्रमाणे आहारात कोशिंबीर अथवा सलाड असू नये. सलाड अथवा कोशिंबीर खाण्यामुळे खाल्लेले अन्न लवकर पचावे आणि त्यासाठी शरीराला पुरेसे फायबर्स मिळावे हा कोशिंबीर पानात वाढण्यामागचा उद्देश असतो. त्यामुळे तुम्ही देखील जेवताना अथवा सलाड खाताना ही चूक करत असाल तर असं करणं लगेच थांबवा.

फोटोसौजन्य – pexels

अधिक वाचा –

गरोदरपणात चुकूनही खाऊ नका हे पदार्थ

ADVERTISEMENT

रोज दही खाताय? मग तुमच्या शरीराला येऊ शकते ‘सूज’

असतील असे त्रास, तर अजिबात खाऊ नये लसूण!

05 Apr 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT