ADVERTISEMENT
home / DIY फॅशन
सोन्याची खरेदी

सोने खरेदी करताय, दागिन्याचा हा प्रकार घेणे टाळा

 सोन्याचा कमी भाव झाला की, सोन्याची खरेदी अनेक जण करतात. काही जण सोन्याची खरेदी ही भविष्याचा विचार करुन करतात. सोने हा असा ऐवज आहे. ज्याची किंमत भविष्यातही कमी होणार नाही असे अनेकांना वाटते. सध्याचे सोन्याचे भाव पाहता ते वाटणे स्वाभाविकही आहे. आजच्या घडीला सोने 50 हजारांच्या वर आहे. तुमच्याकडे जुने सोने असेल तर त्यापासून गरजेनुसार नवीन सोने बनवणे हे कधीही चांगलेच वाटते. पण तुमच्याकडे पुरेशा प्रमाणात सोने असेल फक्त एक सेव्हिंग म्हणून तुम्ही सोने घेणार असाल तर ते सोने कोणत्या स्वरुपात घ्यायचे. भविष्याचा विचार करता दागिन्याचा कोणता प्रकार टाळायचा ते आता जाणून घेऊया.

बाजूबंद

दंडाला बांधले जाणारे बाजूबंद हे दिसायला सुंदर असले तरी देखील हे बाजूबंद कालांतराने होत नाहीत. अशावेळी तुम्ही शक्यतो सोन्याचे बाजूबंद बनवायला जाऊ नका. तुमच्या शरीर प्रकृतीनुसार म्हणजे तुम्ही धिप्पाड, बारीक आहात त्याच्यानुसार त्याची डिझाईन बनवावी लागते. पण खूप जणांचा अनुभव असा असतो की, बाजूबंद हे कालांतराने होत नाहीत. त्यात साखळी वाढण्याची संधी असते. पण असे असले तरी देखील त्याचा खर्च वाढत राहतो.  शिवाय बाजूबंद कितीही स्टायलिश असले तरी देखील ते सगळ्यांनाच आवडतील असे नाही. हा दागिना पुढे पुढे वापरता येईल असे सांगता येत नाही. यासाठीची घडणावळ ही त्याच्या डिझाईनवर अवलंबून असल्यामुळे तो खर्च मोडून करताना वेगळाच 

बांगड्या

 तुमच्याकडे बांगड्या असतील. पण भविष्यात लागतील म्हणून तुम्ही केवळ बांगड्या करुन ठेवणार असाल तर असा खर्च काहीही कामाचा नाही. कारण बांगड्या या कालांतराने आऊटडेटेड वाटू लागतात. काही डिझाईन्स या आऊटडेटेड झाल्यामुळे त्यानंतर तोडून मग दुसऱ्याच बनवाव्या लागतात. त्यामुळे बांगड्या एक्स्ट्रा दागिना म्हणून अजिबात करु नका. तुम्ही वापरत असाल तरच तुम्ही दागिना घडवा. बाजूबंदाप्रमाणे बांगड्या हा देखील धनसंचय म्हणून करण्यासारखा दागिना नाही.

ब्रेसलेट किंवा चेन

खूप जणांना सोन्याची खूप जास्त आवडत असते. गळ्यात चेन घालणे ब्रेसलेट बनवणे खूप जणांना आवडते. पण ब्रेसलेट आणि चैन या गोष्टी तुम्ही बनवत असाल तर ते घालणार असाल तर ठीक. काही जणांना फक्त दाखवण्यापुरते सोने आवडते किंवा धनसंचय केला यासाठी सोने खरेदी केले असे तुम्ही करत असाल तर तो केवळ तुमच्या लॉकरमध्ये साठून राहणारा असा घटक आहे. ब्रेसलेट आणि चेन यांच्याही डिझाईन्स बदलत असतात. त्याही कालांतराने आपल्याला बदलाव्याशा वाटतात त्यामुळे यात काहीही घडवू नका. 

ADVERTISEMENT

सोन्याचा साठा करा असा

सोन्याचा साठा करायची इच्छा असेल तर तुम्ही त्यापासून कोणताही दागिना घडवण्यापेक्षा तुम्ही सोन्याची बिस्कीट किंवा त्याचे वळे घ्या. सोन्याचे वळे घेतल्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा सोने बनवता येते. ज्यांची आमदानी कमी आहे. त्यांना देखील एकदी एक एक ग्राम सोनं घेऊन आपल्या मुलांसाठी सोने करता येऊ शकते. भविष्यात तुम्ही रॉ फॉर्ममधील सोनं देऊन त्यापासून दागिने घडवू शकता. 

06 Jun 2022
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT